व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मोबाईल द्वारे अर्ज कसा करावा

तुम्हालाही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या “मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण” योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही आता हा अर्ज तुमच्या मोबाइलद्वारे अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. कारण, महिलांना अर्ज करणे सोपे जावे म्हणून, महाराष्ट्र सरकारने नवीन “नारी शक्ती दूत” नावाचं ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे. तुम्ही हे ॲप्लिकेशन Google Play Store वरून डाउनलोड करून दिलेल्या या योजनेसाठी अर्ज करू शकता.

या स्टेप चा वापर करून लाभ मिळवण्यासाठी अर्ज करा

  • सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअरवरून “नारीशक्ती दूत” ॲप शोधायचे आहे. तुम्ही “नारीशक्ती ॲप” असेही सर्च करू शकता. हे ॲप शोध परिणामांमध्ये प्रथम क्रमांकावर दिसेल. ॲप शोधल्यानंतर, “इन्स्टॉल” बटणावर क्लिक करून ते तुमच्या मोबाइलमध्ये डाउनलोड आणि इंस्टॉल करा.
  • आता ॲप्लिकेशन उघडा. उघडल्यानंतर, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करून ॲप्लिकेशनमध्ये लॉगिन करायचे आहे. तुम्ही प्रविष्ट केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवले जाईल. तो ओटीपी वापरून तुमचे खाते सत्यापित करा आणि लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर, तुमच्या समोर एक पॉप-अप विंडो उघडेल ज्यामध्ये “प्रोफाइल अपूर्ण आहे. आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा” असे लिहिलेले असेल. त्या पॉप-अप विंडोवर क्लिक करा आणि तुमची वैयक्तिक माहिती भरा.
  • तर आता तुमच्यासमोर तुमची प्रोफाइल अपडेट करण्यासाठी पर्याय येतील.
  • ऑफिसमध्ये तुम्हाला सूचना दिली जाईल की तुम्ही महिलांचे पूर्ण नाव टाकावे.
  • तसेच, तुम्ही तुमचा ईमेल आयडी टाकू शकता, मात्र हे पर्याय तुम्ही रिकामा ठेवूनही चालू शकते.
  • तुम्हाला तुमचा जिल्हा आणि तालुका निवडायचा आहे, तसेच तुम्ही कोणत्या प्रकारची नारी शक्ती आहात हे निवडायचे आहे. उदाहरणार्थ, तुम्ही जर अंगणवाडी सेविका किंवा बचत गटात अध्यक्ष असाल तर तुम्हाला संबंधित पर्याय निवडायचा आहे.
  • हे सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला “अपडेट करा” बटणावर क्लिक करायचे आहे.
हे वाचा-  शेतामध्ये प्राणी शिरताच मोबाईल मध्ये येणार मॅसेज | IoT-Based System for Crop Protection for Animals

प्रोफाइल अपडेट झाल्यानंतर तुमच्यासमोर चार पर्याय दिसतील. नारीशक्ती दूध यावर क्लिक करायचे असल्यास, आता तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी त्या लिंकवर क्लिक करायचे आहे. पर्याय वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या लोकेशनची परवानगी मागितली जाईल. “Allow” बटनवर क्लिक केल्यानंतर, आता सर्वात महत्त्वाची पायरी सुरू होणार आहे – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे.

  • तर हा फॉर्म भरताना यामध्ये तुम्हाला महिलेचे पूर्ण नाव टाकायचे आहे.
  • त्यानंतर महिलेच्या पतीचे किंवा त्यांच्या वडिलांचे नाव टाकायचे आहे.
  • त्यानंतर महिलेची जन्मतारीख टाकायची आहे.
  • महिलेचा जिल्हा, शहर आणि ग्रामपंचायत/महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत निवडा.
  • त्यानंतर तुमच्या एरियाचा पिनकोड टाका.
  • त्यानंतर तुम्हाला महिलेचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे.
  • आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मोबाईल नंबर टाकायचा आहे.
  • मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला महिलेचा आधार क्रमांक टाकायचा आहे. लक्षात घ्या की आधार क्रमांक मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर तुम्हाला समोर एक पर्याय दिसेल. तुम्ही जर महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर “होय” बटणावर क्लिक करा. तुम्ही जर लाभ घेत नसाल तर “नाही” बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर खाली तुम्हाला वैवाहिक स्थिती विचारली जाईल. तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे.

तर इथपर्यंत संपूर्ण झाल्यानंतर, जर तुमच्यासमोर अर्जदाराचे खाते असेल तर बँकेची माहिती दाखल करणे आवश्यक आहे. लक्षात घ्या की, महिला योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे बँकेमध्ये खाते असणे अत्यंत आवश्यक आहे. जर खाते असल्यास, तुम्हाला या फॉर्ममध्ये खालील माहिती दाखल करावी लागेल:

  • बँकेचे संपूर्ण नाव
  • खातेधारकाचे नाव
  • बँक खात्याचा क्रमांक
  • बँकेचा IFSC कोड
  • जर तुमचा आधार क्रमांक बँकेच्या खात्याशी लिंक असल्यास, तुम्हाला “होय” किंवा “नाही” वर क्लिक करावा लागेल.
हे वाचा-  Pm Kisan Yojana Rejected Farrmers list :- पी एम किसान योजनेतून हे शेतकरी अपात्र झाले, यादी पहा

ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर, आता तुम्हाला या फॉर्ममध्ये योजनेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. योजनेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात असावीत. JPG, PNG इत्यादी इतर स्वरूपेही स्वीकार्य आहेत. या कागदपत्रांची आकारमान काही KB मध्ये असावे. मोठ्या आकाराची कागदपत्रे अपलोड करू नका.

  • आधार कार्ड
  • अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे हमी प्रमाणपत्र
  • बँकेचे पासबुक
  • अर्जदाराचा फोटो

आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर, तुम्हाला “एक्सेप्ट हमीपत्र आणि डिस्क्लेमर” असे दोन पर्याय दिसतील. तुम्हाला दोन्ही पर्यायांवर टिक करणे आवश्यक आहे. त्यानंतर, तुमच्यासमोर “माहिती जनक करा” असे बटन दिसेल. या बटनावर क्लिक करा. “जतन करा” या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्ही भरलेली सर्व माहिती तुम्हाला दिसेल. आता, जर तुम्हाला या माहितीमध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता. अन्यथा, जर सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्ही “सबमिट करा” या पर्यायावर क्लिक करू शकता. फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला सुरुवातीला नोंदवलेल्या मोबाइल नंबरवर एक OTP मिळेल. तुम्हाला हा OTP टाइप करणे आवश्यक आहे. OTP टाइप केल्यानंतर, तुमचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट होईल. आता, काही दिवसांमध्ये तुमचा फॉर्म तपासला जाईल. मंजूरी मिळाल्यास, तुमच्या खात्यात सरकारकडून ₹1500 ची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल.

हे वाचा-  PMEGP LOAN SCHEME |PMEGP योजनेअंतर्गत दहा रुपये लाख रुपयांच्या कर्जावर 35% सबसिडी

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page