व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ,फक्त इतक्या कमी किमतीत

एमजी मोटर्स ही एक ब्रिटिश ऑटोमोटिव्ह कंपनी आहे. ह्या कंपनीची स्थापना सन 1924 मध्ये झाली होती. पण पुढे 2005 मध्ये कंपनीची आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे ,ह्या कंपनीचे SAIC मोटर्स कॉर्पोरेशन लिमिटेड ने एमजी मोटर्स आधी ग्रहण केले. पण या मोटर कंपनीचे नाव बदलले नाही . एमजी मोटर्स ने भारतामध्ये सन 2017 मध्ये प्रवेश केला . ही कंपनी या कंपनीने भारतामध्ये यांची पहिली गाडी एमजी हेक्टर लॉन्च केली .

गाडी लॉन्च करताच या गाडीला उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे , भारतामध्ये प्रोडक्शन चालू केले .त्यांचे कंपनी गुजरात मध्ये हलोल येथे स्थित आहे .ते सध्या त्यांच्या सर्व प्रकारच्या मॉडेल तिथे मॅन्युफॅक्चर करतात .आतापर्यंत डिझेल व पेट्रोल गाड्या मॅन्युफॅक्चर केल्या जात होत्या, पण आता त्यांनी इलेक्ट्रिक क्षेत्रातही त्यांच्या गाड्या भारतामध्ये लॉन्च केल्या आहेत. आज आपण एमजी कंपनीच्या इलेक्ट्रिक कार बद्दल माहिती घेणार आहोत. तसे पाहिले तर एमजी कंपनीच्या एमजी झेड एस इ व्ही, एमजी हेक्टर इ व्ही, एमजी कॉमेट इ व्ही अशा मॉडेल सध्या उपलब्ध आहेत, यामध्ये आपण एमजी कॉमेट इ व्ही याबद्दल माहिती घेणार आहोत.

हे वाचा-  टोयोटा भारतीय बाजारपेठेत 4 नवीन SUV सादर करणार.. |काहीच दिवसांत भेटीला येतील टोयोटाच्या 4 SUV's

MG Comet EV फीचर्स

MG Comet EV ही गाडी खूप साऱ्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींसोबत आहे . यामध्ये खालील फीचर्स अवेलेबल आहेत.

  • Smart स्टार्ट सिस्टम
  • 10.25 इंच टच स्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम
  • ड्युअल फ्रंट एअरबॅग
  • 3 पॉईंट सीट बेल्ट
  • ISO फिक्स चाइल्ड सीट
  • टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम
  • डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
  • 100वोईस कमांड
  • रियर पार्किंग कॅमेरा
  • ऑल साईड सेन्सर्स
  • वायरलेस अँड्रॉइड आणि एप्पल कार प्ले सिस्टम
  • डिजिटल key

MG Comet EV गाडीचे फायदे

एमजी कॉमेंट ev ही गाडी मध्यमवर्गीय कुटुंबासाठी कमी पैशांमध्ये त्यांची गरजा पूर्ण करू शकते . गाडी स्वस्त आणि फायदेशीर आहे. ही गाडी चार्ज केल्यानंतर कमीत कमी 250 किलोमीटर ची रेंज कंपनी देते. त्यामुळे शहरी भागामध्ये ही गाडी वापरण्यासाठी अगदी योग्य आहे . कमी पैशांमध्ये सर्व आधुनिक वैशिष्ट्ये या गाडीमध्ये आहेत. शहरी भागामध्ये पार्किंग प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात असतो ,कमी जागेमध्ये ही गाडी अगदी सहजरित्या पार होऊ शकते .तुम्हाला जॉब वर अपडाऊन करण्यासाठी किंवा कॉलेजला जाण्यासाठी कमी खर्चामध्ये हा एक चांगला ऑप्शन आहे.

Comet EV चे डायमेन्शन

ह्या गाडीचा आकार कॉम्पॅक्ट व शहरी वापरासाठी योग्य आहे. कारण याची लांबी फक्त 2.9 मीटर व रुंदी 4.5 फूट इतकी आहे. त्यामुळे ट्रॅफिक मध्ये अरुंद रस्त्यांमध्ये ही गाडी अगदी सहजरित्या चालवण्याचा चालवता येते .ह्या गाडीमध्ये 17.3 Kwh बॅटरी दिली गेलेली आहे .या गाडीची मोटर 6.8 bhp पावर निर्माण करते ,140 nm टॉर्क . या गाडीची रेंज पूर्ण चार्जवर अडीचशे ते तीनशे किलोमीटर इतकी आहे.

हे वाचा-  तुमच्या गाडीवरील दंड अशा प्रकारे होईल माफ | vehicle challan check

या गाडीची किंमत

या गाडीची किंमत टाटा टियागो ev पेक्षा पण कमी आहे. Comet या गाडीची किंमत 798000 पासून 820000 पर्यंत आहे. ह्या गाडीची किंमत इलेक्ट्रिक कारच्या किमतीत खूपच कमी आहे. ही गाडी भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. ही गाडी खरेदी केल्यानंतर तुम्हाला पहिल्या महिन्याभराची चार्जिंगची कॉस्ट हा कंपनीकडून दिला जातो. गाडीची रचना बिग इन साईड कॉम्पॅक्ट आऊटसाईड अशा फिलोसॉफीनुसार तयार केलेल्या केलेला आहे.

250 किलोमीटरची रेंज

MG comet EV मध्ये 17.3 Kwh लिथियम आयन बॅटरी चा वापर केलेला आहे. ही बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यानंतर 230 ते 250 किलोमीटर पर्यंत आहे .comet ev मध्ये तीन ड्राइव्ह मोड आहेत. ह्या गाडीमध्ये 3.3 kw चार्जर दिलेला आहे. त्यामुळे 7 तासांमध्ये ही गाडी फुल चार्ज होते. गाडी चार्ज होण्यासाठी पूर्ण महिन्यासाठी फक्त 519 रुपये इतका खर्च येतो. त्यामुळे ही मध्यमवर्गीय कुटुंबाला कमी किमतीत खिशाला परवडणारी गाडी आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment