व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

तुषार व ठिबक सिंचन योजनेअंतर्गत, राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 80% अनुदान.. जाणून घ्या या योजनेची संपूर्ण माहिती!

Tushar Thibak Sinchan Yojana Maharashtra

नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारकडून फक्त शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची योजना राबवली जाते. ती योजना म्हणजे तुषार व ठिबक सिंचन योजना होय. या योजनेमार्फत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीमध्ये ठिबक व तुषार सिंचन बसवण्यासाठी राज्य शासनाकडून 80% अनुदान देण्यात येते. सदर लेखामध्ये आपण तुषार व ठिबक सिंचन योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये या योजनेचे फायदे, पात्रता, अर्ज कसा करायचा? त्याचबरोबर जमिनीच्या क्षेत्रानुसार किती अनुदान दिले जाते? वरील मुद्द्यांचे आपण विस्तृत विश्लेषण या लेखाच्या माध्यमातून करूया, जेणेकरून या माहितीचा उपयोग राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होईल व ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

तुषार ठिबक सिंचन योजनेविषयी थोडक्यात..

महाराष्ट्रातील बहुतांश लोक हे शेती या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत,त्यामुळे शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे त्यांच्या कुटुंबांचा संपूर्ण उदरनिर्वाह शेती व्यवसायावरच अवलंबून आहे. पण शेती करत असताना शेतीसाठी पाणी हा एक मुख्य घटक आहे. राज्यामध्ये अतिवृष्टी व दुष्काळ या दोन संकटाचा शेती व्यवसायावर किंवा शेती क्षेत्रावर खूप मोठा परिणाम दिसून येतो, परिणामी या दोन संकटांमुळे शेतीचा पूर्ण हंगाम वाया जाताना दिसतो.

नवीन पोर्टलवरून तुमच्या जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

या सर्व शेतीविषयक समस्यांचा विचार करून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला पाहिजे तितकेच पाणी मिळावे व पाण्याची बचत देखील व्हावी या अनुषंगाने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीमध्ये सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तुषार ठिबक सिंचन योजना सुरू केली आहे.

तुषार व ठिबक सिंचन योजना उद्देश

  • राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये तुषार व ठिबक सिंचन सुविधा बसवण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • सिंचना अभावी शेतातील पिकांचे होणारे नुकसान कमी करणे.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयीची माहिती करून देणे.
  • पाण्याचा योग्य वापर करून कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पिकाचे उत्पादन घेणे, म्हणजेच कमी पाण्यामध्ये जास्त पिकांचे उत्पन्न घेणे.
  • राज्यातील शेती क्षेत्राला प्रोत्साहन देऊन या क्षेत्राचा विकास करणे.
हे वाचा-  लाडकी बहीण योजनेच्या अपार यशानंतर, राज्य सरकार लाडकी गृहिणी योजना आणणार.

तुषार व ठिबक सिंचन योजना फायदे

  • राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीमध्ये तुषार व ठिबक सिंचन प्रणालीसाठी आर्थिक अनुदान सरकारमार्फत दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये शेती करून जास्त उत्पादन निर्मिती करता येणार आहे.
  • या योजनेअंतर्गत पाण्याचा होणारा अतिवापर टाळून पाण्याची बचत होणार आहे.
  • शेती क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊन या क्षेत्राचा विकास होईल.
  • आधुनिक तंत्रज्ञाने शेती करून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होऊन शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध होणार आहे.

तुषार व ठिबक सिंचन योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान

तुषार व ठिबक सिंचन योजनेमार्फत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीमध्ये तुषार व ठिबक सिंचन बसवण्यासाठी एकूण 80% अनुदान राज्य सरकार द्वारे देण्यात येणार आहे. यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी 55% अनुदान व 25% पूरक अनुदान असे 80% अनुदान त्याच बरोबर इतर शेतकऱ्यांसाठी 45% अनुदान व 30% पूरक अनुदान म्हणजे एकूण 75% अनुदान देण्यात येणार आहे.

