व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पीएम एसी योजनेअंतर्गत या उन्हाळ्याला जुना एसी द्या,आणि नवीन 5-स्टार एसी घ्या,तोही सवलतीच्या दरात.. पहा संपूर्ण माहिती!|PM AC Yojana 2025

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

या वर्षीचा उन्हाळा तापमानाची नवनवीन शिखरे गाठताना दिसत आहे. शहर असो वा गांव सर्वत्र उन्हाचा कहर पहावयास मिळत आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे सुद्धा खूप त्रासदायक होत आहे. लहान मुले व वयोवृद्ध यांना तर हे ऊन सर्वात त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोठेही बाहेर जाण्यावर निर्बंध आले आहेत. या पार्श्वभूमीवरच केंद्र सरकारने एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी योजना जाहीर केली आहे. ही योजना म्हणजे प्रधानमंत्री एसी योजना 2025 होय.

ही योजना सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी खास करून राबविण्यात येणार आहे. या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे तीव्र उन्हापासून वाचण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या घरांमध्ये गारवा निर्माण करून, विजेची बचत व पर्यावरण पूरक जीवनशैलीत प्रस्थान देणे हा आहे.

या पोस्टमध्ये आपण प्रधानमंत्री एसी योजना 2025 बाबतची संपूर्ण माहिती पाहूया.

प्रधानमंत्री एसी योजना 2025 चे स्वरूप

या योजनेअंतर्गत जर तुमच्याकडे एखादा जुना एसी असेल, जो वारंवार बिघडतो त्याचबरोबर त्या एसीमधून थंड वारे नीट येत नाही आणि त्याला वीज जास्त लागते. असा एसी तुम्ही अधिकृत रिसायकल सेंटरमध्ये जमा करून त्या बदल्यात तुम्ही तेथून एक प्रमाणपत्र घ्यायचे आहे.

प्रमाणपत्र दाखवून तुम्ही नवीन 5-Star Rated AC खरेदी करू शकता. तसेच या एसीवर तुम्हाला तब्बल 60% पर्यंत सवलत मिळते.

सदरची योजना भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय आणि Bureau of Energy Efficiency(BEE) यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवली जात आहे. यामध्ये Voltas, LG, Blue Star यासारख्या भारतातील नामांकित कंपन्या सहभागी झाल्या आहेत.

हे वाचा 👉  मतदार यादीत नाव शोधणे| मतदार यादी डाउनलोड 2024 | मतदान कार्ड डाउनलोड करा व नवीन काढा. |Voting card download,list.

तुम्हाला रिसायकल सेंटर मधून मिळालेले प्रमाणपत्र स्वीकारून या कंपन्या तुम्हाला नवीन आणि ऊर्जा कार्यक्षम एसी स्वस्तात आणि सवलतीच्या दरामध्ये देतील.

पीएम एसी योजनेअंतर्गत वीज बिलात होणार कपात

या योजनेअंतर्गत तुम्ही नामांकित कंपन्यांकडून 5 Star Rating AC सवलतीच्या दरामध्ये खरेदी करून विजेची बचत करू शकता. सध्या एसीच्या वापरामुळे दरवर्षी एका कुटुंबाला किमान ₹10,000 पेक्षा जास्त वीज बिल भरावे लागते. परंतु जर नवीन 5 Star Rating AC मुळे विज बिल जवळपास ₹3000 ते ₹4000 पर्यंत कमी होऊ शकते.

या योजनेमध्ये देशातील काही राज्यांमधील वीज वितरण कंपनी ही सहभागी होणार असून, त्या देखील ग्राहकांना वीज बिलामध्ये अतिरिक्त सवलत देण्यास प्रयत्नशील असतील.

पीएम एससी योजना 2025 महत्त्वाचे मुद्दे

पीएम एससी योजना 2025 महत्त्वाचे मुद्दे आपण खाली पाहूया:

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे असलेला जुना एसी अधिकृत रिसायकल सेंटरमध्ये जमा करून त्या बदल्यात सर्टिफिकेट घेणे अनिवार्य आहे.
  • नामांकित कंपन्यांकडून तुम्ही नवीन 5 Star Rated AC घेणे बंधनकारक आहे.
  • या योजनेअंतर्गत एसी खरेदी करण्यासाठी सरकारकडून मोठी सवलत दिली आहे.
  • नवीन एसीमुळे वीज बिलामध्ये बचत त्याचबरोबर पर्यावरण आणि दीर्घकालीन वापर करता येणार आहे.

अर्ज कसा करायचा?

सध्या ही योजना प्रायोगिक तत्वावर देशाची राजधानी दिल्ली आणि देशातील काही प्रमुख शहरांमध्ये सुरू झाली आहे, परंतु लवकरच सदरची योजना संपूर्ण देशभरामध्ये लागू होणार आहे. जेव्हा ही योजना संपूर्ण देशभरामध्ये लागू होईल तेव्हा राज्यातील इच्छुक नागरिक संबंधित सरकारी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

हे वाचा 👉  या 30 लाख महिलांना अर्ज मंजूर असूनही मिळणार नाहीत पैसे|लाडकी बहीण योजना 3 हजार रुपये

अर्ज करताना अर्जदाराने खालील गोष्टी जवळ ठेवणे आवश्यक

  • जुन्या एसीची माहिती यामध्ये ब्रँड, मॉडेल नंबर इ.
  • रिसायकल सेंटरचे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड व विज बिल
  • बँक खाते तपशील (सवलतीचे पैसे थेट बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी)

ज्यावेळी पीएम एसी योजना 2025 संपूर्ण देशामध्ये लागू होईल त्यावेळी महाराष्ट्रातील इच्छुक नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतील या अनुषंगाने या पोस्टमध्ये आपण या योजनेची संपूर्ण माहिती पाहिली आहे. वरील माहितीच्या आधारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन तीव्र उन्हाळ्यापासून स्वतःचे संरक्षण करू शकाल. त्याचबरोबर वीजेची बचत करून पैशाची बचतही करू शकाल. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page