व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. | Ladki bahin Yojana third installment

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Third Installment: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात. या योजनेत आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत. तसेच कोट्यवधी रुपयांचा निधी महिलांच्या खात्यात वळते करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या योजनेची मुदत वाढवण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुदत आणखी वाढवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. यातच लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. 

या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण २९ सप्टेंबर रोजी केले जाईल, असे राज्य सरकारने सांगितले होते. त्यानुसार या योजनेतील पैशांचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती एक्सवर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. दिनांक २५ सप्टेंबर रोजी ३४,३४,३८८ भगिनींना १५४५.४७ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासण्यासाठी खाली क्लिक करा.

तीन हप्ते एकत्र देण्यात आले आहेत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून, दिनांक २६ सप्टेंबर रोजी ३८,९८,७०५ भगिनींना ५८४.८ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाचे प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे.ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तीसरा हफ्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हप्ते एकत्र देण्यात आले आहेत. दिनांक २९ सप्टेंबर रोजी ३४,७४,११६ भगिनींना ५२१ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाचे प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे, असे त्या म्हणाल्या.

हे वाचा-  कलियुगात हनुमानजी कुठे राहतात आणि कोणत्या लोकांनी त्यांना पाहिले आहे, जाणून घ्या कलियुगात बजरंगबली कसे दिसणार.

दरम्यान, लाकडी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जुलै महिन्यापासून प्रति महिना १५०० रुपये याप्रमाणे लाभ दिला जात आहे. कागदपत्रांत त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही, त्यांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत. अद्याप एकही हप्ता न आलेल्या महिलांनी बँक खाते आधार क्रमांकाशी लवकरात लवकर जोडून घ्यावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. बँक खाते आणि आधार क्रमांक एकमेकांना जोडण्याची अट अजूनही कायम आहे.   


लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये

खरं तर ज्या महिलांच्या खात्यात अद्याप 4500 जमा झाले आहेत. त्यांनी अर्जात भरलेला बँक तपशील एकदा तपासून बघावा. बँक तपशील जर योग्य असेल तर तो आधार लिंक आहे का? हे देखील तपासून घ्या. जर बँक अकाऊंट आधारशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला तर तो लवकरचा लवकर आधारशी जोडून घ्यावा लागेल. तरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. 

दुसरी आणि सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक महिलांनी अर्जात नवऱ्यासह बँकेत जॉईंट असलेले अकाऊंट नंबर भरले आहे. त्यामुळे जॉईंट अकाऊंट धारकांना देखील पैसे येणार नाहीयेत. त्यामुळे तुमच्या एकट्याचे खाते उघडून ते अर्जात भरून घ्या. तरच तुम्हाला पैसे येतील. विशेष म्हणजे हे अकाऊंट देखील आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. 

हे वाचा-  शेतकऱ्यांना फवारणी पंपावर मिळत आहे 100% अनुदान | लवकर करा अर्ज

लाडकी बहीण योजना: तिसऱ्या हप्त्याची वाट

मुख्यमंत्री Ladki Bahin Yojana 29 सप्टेंबर 2024 रोजी महिलांच्या खात्यात third installment जमा करणार आहे. तसेच ज्या महिलांना अजून पर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया मिळालेला नाही अशा महिलांना राज्य सरकार ने 4500 देण्यास सुरुवात केलेली आहे. याअंतर्गत महिलांना ₹4500 मिळणार आहेत. रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात या योजनेचे पैसे वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे बँकांकडे योजनेचे पैसे पोहोचले आहेत, आणि आता बँका हळूहळू पात्र महिलांच्या खात्यात DBT (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करणार आहेत.

महिलांची उत्सुकता

महिलांना या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण त्यांच्या आर्थिक स्थितीला या हप्त्याचा मोठा प्रभाव आहे. सरकारने पैसे उद्या बँकेत पाठवले की, बँकांमार्फत पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे महिलांनी त्यांच्या बँक खात्यांची तपासणी करणे आवश्यक आहे.

लाभार्थींची माहिती

आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, third installment मध्ये लाभ मिळणाऱ्यांची यादी जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक कारणांमुळे उरलेले लाभार्थी व 24 ऑगस्टनंतर योग्यरित्या अर्ज करणाऱ्यांचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत आलेले अर्ज देखील या योजनेत समाविष्ट केले जातील.

आर्थिक लाभ

ज्या महिलांना ऑगस्टमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा लाभ मिळाला आहे, त्यांच्या खात्यात ₹1500 जमा होणार आहेत. याशिवाय, ज्या महिलांना दोन्ही टप्प्यात लाभ मिळाला नाही, त्यांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा लाभ वितरीत केला जाईल. यामुळे महिलांना आर्थिक आधार मिळेल, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा होईल.

हे वाचा-  गुगलचं मोठं अपडेट, स्विच ऑफ फोनचं मिळणार लोकेशन; आलं नवीन Find My Device

अर्ज प्रक्रिया आणि आकडेवारी

आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2.4 crore (कोटी) पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या 1.07 crore महिलांना ऑगस्टमध्ये लाभ मिळाला होता. नागपूरमध्ये 31 ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात 52 लाख महिलांना लाभ वितरित करण्यात आला.

Ladki bahin Yojana third installment

आदिती तटकरे यांनी म्हटले की, सप्टेंबर महिन्यात आलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे, आणि या छाननीनंतर 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. सरकारचा उद्देश आहे की, 2.5 crore महिलांना या योजनेचा लाभ द्यावा.

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासण्यासाठी खाली क्लिक करा.

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र

लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तिसऱ्या हप्त्यामुळे महिलांना निश्चितच मोठा दिलासा मिळेल, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होईल. महिलांनी बँक खात्यांची नियमित तपासणी सुरू करणे आवश्यक आहे, कारण हे पैसे त्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहेत.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

1 thought on “लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. | Ladki bahin Yojana third installment”

  1. आजून 1 रुपये सुद्धा आलेला नाही.
    Form Approval झालेला आहे.
    बँक आधार seeding पण झालेले आहे.
    सगळ ok आहे.
    पैसे का जमा होत नाहीत….

    उत्तर

Leave a Comment