नमस्कार, सदर लेखामध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा सहावा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नसेल तर, घरबसल्या तुम्ही कसे तपासू शकता? याविषयीची माहिती पाहणार आहोत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक रकमेचा सहावा हप्ता राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे 24 डिसेंबर पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पण काही महिलांच्या बँक खात्यांमध्ये काही कारणास्तव पैसे हस्तांतर करण्यास विलंब झाला असू शकतो अशा महिलांना त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही त्याचे स्टेटस चेक कसे करायचे? याबद्दलची सर्व माहिती आपण पाहूया.
लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासण्यासाठी खाली क्लिक करा.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी थोडक्यात…
महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते. ही योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली होती, त्यानुसार या योजनेची सुरुवात जुलै 2024 मध्ये झाली. ही योजना मध्य प्रदेश राज्याच्या लाडली बहना योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे.
सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून दरमहा १५०० रुपये जमा केले जातात, त्याचबरोबर सदरी योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातात.
महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्याबरोबरच कुटुंबातील त्यांची भूमिका मजबूत करण्यासाठी ही योजना महाराष्ट्र सरकारकडून युद्ध पातळीवर राबवली जात आहे.
लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासण्यासाठी खाली क्लिक करा.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला आहे की नाही कसे चेक करायचे?
सरकारने सांगितल्याप्रमाणे 24 डिसेंबर पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये सहावा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सदर योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असतील तर तुम्हाला त्याविषयीची सूचना एसएमएस द्वारे कळविण्यात येत आहे. पण काही कारणास्तव काही महिलांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतर करण्यास विलंब झाला असू शकतो अशा महिलांना तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही याविषयीचा स्टेटस कसा चेक करायचा हे आपण खाली स्टेप बाय स्टेप पाहूया:
- सर्वप्रथम तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झाला आहात की नाही हा स्टेटस तपासायचा आहे. त्यासाठी तुम्हाला नारीशक्ती दूध ॲप वर लॉगिन करायचे आहे.👇🏼👇🏼👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot
- नारीशक्ती दूत ॲप चा पर्याय नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://www.ladakibahin.maharashtra.gov.in इथे लॉगिन करून स्टेटस चेक करू शकता.
- तुम्हाला तुमचा अर्ज चेक करण्यासाठी मोबाईल नंबरचा वापर करायचा आहे. मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी वरून तुम्ही तुमच्या अर्जाचा स्टेटस चेक करू शकता.
- त्यानंतर बँक खात्याशी संबंधित स्टेटमेंट लोकेशन असल्यास पैसे मिळवण्यात विलंब होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना आयएफसी कोड, खातेदाराचे नाव, बँक अकाउंट नंबर व्यवस्थित टाकला आहे की नाही हे चेक करा.
- लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एक हेल्पलाइन नंबर १८१ उपलब्ध करून दिला आहे. तुम्ही या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधून किंवा ई-मेल पाठवून तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकता.
- जर तुम्ही सदर योजनेच्या अर्जाची ऑनलाईन स्थिती चेक करण्यासाठी समर्थ असाल तर तुम्ही सदर योजनेचे काम पाहणाऱ्या स्थानिक सरकारी कार्यालयाला भेट देऊन तुमचा अर्ज क्रमांक व आवश्यक कागदपत्रे सादर करून स्टेटस चेक करू शकता.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत शासनाने काही अटी व शर्ती दिल्या होत्या. त्या अटी व शर्तींचे पालन तुमच्याकडून पूर्ण केले गेले आहे की नाही याची खात्री करा व त्याचबरोबर कागदपत्रे व्यवस्थित आहेत की नाही याची पडताळणी करा.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नसेल तर, तुम्हाला घरबसल्या Beneficiary status चेक करू शकता.
सदर लेखामध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा सहावा हप्ता 24 डिसेंबर पासून सरकारकडून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु काही कारणास्तव हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नसेल तर, तुम्ही घरबसल्या सदर योजनेचा स्टेटस कसा चेक करू शकता. याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे. वरील माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या अर्जाचा स्टेटस घरबसल्या चेक करू शकता. धन्यवाद!