व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

मॅपल्स MapmyIndia ॲप चालवले का? गुगल मॅप विसरून जाल| India’s No.1 MapmyIndia Mappls App

India’s No.1 MapmyIndia Mappls free App

तंत्रज्ञानाच्या या युगात Navigation Apps चा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. गूगल मॅप्स हे जरी सर्वाधिक वापरले जाणारे अ‍ॅप असले तरी भारतातील एक कंपनी MapmyIndia आपले अ‍ॅप Mappls द्वारे बाजारात आपली विशेष ओळख निर्माण करत आहे. या अ‍ॅपने अलीकडेच Apple iOS App Store वरील सर्व कॅटेगरीमधील (Free Apps) प्रथम क्रमांक मिळवला आहे. याचसोबत, Android Google Play Store वरही Mappls ने नेव्हिगेशन कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. या ॲप साठी सरकारने स्वतःच्या इसरो (ISRO) संस्थेचा मॅप डाटा देऊन सरकारने या ॲपची मदत केलेली आहे.

MapmyIndia App Features ॲप ची वैशिष्ट्ये

Mappls App वापरकर्त्यांना अनेक वैशिष्ट्ये प्रदान करते. या अ‍ॅपची रचना आणि कार्यप्रणाली गूगल मॅप्सपेक्षा खूप वेगळी आहे. भारतातील विविध ठिकाणांवरून वाहतुकीसाठी याची खास वैशिष्ट्ये आहेत. या अ‍ॅपमध्ये 3D Junction View, Road Speed Limit Alert, Trip Toll आणि Fuel Cost Estimation यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच, पुढील येणारे स्पीड ब्रेकर, तीव्र वळणं आणि रस्त्यावरील खड्ड्यांसाठी सुरक्षा अलर्ट दिले जातात.

Mapples mapmyindia app download

3D Junction View

नेव्हिगेशन दरम्यान सर्वाधिक गोंधळ नेहमी मोठ्या चौरस्त्यांवर होतो. यामुळे चुकीच्या मार्गावर जाण्याची शक्यता वाढते. Mappls App मध्ये 3D Junction View उपलब्ध असल्याने चौरस्त्यावरून जाण्याचा रस्ता अगदी स्पष्ट दिसतो. यामुळे उपयोगकर्ता योग्य निर्णय घेऊ शकतो आणि नेव्हिगेशन अधिक सोपे होते.

हे वाचा-  महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचं 3 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याच्या तयारीत? सत्तेतील राजकारण्यांनी दिला संदेश..

Speed Camera Alert स्पीड किती आहे सांगते

गाडी चालवताना किती स्पीड आहे हे दाखवणारे हे अ‍ॅप तुमच्या स्पीडबद्दल तर माहिती देईलच, पण त्याचबरोबर रस्त्यावर कुठे Speed Cameras आहेत याची माहितीही पुरवते. यामुळे तुम्ही योग्य स्पीडमध्ये गाडी चालवू शकता आणि संभाव्य दंडापासून वाचू शकता.

Pothole Alerts खड्डे व स्पीड ब्रेकरचा अंदाज

भारतातील रस्त्यांवरील खड्डे आणि असमतोल रस्ते हा एक मोठा त्रास आहे. Mappls App मध्ये रस्त्यावरील खड्डे, Speed Breakers आणि वळणं यांची माहिती दिली जाते. यामुळे तुम्ही गाडी चालवताना अधिक सतर्क राहू शकता.

Toll Estimation टोलचा अंदाज

रस्त्यात किती टोल लागतील आणि त्यासाठी किती शुल्क द्यावे लागेल याचीही माहिती Mappls App मधून मिळते. यामुळे प्रवासाच्या खर्चाचा आधीच अंदाज घेऊन तुम्ही तयारी करू शकता.

India-made App भारतात निर्माण झालेले अ‍ॅप

MapmyIndia हे भारतात निर्माण झालेले अ‍ॅप आहे. यामुळे भारतातील विविध शहरांच्या छोट्या-छोट्या रस्त्यांपासून ते मोठ्या महामार्गांपर्यंत याची माहिती अत्यंत अचूकपणे दिली जाते. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअर (iOS) वर मोफत उपलब्ध आहे. Google Play Store वर या अ‍ॅपला 4 स्टार रेटिंग आहे आणि 10 लाखांहून अधिक लोकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे.

Mapples mapmyindia app download

Future of Navigation भविष्यामध्ये लोकेशनचे महत्त्व

MapmyIndia कंपनी मागील 28 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांचे अ‍ॅप गाडी आणि हेल्मेटसाठी स्मार्ट उत्पादने देखील बनवते. भारतात निर्माण झालेले हे अ‍ॅप आता अधिकाधिक लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही गूगल मॅप्सवर अवलंबून असाल, तर Mappls App चा वापर करून पहा. कदाचित तुम्हाला हे अधिक उपयुक्त ठरेल.

हे वाचा-  आता तुमच्या जमिनीच्या सातबारा वर घातलं जाणार तुमच्या आईचं नाव | ad name of satbara

मॅपमाय इंडिया app download

तंत्रज्ञानाच्या या काळात, नेव्हिगेशन अ‍ॅप्समध्ये गूगल मॅप्सचे स्थान निश्‍चितपणे महत्त्वाचे आहे. परंतु, भारतातील MapmyIndia कंपनीच्या Mappls App ने या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यातील विविध वैशिष्ट्ये आणि भारतीय परिस्थितीला अनुरूप असलेल्या सुविधा यामुळे हे अ‍ॅप अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. अशा परिस्थितीत, भारतीय वापरकर्त्यांनी Mappls App चा वापर करून अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा आनंद घ्यावा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment