मानसून अपडेट
Mansoon 2024 : भारतीय हवामान खात्याने नुकताच एक नवीन अंदाज जारी केला आहे. यामध्ये हवामान खात्याने मान्सून 2024 बाबत मोठे अपडेट दिली आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे यावर्षी मान्सूनचे वेळेआधी आगमन होण्याची शक्यता आहे. येत्या 20 दिवसांनी मान्सून अंदमानात येईल आणि त्यानंतर मग तो केरळात येईल असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
सध्या प्रचंड उष्णता जाणवत असून याचाच परिणाम म्हणून समुद्रातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे आणि ही गोष्ट मान्सून लवकर येण्यासाठी पोषक असल्याचे मत हवामान तज्ञांनी व्यक्त केले आहे.
मागील त्या शेतकऱ्यांना सोलार वॉटर पंप मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
समुद्रातील पाण्याचे जलद गतीने बाष्पीभवन होत असल्याने समुद्रावरील हवेचा दाब हा वाढत चालला आहे. सध्या समुद्रावरील हवेचा दाब 850 हेक्टो पास्कल एवढा आहे. जेव्हा हा हवेचा दाब 1000 हेक्टोपास्कलवर जाईल तेव्हा मान्सूनच्या निर्मितीला सुरुवात होणार आहे.
यामुळे यंदा मान्सूनचे लवकरच अंदमानातं, केरळात आगमन होण्याची शक्यता आहे. निश्चितच मान्सूनची अगदी चातका प्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आणि उष्णतेने त्रस्त जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
मान्सून बाबत मोठी अपडेट
भारतासहित आपल्या अनेक शेजारी देशांना सुद्धा लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण की, आणखी एका जागतिक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने भारतीय मान्सून बाबत मोठी माहिती दिली आहे.
या वर्षी, दक्षिण आशियातील बहुतेक भागांमध्ये नैऋत्य मोसमी मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची अपेक्षा असल्याचा अंदाज देण्यात आला आहे.
साऊथ एशियन क्लायमेट आउटलुक फोरम (SASCOF) ने काल 30 एप्रिल 2024 ला अर्थातच मंगळवारी ही माहिती दिली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ला नीना साठी अनुकूल परिस्थिती तयार होत असल्याचे या अंदाजात म्हटले गेले आहे.
तुमच्या गावानुसार मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
नैऋत्य मान्सूनचा काळ म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात दक्षिण आशियातील उत्तर, पूर्व आणि उत्तर-पूर्व भागातील काही भाग वगळता, दक्षिण आशियातील बहुतांश भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज या जागतिक संस्थेने वर्तवला आहे.
जागतिक हवामान अंदाज
भारताव्यतिरिक्त दक्षिण आशियामध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे. दरम्यान, या सर्व देशांमध्ये सामान्य पेक्षा जास्त पाऊस पडू शकतो असा दावा या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
एकंदरीत गेल्यावर्षी दुष्काळ पडल्यानंतर यंदा सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाव्यतिरिक्त अनेक हवामाना संस्थांनी व्यक्त केला आहे. यामुळे सध्या तरी दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना यंदाचा मान्सून दिलासा देणार असे चित्र आहे.