नमस्कार, आजच्या लेखामध्ये आपण महाराष्ट्र सरकारची महिला सक्षमीकरणासाठी राबवली जाणार एक महत्त्वकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना होय. या योजनेअंतर्गत देण्यात येणारी वाढीव रक्कम म्हणजेच २१०० रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत? याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत देण्यात येणारा सन्मान निधी १२ लाख ८७ हजार लाडक्या बहिणींच्या खात्यात आज पासून म्हणजेच २५ डिसेंबर पासून येत्या दोन ते तीन दिवसात जमा केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेतील निधी आचारसंहितेमुळे देता आला नाही, परंतु नव्याने स्थापन झालेल्या माहिती सरकारने पुन्हा एकदा ही योजना कार्यान्वित केली असून पात्र महिलांच्या खात्यावर या योजनेअंतर्गत दिला जाणारा निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच आधार प्रमाणीकरण होत नसल्याने अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिल्या होत्या पण आता ज्या महिलांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे त्यांनाही सदर योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासण्यासाठी खाली क्लिक करा.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये तर मिळाले, पण २१०० रुपये कधी मिळणार?
सदरची योजना ही राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवली जाते, सदर योजनेअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये सुरुवातीला १५०० रुपये जमा केले जात होते. नंतर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने अशी घोषणा केली होती की जर महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेमध्ये वाढ करून ती २१०० रुपये करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते.
महायुती सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निधी १५०० रुपयांच्या ऐवजी २१०० रुपये येईल या आशेवर राज्यातील बहुतांश लाडक्या बहिणी बसलेल्या होत्या, परंतु राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेविषयीची सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यानुसार २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे २१०० रुपये देण्यासंदर्भातला विचार सकारात्मक पद्धतीने करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. म्हणूनच अर्थसंकल्पानंतर सदर योजनेअंतर्गत देण्यात येणारा निधी हा एकंदरीत लाडक्या बहिणींना सरकारकडून रक्षाबंधनाच्या दिवशी वितरित करण्यात येईल,असा अंदाज बांधण्यात येत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नवीन रजिस्ट्रेशनची सुरुवात कधी होणार?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन लाभार्थी नोंदणीच्या नोंदणी प्रक्रिया अनेक ठिकाणी थांबलेली दिसते. यावर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी अशी माहिती दिली आहे की, रजिस्ट्रेशनची शेवटची मुदत १५ ऑक्टोबर होती,१५ ऑक्टोंबर पर्यंत जवळपास अडीच कोटी महिलांनी सदर योजनेसाठी नोंदणी केलेली आहे. अद्याप तरी नवीन रजिस्ट्रेशन ला सुरुवात करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या फक्त नोंदणी केलेल्या पात्र महिलांना सदरचा सन्माननिधी पोहोचवण्याची प्रक्रिया चालू आहे. ज्या महिलांचे अर्ज मान्य झाले आहेत, पण आधार सीडींगमुळे ज्या महिलांना लाभ मिळालेला नाही, त्या महिलांना कसा लाभ मिळेल याकडे सध्या लक्ष केंद्रित केलेले आहे. सध्या तरी पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन सुरू करण्याचा निर्णय झालेला नाही, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजनेमधील अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा .
जर पुन्हा एकदा नव्याने रजिस्ट्रेशन सुरू झाले तर लाडक्या बहिणींना रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणत्या प्रक्रियेतून जावे लागेल याविषयीची माहिती आपण खाली पाहूया:
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रता
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांना काही अटी व शर्ती मध्ये पात्र होणे आवश्यक आहे. सदरच्या अटी व शर्ती कोणत्या आहे ते खालीलप्रमाणे:
- सदर योजनेसाठी अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्र राज्याची कायमची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या महिलेची वय किमान १८ ते कमाल ६५ वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखापेक्षा जास्त नसावे.
- सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी कर्मचारी किंवा आयकर भरणारा नसावा.
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेच्या घरात ट्रॅक्टर सोडून इतर कोणतेही चारचाकी वाहन नसावे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आवश्यक कागदपत्रे
सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेला काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. सदरची कागदपत्रे कोणती आहे ते खालीलप्रमाणे:
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला. अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला
- उत्पन्न प्रमाणपत्र/पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
- अर्जदाराच्या हमीपत्र
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
- महिलेचा जन्म पर राज्यात झाला असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र/पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज कसा करायचा?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. दोन्ही पद्धतीने अर्ज कसा करायचा हे आपण स्टेप बाय स्टेप पाहूया:
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- सदर योजनेचा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी अर्जदाराला नारीशक्ती योजना दूत ॲप त्याच्या मोबाईल मध्ये Google Play Store वरून डाऊनलोड करावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot
- ॲप डाऊनलोड केल्यानंतर सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घेणे आवश्यक आहे.
- जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर ॲप मध्ये नारीशक्तीचा प्रकार स्वतः करावा किंवा अन्य पर्याय निवडावा.
- ॲप मध्ये गेल्यानंतर सर्वात खाली तुम्हाला मेनू दिसतील त्यापैकी पहिला मेनू नारीशक्ती दूत वर क्लिक करावे.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल तिथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करायचे आहे.
- सदर योजनेचा फॉर्म उघडल्यानंतर संपूर्ण माहिती भरून घ्या. माहिती भरताना जन्म ठिकाण, जिल्हा, गाव किंवा शहर, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका ही माहिती व्यवस्थित भरा.
- त्यानंतर सदर योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- त्यानंतर खाली एक्सेप्ट करावे, माहिती जतन करा वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल, तो ओटीपी टाका.
- त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट करा.
- त्यानंतर तुम्ही भरलेल्या अर्जाची स्थिती जाणण्यासाठी केलेले अर्ज या टॅब वर क्लिक करा.
- तुम्ही जो अर्ज केला आहे त्याची स्थिती तुम्हाला जाणता येईल, त्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज Scheme: Pending मध्ये तुम्हाला पाहता येईल.
अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यापासून ते अर्जाची स्थिती काय आहे? हे पाहू शकता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज हा ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे करावा.
तर शहरी भागातील महिलांनी त्यांच्या वार्ड अधिकाऱ्याकडे सदर योजनेचा ऑफलाइन अर्ज करावा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरताना हा अर्ज वर दिलेल्या अधिकाऱ्यांकडून घेऊन अर्ज व्यवस्थित भरून योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडून सबमिट करून सदर अर्जाचे एक टोकन घेणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी होणार का?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा अंदाजित आकडा आणि रजिस्ट्रेशनची संख्या लक्षात घेऊन रजिस्ट्रेशन चालू करायचे की नाही याचा निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे. ज्या ठिकाणीहून सरकारकडे तक्रार आले आहेत त्या ठिकाणच्या अर्जाची पडताळणी सरकार करू शकते. परंतु सरसकट अर्जांची पडताळणी करण्याचा कोणताही निर्णय सरकारने अद्याप तरी घेतलेला नाही. तसेच सदर योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
सदर लेखांमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी सुधारित २१०० रुपये रक्कम सरकारकडून कधी देण्यात येणार आहे याविषयीची माहिती आपण पाहिली आहे. त्यानुसार अर्थसंकल्प २०२५-२६ नंतर २१०० रुपयाची रक्कम वितरित केली जाणार आहे. धन्यवाद!