व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

नवीन शासन निर्णयानुसार, या जिल्ह्यातील केशरी रेशन कार्डधारकांना आता रेशनऐवजी त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार थेट पैसे.. जाणून घ्या काय आहे नवीन शासन निर्णय.!

नमस्कार, नवीन शासन निर्णयाच्या मंजुरी नुसार, राज्यातील या रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना रेशनऐवजी त्यांच्या बँक खात्यामध्ये आता थेट पैसे जमा होणार आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती काय आहे? ते आपण सदर लेखाच्या माध्यमातून पाहूया.

केंद्र सरकारकडून पिवळे, केशरी व पांढरे रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्याचा पुरवठा केला जातो. या स्वस्त अन्नधान्याचा पुरवठा सार्वजनिक वितरण प्रणाली मार्फत सरकारकडून नियुक्त केलेल्या स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना केला जातो.

भारतीय अन्न महामंडळ म्हणजेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही सरकारी संस्था सार्वजनिक वितरण प्रणालीचे व्यवस्थापन पाहते.

परंतु राज्यामध्ये राज्य सरकारकडून राज्यातील ठराविक विभागातील जिल्ह्यांमध्ये केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना आता अन्नधान्य ऐवजी रोख रक्कम देण्याचा नवीन निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय काय व किती रक्कम देण्यात येणार आहे? हे आपण खाली सविस्तर पाहूया:

नवीन शासन निर्णयाची सुरुवात होणार या विभागातील जिल्ह्यांमधून

राज्यातील छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे त्याचबरोबर नागपुर विभागातील वर्धा जिल्ह्यातील केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना आता अन्नधान्याऐवजी रोख रक्कम हस्तांतरण योजने करता नवीन शासन निर्णयास मंजुरी देण्यात आली आहे. या नवीन शासन निर्णयानुसार संबंधित केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी पैसे मिळणार आहेत.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रतिमाह किती मिळणार रक्कम?

या योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये इतकी रक्कम थेट हस्तांतरण करण्यास मान्यता देण्यात आली होती.

हे वाचा 👉  महाराष्ट्राचा निवडणुकीपूर्वीचा अर्थसंकल्प जाहीर | शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी विविध योजनांची घोषणा.

20 जून 2024 च्या सुधारित परिपत्रकांवर केसरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देण्यात येणाऱ्या रकमेत प्रतिमा प्रति लाभार्थी 170 रुपये अशी सुधारणा करण्यात आली आहे.

नवीन शासन निर्णयानुसार या शेतकऱ्यांना मिळणार पैसे

नवीन शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील विपत्तीग्रस्त केसरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना अन्नधान्य ऐवजी रोख रक्कम दिली जात आहे. सदर शेतकऱ्यांना त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे थेट पैसे हस्तांतर केले जातात. या अनुषंगाने यावर्षीही या योजनेच्या लेखाशीर्ष मंजुरी देण्यात आली आहे.

सदरच्या प्रशासकीय विभागातील 14 जिल्ह्यातील केशरी रेशन कार्डधारक शेतकरी अनिवार्य केले गेले आहे. या कार्यक्रमांतर्गत लेखाशीर्ष प्रस्तावित करणेबाबत प्रशासनाला सुचित करण्यात आले आहे. त्यानुसार नवीन लेखाशीर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसारच या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे.

नवीन शासन निर्णयाचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा?

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी केशरी रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे अर्ज करावा लागतो. संबंधित अर्जाचा नमुना सदरच्या स्वस्त धान्य दुकानदाराकडेच मिळतो. अर्था सोबत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची व रेशन कार्ड च्या पहिल्या व शेवटच्या पानाची प्रत जोडावी लागते. अशी माहिती विश्वसनीय सूत्राकडून समजते.

हे वाचा 👉  विहीर अनुदान योजना 2024 | विहीर काढण्यासाठी 4 लाख रुपयांचे अनुदान.

सदर लेखांमध्ये आपण राज्य सरकारच्या नवीन निर्णयानुसार राज्यातील ठराविक प्रशासकीय विभागातील जिल्ह्यातील केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना आता अन्नधान्यऐवजी त्यांच्या बँक खात्यावर ठराविक रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? ही सुद्धा माहिती आपण या लेखांमध्ये दिली आहे. जर तुम्ही वर दिलेल्या प्रशासकीय विभागातील नागरिक असाल तर, तुम्ही या नवीन शासन निर्णयाचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page