व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

जाणून घ्या,Post Office FD 2025 चे नवीन व्याजदर आणि नियम..आता मिळणार तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर अधिक परतावा.!

Post Office Fixed Deposit Scheme 2025

नमस्कार, भारतामध्ये पोस्ट ऑफिस हे पत्र व्यवहाराबरोबरच पैशाच्या गुंतवणुकीसाठी अत्यंत सुरक्षित आणि लोकप्रिय पर्याय आहे. ग्रामीण भागामध्ये तर गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसला पहिली निवड दिली जाते. यावरूनच समजते की गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस अत्यंत विश्वासार्ह आहे. या लेखामध्ये आपण पोस्ट ऑफिसने Post Office Fixed Deposit किंवा Post Office Time Deposit 2025 यामधील नवीन व्याजदर, आणि नियमामध्ये काय केले आहेत? याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया.

Post Office Fixed Deposit Scheme 2025

पोस्ट ऑफिस फिक्स्ड् डिपॉझिट योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना योग्य व निश्चित परतावा दिला जातो. ही योजना अशा व्यक्तींसाठी खूपच उपयुक्त आहे जे, आपले पैसे सुरक्षित ठेवून त्या पैशांवर ठराविक व्याज मिळवू इच्छितात. आपण खाली Post Office Fixed Deposit Scheme 2025 ची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये पाहूया:

  • Post office FD चा व्याजदर: 6.90% ते 7.50% प्रति वर्ष
  • कालावधी: 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष
  • Post office FD कमीत कमी जमा रक्कम: ₹1000
  • जास्तीत जास्त जमा रक्कम: जास्तीत जास्त रक्कमेसाठी कोणतीही मर्यादा नाही.
  • Post office FD टॅक्स लाभ: फक्त 5 वर्षाच्या FD वर Section 80C अंतर्गत
  • अकस्मात रक्कम काढण्याचा कालावधी: 6 महिन्यानंतर शक्य
  • व्याज गणना: तिमाही चक्रवाढ

Post Office Fixed Deposit Scheme 2025 फायदे

पोस्ट ऑफिस एफडी त्यांच्या गुंतवणूकदारांना अनेक फायदे देते. हे फायदे कोणते आहेत ते आपण खाली पाहूया:

  • पोस्ट ऑफिस एफडी योजनेची अंमलबजावणी केंद्र सरकार द्वारे केली जाते त्यामुळे ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे.
  • तुम्ही तुमच्या गरजेनुसार 1 ते 5 वर्षाच्या कालावधीसाठी FD उघडू शकता.
  • 5 वर्षाच्या FD वर कर सवलत उपलब्ध आहे.
  • Post office FD मध्ये नामांकन सुविधा उपलब्ध आहे.
  • Post office FD चे व्याज तिमाही चक्रवाढ पद्धतीने दिले जाते, त्यामुळे जास्त परतावा मिळतो.
  • अकस्मितपणे पैशाची गरज भासल्यास तुम्ही 6 महिन्यानंतर FD काढू शकता.
हे वाचा 👉  बेस्ट 5 पर्सनल लोन ॲप्स डाऊनलोड करा | best 5 personal loan apps download

Post Office Fixed Deposit Scheme 2025 व्याजदर

पोस्ट ऑफिसने Fixed Deposit Scheme अंतर्गत गुंतवणूकदारांनी केलेल्या वेगवेगळ्या कार्यकाळांवर वेगवेगळे व्याजदर निश्चित केले आहेत. वेगवेगळ्या कार्यकाळांवर व्याजदर किती आहेत? हे आपण खाली पाहूया:

  • 1 वर्ष कार्यकाल: 6.9% व्याजदर
  • 2 वर्ष कार्यकाल: 7.00% व्याजदर
  • 3 वर्ष कार्यकाल: 7.10% व्याजदर
  • 5 वर्ष कार्यकाल: 7.50% व्याजदर

Post office FD वर Senior Citizens साठी वेगळा  व्याजदर उपलब्ध नाही.

Post office FD व Bank FD मधील फरक

पोस्ट ऑफिस एफडी व बँक एफडी ही दोन्ही पर्याय गुंतवणुकीसाठी चांगले आणि सुरक्षित आहेत. तरी देखील या दोन एफडी मध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत ते आपण खाली पाहूया:

  • पोस्ट ऑफिस एफडी चे व्याजदर हे 6.90% ते 7.50% आहेत तर, बँक एफडीचे व्याजदर हे बँकिंग नुसार बदलतात.
  • पोस्ट ऑफिस एफडी ही सरकारद्वारे समर्थित असते तर, बँक एफडी ही बँकेच्या क्रेडिट रेटिंग वर अवलंबून असते.
  • पोस्ट ऑफिस एफडी चा कार्यकाल हा 1,2,3 आणि 5 वर्ष असतो तर, बँक एफडी चा कार्यकाल अगदी काही दिवस ते 10 वर्षापर्यंतचा असतो.
  • पोस्ट ऑफिस बँक एफडी मध्ये फक्त 5 वर्षाच्या एफडीवर कर सवलत मिळते तर, बँक एफडी मध्ये कर सवलत ही फक्त काही बँकांमध्येच उपलब्ध आहे.

Post Office Fixed Deposit खाते कोण उघडू शकतो?

पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉझिट खाते कोणाला उघडता येते हे आपण खाली पाहूया:

  • भारतीय नागरिक
  • पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉझिट योजनेअंतर्गत संयुक्त खाते उघडण्याची ही सुविधा उपलब्ध आहे.
  • पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉझिट योजनेअंतर्गत 18 वर्षापेक्षा आतील मुलांच्या नावावर खाते उघडता येते.
हे वाचा 👉  स्पॅम कॉल्सपासून त्रस्त आहात? ‘ही’ सेटिंग करा आणि टेन्शनमुक्त व्हा! Block spam calls from WhatsApp

Post Office Fixed Deposit Scheme 2025 आवश्यक कागदपत्रे

पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉझिट स्कीम अंतर्गत खाते उघडण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ही कागदपत्रे कोणती आहे ते आपण खाली पाहूया:

  • आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो

Post office fixed deposit scheme 2025 खाते कसे उघडायचे?

पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉझिट खाते कसे उघडायचे? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉझिट खाते उघडण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या Post Office शाखेमध्ये जावे लागेल.
  • Post Office शाखेमध्ये गेल्यानंतर तेथे तुम्हाला पोस्ट ऑफिस एफडी चा अर्ज घेऊन त्या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील.
  • त्यानंतर तुम्हाला किमान ₹1000 किंवा त्याहून अधिक रक्कम जमा करावी लागेल.
  • सर्वात शेवटी पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉझिट खाते उघडल्यानंतर तुम्हाला पासबुक दिले जाईल.

अशा पद्धतीने तुम्ही पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉझिट खाते उघडू शकता.

सदर लेखामध्ये आपण Post Office Fixed Deposit Scheme 2025 चे नवीन व्याजदर आणि नियम काय आहेत? याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये एफडी स्वरूपात गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page