व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Groww Credit: Personal Loan App वरून वैयक्तिक कर्ज किंवा पर्सनल लोन कसे मिळवायचे? पहा संपूर्ण माहिती!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण Groww Credit: Personal Loan App वरून वैयक्तिक कर्ज कसे घ्यायचे? याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया.

आजच्या या धावपळीच्या युगामध्ये अनपेक्षित खर्च कधीही उद्भवू शकतो. हा अनपेक्षित खर्च म्हणजे वैद्यकीय खर्च, शैक्षणिक खर्च, घराची दुरुस्ती किंवा नवीन घर बांधणीचा खर्च, वैवाहिक खर्च यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश यामध्ये केला जाऊ शकतो. या गोष्टींना अनपेक्षित खर्च म्हणण्याचे कारण म्हणजे, हा खर्च नियोजन करून आपण करू शकत नाही. अचानक पैशाची जुळवाजुळव करावी लागते.

या अनपेक्षित खर्चावर मात करण्याचा एकमेव सोपा मार्ग म्हणजे वैयक्तिक कर्ज किंवा पर्सनल लोन हा आहे. हे वैयक्तिक कर्ज असुरक्षित कर्ज प्रकारामध्ये मोडते कारण या कर्जासाठी तारणाची आवश्यकता नसते. त्याचबरोबर कर्जाची रक्कम पात्रतेच्या आधारे ठरवली जाते.हे वैयक्तिक कर्ज जलद वितरण प्रक्रियेद्वारे वितरित केले जाते.

Groww Credit App विषयी थोडक्यात..

Groww ने आपल्या ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी Groww Credit App लॉन्च केले आहे. या ॲपच्या माध्यमातून जलद किंवा झटपट वैयक्तिक कर्ज वितरित केले जाते. हे ॲप कर्जाच्या बाबतीत विश्वास आणि विश्वासार्हता आणते. तुम्हाला आपत्कालीन परिस्थिती, मोठी खरेदी किंवा तुमच्या रोगप्रवाहाचे व्यवस्थापन करण्यासाठी पैशाच्या आवश्यकता असली तरीही तुम्हाला Groww Credit मार्फत संरक्षण दिले जाते.

Groww Credit App Personal Loan वैशिष्ट्ये

Groww Credit Personal Loan ची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. ती आपण खाली पाहूया:

  • Groww Credit Personal Loan हे असुरक्षित कर्ज प्रकारामध्ये मोडत असल्यामुळे सदर कर्जाला तारणाची गरज नसते. त्याचबरोबर कर्जाची रक्कम ही पात्रतेच्या आधारे ठरवली जाते.
  • सदरचे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
  • कर्जाच्या परतफेडीसाठी सुलभ आणि लवचिक EMI हप्त्यांची सुविधा Groww Credit वरून देण्यात आलेली आहे.
  • Groww Credit App वर तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी ₹50,000 इतक्या कमी रकमेसाठी अर्ज करू शकता.
हे वाचा 👉  पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा | pm kisan yojana beneficiary status check

Groww Credit App Personal Loan पात्रता

Groww Credit App वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला काही अटी व शर्ती मध्ये पात्र होणे आवश्यक आहे. सदरच्या अटी व शर्ती कोणत्या आहेत ते आपण खाली पाहूया:

  • सदर कर्जासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे मासिक उत्पन्न ₹25,000 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचा सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त असावा.
  • अर्जदार हा ज्या कंपनीमध्ये नोकरी करतो त्या ठिकाणचा त्याला 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

Groww Credit App Personal Loan व्याजदर व परतफेडीचा कालावधी

Groww Credit App वरून घेतलेल्या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर हा तुमचा क्रेडिट इतिहास, उत्पन्न, परतफेडीचा कालावधी आणि इतर घटकावर अवलंबून असतो. Groww Credit App वरून ऑफर केलेला व्याजदर बँकेनुसार बदलतो आणि सामान्यतः 10.49% ते 14% वार्षिक यादरम्यान असतो.

Groww Credit App वरून घेतलेल्या वैयक्तिक कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा सामान्यतः 6 महिने ते 8 वर्षापर्यंत असू शकतो. काही बँका व वित्तीय संस्था हा व्याजदर 10 वर्षे किंवा त्याहून अधिक वाढवू शकतात. कर्ज परतफेडीचा कालावधी हा कर्जाची रक्कम, व्याजदराने कर्जराची पत पात्रता यासारख्या घटकावर अवलंबून असतो.

Groww Credit App Personal Loan आवश्यक कागदपत्रे

Groww Credit वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. सदर कागदपत्रे कोणती आहेत ते आपण खाली पाहूया:

  • ओळखीच्या पुराव्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र इ.
  • पत्त्याच्या पुराव्यासाठी मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, युटिलिटी बिले इ.
  • पगारदार व्यक्तींसाठी मागील 3 ते 6 महिन्याच्या पगाराच्या स्लिप्स्
  • मागील 3 ते 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
  • स्वयंरोजगार व्यक्तींसाठी उत्पन्न विवरणपत्र
हे वाचा 👉  पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या नवीन याद्या जाहीर – शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती.

Groww Credit App Personal Loan साठी अर्ज कसा करायचा?

Groww Credit App वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठीची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये Google Play Store वरून Groww App डाऊनलोड करावे लागेल.👇🏼👇🏼 https://play.google.com/store/apps/dev?id=4902399402313106849
  • ॲप डाऊनलोड केल्यानंतर ओपन करून नवीन खाते तयार करण्यासाठी तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल ही माहिती भरा.
  • खाते तयार केल्यानंतर तुमची जन्मतारीख, व्यवसाय, उत्पन्न आणि तुमचा पत्ता यासारखे तपशील देऊन तुमचे प्रोफाईल पूर्ण करा. ही माहिती वैयक्तिक कर्जासाठी तुमच्या पात्रतेचे मूल्यांकन करण्यास खूप मदत करेल.
  • तुम्ही तुमचे प्रोफाईल पूर्ण केल्यानंतर,Groww App तुम्हाला तुमच्या पात्रतेवर आधारित अंदाजे कर्जाची रक्कम आणि व्याजदर प्रदान करेल.
  • त्यानंतर तुम्ही अंदाजे कर्जाच्या अटीसह समाधानी असाल तर, तुमचा अर्ज सबमिट करण्यासाठी पुढे जा. तसेच तुम्हाला कर्ज परतफेडीसाठी अनुकूल असलेल्या विविध EMI पर्यायांमधून एक EMI पर्याय निवडा.
  • नंतर तुम्हाला सदर कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. सदर कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आपण वर दिलेलीच आहे.
  • Groww तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करून तुमचा अर्ज मंजूर झाल्यास तुम्हाला अंतिम कर्जाची रक्कम आणि व्याजदर असं एक सूचना प्राप्त होईल.
  • कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची रक्कम काही दिवसातच तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाईल.
हे वाचा 👉  Maharashtra dam water storage| महाराष्ट्रातील कोणत्या धरणामध्ये किती पाणीसाठा झाला आहे याची माहिती.

अशा पद्धतीने तुम्ही Groww Credit App वरून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता.

सदर लेखांमध्ये आपण Groww Credit App Personal Loan कसे घ्यायचे? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही या ॲपवरून कर्ज घेऊन अनपेक्षित खर्चावर मात करू शकाल. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page