व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 बिनव्याजी कर्ज👈  20000 तत्काळ कर्ज

आता घरबसल्या रेशन कार्ड E-KYC प्रक्रिया करता येते अगदी सोप्या पद्धतीने..पहा संपूर्ण माहिती.! | Ration card ekyc online

आपण आज या पोस्टच्या माध्यमातून रेशन कार्ड ई-केवायसी प्रक्रिया घरबसल्या कशी करायची? याबाबतची संपूर्ण माहिती अगदी मोजक्या शब्दांमध्ये पाहणार आहोत. जेणेकरून ही माहिती तुम्हाला समजण्यास सोपी जाईल.

रेशन कार्ड ई-केवायसी (E-KYC) म्हणजे Electronic Know Your Customer प्रक्रिया असून यामध्ये रेशन कार्ड धारकांना त्यांचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करावे लागते.

रेशन कार्डची ई-केवायसी करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे रेशन कार्ड आधार कार्डशी जोडून केंद्र सरकारकडून वितरित करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची सबसिडी किंवा लाभ योग्य व्यक्तीलाच मिळावा. त्याचबरोबर बनावट रेशन कार्डांना प्रतिबंध बसावा हा उद्देश समोर ठेवून प्रशासनाने रेशन कार्ड ई-केवायसी मोहीम हाती घेतली आहे.

रेशन कार्ड ई-केवायसी करण्याचे फायदे

रेशन कार्डची ई-केवायसी करण्याचे अनेक महत्त्वाचे फायदे आहेत. ते फायदे कोणते आहेत हे आपण खाली पाहूया:

  • रेशन कार्ड ई-केवायसी केल्यामुळे कोणत्याही कागदपत्राशिवाय जलद पडताळणी करणे सोपे जाते.
  • रेशन कार्ड ई-केवायसी केल्यामुळे रेशन कार्ड धारकाची माहिती डिजिटल रेकॉर्डमध्ये सुरक्षित तर राहतेच त्याबरोबर ऑनलाईन उपलब्ध होते.
  • रेशन कार्डची ई-केवायसी केल्यामुळे बोगस रेशन कार्ड रोखण्यास मदत होते. म्हणजेच या डिजिटल रेकॉर्डमुळे सुस्पष्टता आणि पारदर्शकता येते.
  • रेशन कार्ड ई-केवायसी मुळे सरकारी योजनांची अनुदान यादी लाभ मिळवण्यास सोपे जाते.
  • बायोमेट्रिक सत्यापन केल्यामुळे गैरवापर आणि अपात्र लाभार्थ्यांना आळा बसेल.
  • रेशन संबंधित सर्व माहिती डिजिटल रेकॉर्डमध्ये असल्यामुळे रेशन कार्ड अपडेट तुम्ही घरबसल्या करू शकता.
हे वाचा-  यंदा दिवाळीत पण पाऊस पडणार का ? पुढील महिन्याचा हवामान अंदाज काय सांगतो पहा.

रेशन कार्ड ई-केवायसी प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे

रेशन कार्डची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. सदरची महत्त्वाची कागदपत्रे कोणती आहेत? हे आपण खाली पाहूया:

  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड

रेशन कार्ड ई-केवायसी करण्यासाठी तुमच्याकडे वरील फक्त दोनच कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ई-केवायसी प्रक्रियेचा प्राथमिक आधार म्हणजे रेशन कार्ड हे आहे. कारण याच्या माध्यमातूनच तुम्ही ई-केवायसीची सत्यापन प्रक्रिया सुरू करू शकता. म्हणून रेशन कार्ड महत्त्वाचे कागदपत्र आहे. त्याचबरोबर आधार कार्ड देखील खूप महत्त्वाचे आहे कारण आधार कार्ड वापरूनच तुमचे रेशन कार्ड ई-केवायसी पूर्ण केली जाते.

रेशन कार्ड ई-केवायसी घरबसल्या अशा पद्धतीने करा

रेशन कार्ड ई-केवायसी तुम्ही घरबसल्या कशी करायची याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • सर्वप्रथम तुम्हाला रेशन कार्ड ई-केवायसी करण्यासाठी फूड अँड लॉजिस्टिक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला Ration Card e-KYC Online या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे, रेशन कार्ड क्रमांक जो 12 अंक आहे तो आणि कॅप्च्या कोड भरावा लागेल.
  • वरील सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्या आधार कार्ड ज्या मोबाईल नंबर ला लिंक आहे त्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल.
  • सदर ओटीपी योग्य त्या ठिकाणी टाकल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांची पडताळणी प्रक्रिया सुरू होईल.
  • रेशनकार्ड ई-केवायसी प्रक्रियेसाठी बायोमेट्रिक तपासणीची आवश्यकता असते ज्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल.
  • सर्व बायोमेट्रिक डेटा संकलित झाल्यानंतर तुम्ही प्रोसेस बटणावर क्लिक करून रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण करू शकता.
हे वाचा-  इंटरनेट शिवाय करा यूपीआय द्वारे पेमेंट... पहा सविस्तर! | Pay your bill without internet with UPI

अशा पद्धतीने तुम्ही घरी बसून रेशन कार्डची ई-केवायसी प्रक्रिया सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकता.

या पोस्टमध्ये आपण रेशन कार्डची ई-केवायसी प्रक्रिया घरी बसून मोबाईल वरून कशी करायची? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. वरील माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची रेशन कार्ड ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून सरकार करून मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकता. जर तुम्ही रेशन कार्ड ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लाभ घेता येणार नाही. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page