व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जमा: स्टेटस चेक करा. | Pm kisan beneficiary status check

नमो शेतकरी योजना – शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अशी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Namo Shetkari Yojana) शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळावे आणि त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करणे आहे. योजनेच्या चौथ्या हप्त्याचे वितरण नुकतेच करण्यात आले असून, यामुळे 91 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. तब्बल 1888 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

राज्य सरकारने या योजनेच्या चौथ्या हप्त्याचे वितरण 20 ऑगस्ट 2024 रोजी सुरू केले. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. यासोबतच सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदानाचे वितरण करण्यासाठी एक नवीन पोर्टल देखील सुरू करण्यात आले आहे.

Pm kisan beneficiary status check

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत तुमचे पैसे आले नाही नसतील तर खालील बटनवर क्लिक करा.

नमो शेतकरी योजनेचे उद्दिष्ट

नमो शेतकरी योजनेचे उद्दिष्ट पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये प्रदान करणे आहे. या योजनेमुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना एकूण 12 हजार रुपये वार्षिक मदत मिळते. मागील वर्षी तीन हप्त्यांचे वितरण झाले होते, आणि यंदा चौथा हप्ता देण्यात आला आहे.

हे वाचा-  पी एम किसान योजनेमध्ये नवीन नाव नोंदणी करा. |Pm Kisan New Registration

Namo Shetkari Yojana Status कसे तपासावे?

काही शेतकऱ्यांना अजूनही चौथा हप्ता मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नवीन पोर्टल सुरू केले आहे, ज्यावर ते आपले Namo Shetkari Yojana Status तपासू शकतात.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत तुमचे पैसे आले नाही नसतील तर खालील बटनवर क्लिक करा.

पोर्टलवर स्टेटस कसे तपासावे?

  1. ब्राउझर उघडा: आपल्या मोबाईलमध्ये Google Chrome ब्राउझर उघडा.
  2. पोर्टल ओपन करा: अॅड्रेस बारमध्ये https://nsmny.mahait.org/ ही लिंक टाका.
  3. Beneficiary Status पर्याय निवडा: पोर्टल ओपन झाल्यानंतर Login आणि Beneficiary Status हे दोन पर्याय दिसतील. Beneficiary Status वर क्लिक करा.
  4. मोबाईल क्रमांक आणि नोंदणी क्रमांक टाका: PM Kisan योजनेसाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि PM Kisan Registration Number टाका.
  5. Get Data वर क्लिक करा: Get Data या बटणावर क्लिक केल्यावर तुमचे नमो शेतकरी योजनेचे स्टेटस दिसेल.

Pm kisan beneficiary status check marathi

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदत योजना आहे. या योजनेच्या चौथ्या हप्त्याचे वितरण सुरू झाले असून, शेतकऱ्यांनी आपल्या खात्यात पैसे आले की नाही, हे तपासणे आवश्यक आहे. जर पैसे जमा झाले नसतील, तर त्यांनी दिलेल्या प्रक्रियेने Namo Shetkari Yojana Status तपासावे आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

हे वाचा-  लाडक्या भावांना Instant Loan च्या Income Proof शिवाय मिळणार 25 हजार रुपये! NO CIBIL ₹25000 New Loan App: Fast Approval..!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page