व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

आधार कार्डला खरंच Expiry Date असते का? आधार कार्ड पुन्हा नव्याने बनवावे लागते का? जाणून घ्या सविस्तर..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

सध्या भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड एक खूपच महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सरकारी योजनांपासून ते बँक खात्यांपर्यंत अशा महत्त्वाच्या विविध ठिकाणी आधार कार्डची मागणी केली जाते. परंतु, तुमच्या मनामध्ये असा प्रश्न कधी आला आहे का? ‘आधार कार्ड ला एक्सपायरी डेट असते का?’ आणि ‘काही वर्षानंतर आधार कार्ड पुन्हा नव्याने बनवावे लागते का?’

या पोस्टमध्ये आपण खरंच आधार कार्ड एक्सपायर होते का? त्याचबरोबर काही ठराविक वर्षानंतर आधार कार्ड पुन्हा बनवावे लागते का? या दोन्ही प्रश्नांचे निरसन करूया.

आधार कार्ड विषयी थोडक्यात..

आधार कार्ड हे भारत सरकार द्वारे भारतातील नागरिकांना दिले गेलेले एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. आधार कार्ड वर 12 अंकी नंबर छापलेला असतो जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (Unique Identification Authority of India) जारी केलेला आहे. हा नंबर भारतत कुठेही व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा आहे. देशातील कोणतीही व्यक्ती आधारसाठी नोंदणी करू शकते, जर ती व्यक्ती भारताचा रहिवासी असेल आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वय आणि लिंग विचारत न घेता UGC द्वारे विहित केलेल्या पडताळणी प्रक्रियेचे समाधान करत असेल. देशातील प्रत्येक व्यक्ती आधार कार्ड साठी फक्त एकदाच नोंदणी करू शकते. नाव नोंदणी करणे पूर्णपणे मोफत आहे. आधार कार्ड हे फक्त एक ओळखपत्र असून नागरिकत्वाचे प्रमाणपत्र नाही.

हे वाचा 👉  NLM scheme. शेळीपालन योजना

आधार नंबर ही प्रत्येक व्यक्तीची आयुष्यभराची ओळख आहे. त्याचबरोबर आधार क्रमांकमुळे तुम्ही सरकारी योजना, बँकिंग व्यवहार, मोबाईल सिम, इन्कम टॅक्स फायलिंग यासारख्या सुविधांचा लाभ घेऊ शकता. आधार कार्ड हे आता प्रत्येक गोष्टीसाठी अनिवार्य बनले आहे. ओळखीच्या पुराव्यासाठी सर्व ठिकाणी आधार कार्ड मागितले जाते, आणि ते देणे अनिवार्य आहे.

आधार कार्डची वैधता समाप्त होते का?

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (Unique Identification Authority of India) माहितीनुसार, आधार कार्ड ची वैधता कधीच समाप्त होत नाही. म्हणजेच, एकदा बनवलेले आधार कार्ड आयुष्यभरासाठी वैध असते. आधार कार्ड पुन्हा नव्याने बनवण्याची गरज नाही, परंतु काही बाबींमध्ये आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे असते. याबाबतची माहिती सविस्तरपणे आपण खाली पाहूया:

आधार कार्ड 10 वर्षानंतर अपडेट करणे का गरजेचे आहे?

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या माहितीनुसार, जरी तुम्ही तुमच्या आधार कार्ड 10 वर्षांनंतरही अपडेट केले नसले तरी आधार कार्ड अवैध होत नाही. पण सरकार आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्याकडून वेळोवेळी तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्याचा सल्ला दिला जातो. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे भविष्यात तुम्ही कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेताना अथवा आर्थिक व्यवहारांमध्ये तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागू नये.

कधी कधी तुमचा पत्ता बदलतो, मोबाईल नंबर ही बदललेला असतो, बायोमेट्रिक मध्ये थोडेफार बदल झालेले असतात. अशावेळी आधार कार्ड अपडेट करणे खूप गरजेचे असते.

हे वाचा 👉  आता मिळवा ऑनलाईन पद्धतीने उत्पन्नाचा दाखला... असा करा अर्ज!

लहान मुलांचे आधार कार्ड 2 वेळा अपडेट करणे अनिवार्य

जर तुमच्या मुलांचे वय 5 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असेल, आणि त्यांचे आधार कार्ड बनवले असेल तर, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या नियमांनुसार,5 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या मुलांच्या आधार कार्डला 2 वेळा अपडेट करणे अनिवार्य आहे. यामध्ये..

  • पहिल्यांदा आधार कार्ड अपडेट हे मुल 5 वर्षाचे झाल्यानंतर तर,
  • दुसऱ्यांदा आधार कार्ड अपडेट हे सदरचे मुल 15 वर्षाचे झाल्यानंतर

असे 2 वेळा आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही या दोन्ही कालावधीमध्ये आधार कार्ड अपडेट केले नाही तर ते आधार कार्ड अमान्य ठरू शकते.

लहान मुलांच्या आधार कार्ड मध्ये नेमके काय अपडेट केले जाते?

लहान मुलांचे आधार कार्ड अपडेट करताना त्यामध्ये नवीन बायोमेट्रिक डिटेल्स जसे की फिंगरप्रिंट, डोळ्यांचे स्कॅन आणि फोटो पुन्हा घेतला जातो.

लहान मुलांचे आधार कार्ड अपडेट प्रक्रियाही पूर्णपणे मोफत आहे. लहान मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही.

वरिष्ठ नागरिक आधार कार्ड अपडेट प्रक्रिया आणि शुल्क

वरिष्ठ नागरिकांना त्यांच्या आधार कार्ड मध्ये त्यांचे नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर आणि बायोमेट्रिक हे महत्त्वाचे अपडेट केले जातात. यासाठी सामान्य शुल्क द्यावे लागते‌.आधार कार्ड अपडेट ची प्रक्रिया आधार सेवा केंद्रामध्ये करता येते.

हे वाचा 👉  पैश्याने पैसा कसा वाढवायचा? SIP आणि कंपाऊंडिंग रिटर्न चे महत्व समजून घ्या.

आधार कार्ड ला कोणतीही एक्सपायरी डेट नसते ते आयुष्यभरासाठी वैध आहे. परंतु लहान मुलांचे आधार कार्ड सांगितलेल्या वयोमर्यादेमध्ये 2 वेळा अपडेट करणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर वरिष्ठ नागरिकांनी त्यांचे सुद्धा आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे जेणेकरून जेष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ त्याचबरोबर आर्थिक व्यवहार त्यांना विनाअडथळा करता येतील.

या पोस्टमध्ये आपण आधार कार्ड खरंच एक्सपायर होते का? त्याचबरोबर आधार कार्ड पुन्हा बनवावे लागते का? या दोन खूप महत्त्वाच्या प्रश्नांचे निरसन केले आहे. ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची असणार आहे. कारण तुमच्या मनामध्ये असलेल्या शंकांचे निरसन या माहितीतून झाले असेल अशी आशा आम्ही करतो. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page