तुषार व ठिबक सिंचन योजनेच्या अटी, शर्ती व पात्रता

  • सदर योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे 7/12 आणि 8-अ उतारा असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकरी एससी, एसटी या प्रवर्गातील असेल तर त्याच्याकडे जातीचा दाखला असणे गरजेचे आहे.
  • अर्जदार शेतकऱ्यांनी 2017 च्या अगोदर कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबर साठी लाभ घेतला असेल तर शेतकऱ्याला पुढील 10 वर्षे त्या सर्वे नंबर वरती लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार शेतकऱ्यांनी 2018 नंतर कोणत्याही विशेष सर्वे नंबर साठी लाभ घेतला असेल तर सदर शेतकऱ्याला पुढील 7 वर्षे लाभ दिला जाणार नाही.
  • सदर योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्याकडे पाण्याच्या इलेक्ट्रिक पंपाचे कायमस्वरूपी वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. पंपाच्या वीज कनेक्शन चे विज बिल पुराव्यासाठी शेतकऱ्याने सादर करणे आवश्यक आहे.
  • सदर योजनेची लाभार्थी शेतकऱ्याला पूर्व मंजुरी मिळाली असेल, तर त्याने अधिकृत विक्रेत्याकडून सिंचनाचा संच विकत घेऊन शेतामध्ये बसवायचा आहे. त्याचबरोबर पूर्व मंजुरी मिळाल्याच्या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये खरेदी केलेली पावती अर्जासोबत पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी शेतकऱ्यांनी पूर्व मंजुरी मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत हा सिंचन संच बसवला नाही तर शेतकऱ्याची पूर्वसंमती रद्द करण्यात येईल आणि त्याला सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • एखाद्या शेतकऱ्याने पूर्व मंजुरी न घेता सिंचन संचाची उभारणी करून अनुदानासाठी अर्ज केला असल्यास असा शेतकरी सदर योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार नाही.
  • तुषार व ठिबक सिंचन योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला दिला जाणार आहे.
हे वाचा-  केंद्र सरकारकडून मोफत कंप्यूटर कोर्स CCC करण्याची संधी, MSCIT करण्याची गरज नाही

तुषार व ठिबक सिंचन योजना आवश्यक कागदपत्रे

कुक्कुटपालनासाठी 50% अनुदानाच्या दुसऱ्या योजनेसाठी खाली क्लिक करा. 👈

तुषार व ठिबक सिंचन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • जमिनीचा 7/12 आणि 8-अ उतारा
  • बँक खाते तपशील
  • 3 महिन्यापूर्वीचे वीज
  • तुषार किंवा ठिबक सिंचन संच खरेदी केलेले बिल
  • शेतकऱ्याचे पूर्वसंमती पत्र
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

तुषार व ठिबक सिंचन योजना अर्ज कसा करायचा?

सदर योजनेसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे. अर्ज कसा करायचा याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती खालीलप्रमाणे:

  • सर्वप्रथम तुम्हाला तुषार व ठिबक सिंचन योजने योजनेसाठी अर्ज करून लाभ घेण्यासाठी या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
  • त्यानंतर तुम्हाला होम पेज वरती शेतकरी योजना यावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल इथे तुम्हाला तुमचा Username विचारला आहे तो टाकायचा आहे.
  • त्यानंतर Captcha टाकून Login करायचे आहे.
  • पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, त्या पेज मध्ये सिंचन स्त्रोताबद्दल विचारलेली योग्य ती माहिती निवडायची आहे आणि जोडा या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक सिंचन साधने व सुविधा हा अर्ज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायचे आहे आणि जतन या बटणावरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल, इथे तुम्हाला 23 रुपये भरायचे आहेत.
हे वाचा-  लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा: महिलांमध्ये आनंदाचे वातावरण |ladaki bahin yojana 1st installment

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुषार व ठिबक सिंचन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

सदर लेखांमध्ये आपण महाराष्ट्र सरकारची तुषार व ठिबक सिंचन योजना जी फक्त राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाते या योजनेची माहिती आपण पाहिली आहे. या माहितीच्या आधारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page