नमस्कार शेतकरी बांधवांनो, या पोस्टमध्ये आपण नमो शेतकरी योजनेचा 6 वा हप्ता राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे? याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया.
नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेविषयी थोडक्यात..
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू केली आहे. नमो शेतकरी योजना राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपये याप्रमाणे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये मिळते. यामुळेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाची योजना आहे.
नमो शेतकरी योजनेचा 6 वा हप्ता कधी मिळणार?
आतापर्यंत राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेचे 5 हप्ते राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले आहेत. सदर योजनेचा 5 वा हप्ता 5 नोव्हेंबर 2024 मध्ये वितरित करण्यात आला होता.
आता राज्यातील शेतकऱ्यांना सदर योजनेचा 6 वा हप्ता कधी मिळणार? याची उत्सुकता लागली आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या 6 व्या हप्त्याबाबत सरकारकडून सध्या तरी कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, सदर योजनेच्या मागील हप्त्याच्या वितरणाचे वेळापत्रक पाहून 6 वा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो.
नमो शेतकरी योजनेचा स्टेटस ऑनलाइन कसा तपासता येतो?
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे की नाही हे ऑनलाइन कसे तपासायचे? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:
- सर्वप्रथम तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.👇🏼👇🏼 https://nsmny.mahait.org/
- त्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी महा सन्मान निधी स्टेटस किंवा Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.
- नंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका.
- त्यानंतर तुम्हाला तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला आहे का याची स्थिती पाहता येते.
अशा पद्धतीने तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा स्टेटस पाहू शकता.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नवीन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेच्या नवीन नोंदणीसाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. सदरची कागदपत्रे कोणती आहे ते आपण खाली पाहूया:
- आधार कार्ड
- 7/12 आणि 8-अ उतारा
- फेरफार
- रेशन कार्ड
- बँक खाते तपशील (आधार नंबरशी लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे.)
सदर योजनेबाबत महत्त्वाचे म्हणजे, राज्यातील जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत. त्यांना या योजनेसाठी स्वतंत्रपणे नवीन नोंदणी करण्याची गरज नाही. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असलेले शेतकरी आपोआपच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी ठरतात.
नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी जर तुम्ही नव्याने अर्ज करू इच्छित असाल तर, त्याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:
- सर्वप्रथम तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.👇🏼👇🏼 https://nsmny.mahait.org/
- अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड च्या साह्याने लॉगिन करणे आवश्यक आहे.
- लॉगिन केल्यानंतर सदर योजनेचा अर्ज ओपन होईल, या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती व आधार क्रमांक आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून अर्ज सबमिट करा.
अशा पद्धतीने तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अर्ज ऑनलाइन भरू शकता.
या पोस्टमध्ये आपण नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेचा 6 वा हप्ता राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनाकडून कधी जमा केला जाणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. या माहितीनुसार सदर योजनेचा 6 वा हप्ता लवकरच वितरित करण्याचे अधिकृत घोषणा राज्य सरकारकडून करण्यात येईल. धन्यवाद!