व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्यातील 8 वा हप्ता पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार या तारखेला..

या पोस्टमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8 वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये राज्य शासनाकडून कधी वितरित केला जाणार आहे? त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकार काही नवीन निकष लागू करणार आहे. हे नवीन निकष कोणते आहेत? याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी थोडक्यात..

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये महिलांच्यासाठी सुरू केलेली एक योजना आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्याचबरोबर त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील महिलांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य सरकार ही योजना राज्यामध्ये राबवत आहे. त्यामुळेच महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत ही राज्य सरकारने राबवलेली एक महत्त्वकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते.

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासण्यासाठी खाली क्लिक करा.

या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये दरमहा ₹1500 वितरित केले जातात. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास सदर योजनेची रक्कम 2100 रुपये प्रति महिना करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्यामध्ये महायुती चे सरकार स्थापन झाले आहे. त्यानुसार महायुतीकडून या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या वाढीव रकमेची तरतूद महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात येईल असे सांगितले आहे. राज्याचा अर्थसंकल्प 1 मार्च 2025 रोजी अर्थमंत्री अजित पवार सादर करणार आहेत. यामध्ये त्यांनी या योजनेच्या वाढीव रकमेची तरतूद केल्यास एप्रिल महिन्यापासून राज्यातील पात्र महिलांना प्रति महिना 2100 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.

हे वाचा 👉  मॅपल्स MapmyIndia ॲप चालवले का? गुगल मॅप विसरून जाल| India's No.1 MapmyIndia Mappls App

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्यातील 8 वा हप्ता मिळणार या दिवशी..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 7 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यातील 8 वा हप्त्या कधी येणार याची उत्सुकता राज्यातील महिलांना लागली आहे. यादरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी होणार आहे असे प्रशासनाकडून सांगितले होते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातील सदर योजनेचा 8 वा हप्ता येणार की नाही याबद्दल मीडियामध्ये उलट सुलट चर्चा होत्या. पण उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या उलट सुलट चर्चांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्यातील 8 वा हप्ता 23 फेब्रुवारी पासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे असे सांगून त्यांनी या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. सदर योजनेचा 8 वा हप्ता 23 फेब्रुवारीपासून वितरित करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने बदलले निकष

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने काही निकष लागू केले आहेत. याचे कारण म्हणजे सदर योजनेसाठी सरकारने लागू केलेल्या अटी व शर्ती डावलून राज्यातील काही महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे असे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच राज्यातील पात्र व गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार काही नवे निकष लावणार आहे.

हे वाचा 👉  कोर्टाने SBI बँकेला दिला इशारा, आता कमी CIBIL score असलेल्यांनाही कर्ज मिळणार.

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासण्यासाठी खाली क्लिक करा.

नवीन निकषांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आता दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान त्यांचे बँक खाते ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेमध्ये जाऊन ई-केवायसी करून हयातीचा दाखला काढावा लागणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता या महिला असणारा अपात्र..

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या अटी व शर्ती सरकारकडून लावण्यात आल्या होत्या. या अटी व शर्ती डावलून राज्यातील बहुतांश महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आले आहे. यामध्ये ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपये पेक्षा जास्त आहे त्याचबरोबर ज्या महिलांनी इतर सरकारी योजनेचा लाभ घेतला आहे. ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे. ज्या महिलांनी वयोमर्यादेची अट डावलली आहे. अशा सर्व महिलांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे म्हणजेच त्यांना या योजनेसाठी अपात्र करण्यात येणार आहे. यासाठी सरकार जिल्हास्तरावरून अर्जाची पडताळणी करून यामध्ये ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना या योजनेचा लाभ यापुढे घेता येणार नाही. या योजनेअंतर्गत आणखी एक धक्कादायक बाब असे आढळून आले आहे की राज्यातील सुमारे 16.5 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर पैसे वितरित केल्यानंतर त्यांच्या अर्जावरील नाव व पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नाव यामध्ये तफावत आढळून आली आहे.

हे वाचा 👉  गाडीची RC कशी डाउनलोड करायची |Digilocker ची मदत घेऊन गाडीची RC डाऊनलोड करा.

वरील सर्व कारणांमुळेच सरकारची एक प्रकारे फसवणूक झाल्यामुळे या योजनेबाबत अर्ज पडताळणी करून अपात्र महिलांच्या बाबतीत कठोर निर्णय घेत आहे.

या पोस्टमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्यातील 8 वा हप्ता कोणत्या दिवशी सरकारकडून वितरित करण्यात येणार आहे? त्याचबरोबर या योजनेच्या निकषांमध्ये सरकारकडून काही बदल करण्यात आले आहेत. ते बदल कोणते आहेत? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page