या लेखामध्ये आज आपण रेल्वे विभागांमध्ये गट-ड पदांसाठी भरती केली जाणार आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया.
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी आहे. रेल्वे विभागामार्फत गट-ड पदांसाठी तब्बल 32,438 रिक्त पदावर भरती जाहीर केली आहे. आपण या लेखाच्या माध्यमातून या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
रेल्वेमध्ये भरती करून घेण्यात येणारी गट-ड पदे
रेल्वेमध्ये गट-ड पदांसाठी खूप मोठी भरती होणार आहे. अशी कोणती गट-ड पदे आहेत ज्यामध्ये ही भरती होणार आहे. ते आपण खाली सविस्तरपणे पाहूया:
- सहाय्यक (एस अँड टी)
- सहाय्यक (वर्कशॉप)
- सहाय्यक ब्रिज
- सहाय्यक गॅरेज आणि वॅगन
- सहाय्यक लोको शेड (डिझेल/इलेक्ट्रिकल)
- सहाय्यक ऑपरेशन (इलेक्ट्रिकल)
- सहाय्यक पी.वे
- सहाय्यक टीएल आणि एसी
- पॉइंट्समन
- ट्रॅकमेंटेनर-4
शैक्षणिक पात्रता
सदरच्या गट-ड पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 10वी उत्तीर्ण किंवा आयटीआय (मान्यताप्राप्त संस्थेमधून) उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे.
वेतनश्रेणी
रेल्वे मधील गट-ड पदांसाठीची वेतनश्रेणी ही ₹18,000 (लेवल-1) आहे.
वयोमर्यादा
रेल्वे गट-ड भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा ही 1 जानेवारी 2025 पर्यंत..
- सामान्य श्रेणी: 18 ते 36 वर्षे
- ओबीसी (NCL): 18 ते 39 वर्षे (3 वर्षे सूट)
- एससी (SC)/एसटी (ST): 18 ते 41 वर्षे (5 वर्षे सूट)
सदरच्या भरती प्रक्रियेमध्ये कोविड-19 मुळे कमाल वयोमर्यादेमध्ये 3 वर्षाची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क
रेल्वे गट-ड पदांच्या भरतीसाठीचे अर्ज शुल्क..
- सामान्य व आर्थिक दुर्बल (EWS) उमेदवारांसाठी 500 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल.
- ओबीसी/SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक उमेदवारांसाठी 250 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल.
सदरच्या पदासाठींची परीक्षा झाल्यानंतर अर्ज शुल्क विशिष्ट अटींनुसार परत दिले जाईल.
अर्ज प्रक्रियेच्या महत्त्वाच्या तारखा
- अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू: 23 जानेवारी 2025
- अर्ज भरण्याची प्रक्रिया समाप्त: 22 फेब्रुवारी 2025
- अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 24 फेब्रुवारी 2025
- अर्जातील दुरुस्ती करण्याची तारीख: 25 फेब्रुवारी ते 6 मार्च 2025
निवड प्रक्रिया
रेल्वे मधील गट-ड पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया..
- संगणक आधारित परीक्षा (CBT) लेखी परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये सामान्य बुद्धिमत्ता, गणित, विज्ञान व सामान्य जागरूकता या विषयांचा समावेश असणार आहे.
- शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET): यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांसाठी मैदानी चाचणी द्यावी लागणार आहे. 1. पुरुष उमेदवारांना 35 किलो वजन उचलून 100 मीटर न थांबता दोन मिनिटांमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे. 2. महिला उमेदवारांना 20 किलो वजन उचलून 100 मीटर न थांबता दोन मिनिटात पूर्ण करणे आवश्यक आहे. 3. पुरुष व महिलांसाठी 1 किलोमीटर धावणे. पुरुषांसाठी एक किलोमीटर 4 मिनिटांमध्ये तर महिलांसाठी एक किलोमीटर 5 मिनिटांमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे.
पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी करून अंतिम निवड केली जाईल.
अर्ज कसा करायचा?
- रेल्वे गट-ड पदासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवर जावे लागेल.???????? https://www.rrb.gov.in
- वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही या पदासाठीच्या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरून व आवश्यक कागदपत्रे (फोटो, स्वाक्षरी इ.) स्कॅन करून अपलोड करा.
- त्यानंतर तुम्हाला सदर पदासाठीच्या अर्जाची शुल्क भरावे लागेल.
- अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या.
अशा पद्धतीने तुम्ही रेल्वे गट-ड पदासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
सदर लेखामध्ये आपण रेल्वे विभागामध्ये गट-ड पदासाठी 32,438 रिक्त पदावर जी भरती होणार आहे. त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण दिली आहे.जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. धन्यवाद!




