व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

लाडक्या बहिणींना आता मिळणार मोफत सूर्यचुल, अर्ज कसा करायचा? पहा संपूर्ण माहिती!

नमस्कार, आजच्या लेखामध्ये आपण लाडक्या बहिणींना मोफत सूर्यचुलींचे वाटप होणार आहे, त्यासाठी अर्ज कसा करायचा? याबाबतची संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे पाहूया.

सूर्यचुली विषयी थोडक्यात..

सूर्यचूल ही आधुनिक सोलर कुकिंग सिस्टीम आहे. सूर्यचूल ही सूर्यप्रकाशावर चालते. म्हणजेच सूर्य प्रकाशाच्या वापर करून या चुलीवर स्वयंपाक करता येतो. या सूर्यचुलीमुळे इलेक्ट्रिक सिटी किंवा गॅसची गरज भासत नाही. यामध्ये सोलर पीव्ही पॅनल आणि इंडोर युनिट असते. सोलर पॅनल घराच्या छतावर बसवले जाते, तर किचनमध्ये कुकटॉप बसवला जातो.

सूर्यचुलीचे प्रकार

सूर्यचुली या आपणाला बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारात पाहायला मिळतात. सूर्यचुलीचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते आपण खाली पाहूया:

  • सिंगल बर्नर सोलर कुकटॉप: या प्रकारची सूर्यचूल ही छोट्या कुटुंबासाठी पुरेशी आहे.
  • डबल बर्नर हायब्रीड कुकटॉप: ही सूर्यचूल एकाच वेळी सोलर आणि इलेक्ट्रिसिटी वर काम करू शकते. त्यामुळे ही सूर्यचूल खूपच महत्त्वाची आहे. कारण ज्यावेळी वीज उपलब्ध नसते त्यावेळी सोलर वर चालू शकते. पावसाळ्यामध्ये ज्यावेळी मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध नसतो त्यावेळी इलेक्ट्रिसिटी वर काम करू शकते.
  • डबल बर्नर सोलर कुकटॉप: या प्रकारातील सूर्यचुल ही मोठ्या कुटुंबासाठी पर्याप्त आहे.

सूर्यचुल वापराचे फायदे

सूर्यचूल वापराचे अनेक फायदे आहेत. ते फायदे कोणते आहेत ते खालीलप्रमाणे:

  • सूर्यचूल सोलर कुकिंग सिस्टीम ही पूर्णपणे पर्यावरण पूरक आहे. म्हणजेच या सूर्यचुलीमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.
  • स्वयंपाक करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी किंवा एलपीजी गॅसची गरज भासत नाही. यामुळे पैशाची बचत होते.
  • सदर योजनेअंतर्गत पुरवण्यात येणारे सोलर कुकिंग सिस्टीम ही इंडियन ऑईलच्या माध्यमातून अगदी कमी किमतीमध्ये म्हणजेच दोन ते तीन हजार रुपयांमध्ये मिळते.
  • सूर्यचुलीवर तुम्ही कोणत्याही प्रकारचे जेवण किंवा स्वयंपाक तयार करू शकता. या सोलर कुकिंग सिस्टीम वरून स्वयंपाक करताना कोणतीही अडचण येणार नाही.
हे वाचा 👉  महिलांना मिळणार 90% टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर चा लाभ | Mini Tractor Yojana

सोलर कुकिंग सिस्टीम कोणत्या कंपनीकडून पुरवल्या जातात?

सोलर कुकिंग सिस्टीम इंडियन ऑईलच्या ७ अधिकृत कंपन्यांकडून पुरवल्या जातात त्या ७ कंपन्या खालीलप्रमाणे:

  • ईशा सोलर सोल्युशन्स
  • इन्फ्रा एलएलबी
  • प्राईड उत्तम मेटल अप्लायन्सेस
  • पेगस पॉवर
  • जेपीएम इंडस्ट्रीज लिमिटेड
  • रेड्रेन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड
  • एचएफएम सोलर पॉवर प्रायव्हेट लिमिटेड

अर्ज कसा करायचा?

सदर योजनेअंतर्गत देण्यात येणारी सूर्यचूलीसाठी अर्ज कसा करायचा? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहू:

  • सर्वप्रथम तुम्हाला सूर्यचुलीसाठी अर्ज करण्यासाठी या लिंक वर जायचे आहे. 👇🏼👇🏼👇🏼 https://iocl.com/IndoorSolarCookingSystem
  • लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला मुखपृष्ठावर एक अर्ज दिसेल, या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे.
  • या माहितीमध्ये तुमचे नाव, कंपनी असेल तर कंपनीचे नाव टाकायचे आहे नसेल तर नाही.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे.
  • त्याच्याखाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला एक नवीन ऑप्शन दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला राज्य निवडायचे आहे.
  • राज्य निवडल्यानंतर जिल्हा निवडायचा आहे.
  • त्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये किती लोक आहेत यांची माहिती या ठिकाणी द्यायची आहे.
  • तुम्ही वर्षाला किती एलपीजी वापरता या संदर्भात माहिती द्यायची आहे.
  • त्यानंतर तुमच्याकडे सोलर पॅनल साठी किती जागा उपलब्ध आहे या संदर्भात माहिती द्यायची आहे.
  • तुम्हाला किती बर्नरचा सोलर सिस्टीम पाहिजे यावर टीक मार्क करायचे आहे.
  • तुम्हाला किती सोलर कुकर पाहिजेत त्यांची संख्या याबाबतची माहिती द्यायची.
  • त्यानंतर शेवटी तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील या संदर्भात माहिती द्यायची आहे.
  • त्यानंतर काही दिवसात तुमचे नाव यादी ला येईल. आणि इंडियन ऑइल ही कंपनी तुम्हाला मोफत असणारे सोलर सिस्टिम देईल.
हे वाचा 👉  mStock ॲप मधून ट्रेडिंग करा. | Download and install mStock app | mStock ॲप डाऊनलोड करा.

अशा प्रकारे तुम्ही अर्ज करून ही सूर्यचूल किंवा सोलर सिस्टिम मिळवू शकता.

सदर लेखांमध्ये आपण लाडक्या बहिणींना मोफत मिळणाऱ्या सूर्य चुलींसाठी अर्ज कसा करायचा याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही सुद्धा या सूर्यचुलींसाठी अर्ज करू शकता. तुमचा होणारा गॅस व इलेक्ट्रिसिटी वरील खर्च वाचवू शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page