व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

शेतकऱ्यांनो आता पीक विमा भरा एक रुपयात. विमा भरण्याची संपूर्ण प्रक्रिया

शेतकरी मित्रांनो आज आपण, 1 रुपयात पिक विमा कसा भरायचा याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

अर्ज करण्याची प्रक्रिया

1 रुपयात पिक विमा योजनेत सहभागी व्हायचा असेल तर तुम्ही स्वतः पीक विमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा गावातल्या सीएससी केंद्रावर जाऊन सुद्धा ऑनलाईन नोंदणी करू शकता.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • शेतकरी मिञांनो जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर सगळ्यात आधी पीएम एफ बी वाय डॉट जीओव्ही डॉट इन सर्च करायचा आहे. किंवा खालील बटनावर क्लिक करून सरकारच्या संकेतस्थळावर जा👉

  • प्रधानमंत्री पिक विमा योजनेची वेबसाईट ओपन होईल. येथील फार्मर एप्लीकेशन या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला गेस्ट फार्मर या पर्यावर क्लिक करायचा आहे.
  • आता नवीन शेतकरी म्हणून तुम्हाला नोंदणी करायचे आहे तिथे सुरुवातीला शेतकऱ्यांची माहिती टाकायची आहे.

अर्जदाराची माहिती

  • शेतकऱ्याचा पूर्ण नाव रिलेशनशिप मध्ये अर्जदार कोणाचा मुलगा मुलगी आणि पत्नी आहे ते निवडायचा आहे
  • पती किंवा वडिलांचे नाव टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकून व्हेरिफाय या बटणावर क्लिक करायचा आहे.
  • त्यानंतर स्क्रीनवर एक कॅप्चा कोड दिसेल, तो कोड जश्याच्या तसा टाकून गेट ओटीपी या पर्यावर क्लिक करायचा आहे.
  • मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचा आहे मग व्हेरिफिकेशन सक्सेस झाल्याचं तिथं तुम्हाला दिसून येईल.
  • यानंतर वय जात किंवा प्रवर्ग आणि लिंग निवडायचा आहे, त्या पुढे शेतकऱ्याचा प्रकार म्हणजे तो अल्पभूधारक आहे अत्यल्पभूधारक आहे ते निवडायचा आहे.
  • मग फार्मर कॅटेगरीमध्ये अर्जदार जमिनीचा मालक आहे की भाडेतत्त्वावर जमीन करतो ते निवडायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला पत्त्याविषयीची माहिती भरायचे आहे.
  • तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचा आहे पुढे सविस्तर पत्ता टाकून पिन कोड टाकायचा आहे.
  • यानंतर शेतकरी मिञांनो फार्मर आयडी मध्ये तुम्हाला यूआयडी हा पर्याय निवडायचा आहे आणि मग तुमचा आधार नंबर अचूकपणे टाकायचा आहे.
  • तेथील व्हेरिफाय या पर्यावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर स्क्रीनवर व्हेरिफिकेशन सक्सेस झाल्याचा मेसेज दिसेल.
हे वाचा-  लखपती दीदी योजना मराठी: महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज.

बँक खाते तपशील

त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा तपशील टाकायचा आहे. बँकेचा आयएफसी कोड माहिती असेल तर एस वर क्लिक करायचे आहे आणि नसेल तर नो या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

मग राज्य जिल्हा बँकेचे नाव शाखा निवडायचे आहे. शाखा निवडले की त्या शाखेचा IFSC कोड आपोआप आलेला दिसून येईल.

पुढे बँक खात्याचा नंबर टाकायचा आहे तो पुन्हा टाकून कन्फर्म करायचा आहे.

त्यानंतर खाली दिलेला कॅपचा कोड टाकून क्रिएट यूजर या पर्यावर क्लिक करायचा आहे.

यानंतर तुम्ही भरलेली माहिती तुम्हाला स्क्रीनवर दाखवली जाईल ती व्यवस्थित वाचून नेक्स्ट आपल्यावर क्लिक करायचा आहे.

आता तुम्हाला तुम्ही दिलेल्या बँक खात्याचा तपशील दिलेल्या दिसेल ते खाते तुम्हाला निवडायचे आहे.

जमीन आणि पिक तपशील

  • आता तुम्हाला पिक विमा योजना आणि किती क्षेत्रावर विमा उतरवायचा यासंबंधीची माहिती भरायचे आहे.
  • राज्य महाराष्ट्र निवडा लगेच समोर योजनेचे नाव प्रधानमंत्री फसल बीमा योजना निवडायचा आहे. त्यानंतर तिथे रब्बी सीजन आणि वर्ष 2023 आपोआप येईल.
  • Land details मध्ये तुम्हाला पिकांची माहिती भरायचे आहे इथल्या वर्तुळावर क्लिक केलं की खाली तुम्ही ती माहिती भरू शकता जर तुम्ही ज्वारी हरभरा कापूस अशा अनेक पिकांसाठी विमा उतरवणार असाल तर मिक्स क्रॉपिंगला yes करायचा आहे.
  • जर तुम्ही एकाच पिकाचा विमा भरणार असाल तर त्या समोरील NO पर्यावर क्लिक करायचा आहे.
  • मग तुम्हाला एक पीक निवडायचा आहे त्याच्यावर तुम्हाला पिक विमा उतरायचा आहे पुढे पेरणीची तारीख निवडायचे आहे.
  • त्यानंतर खाते क्रमांक आणि गट क्रमांक टाकायचा आहे पुढच्या VERIFY पर्यावर क्लिक करायचा आहे मग स्क्रीनवर तुमच्या नावावर किती क्षेत्र आहे याची माहिती दाखवली जाईल.
  • इथल्या वर्तुळावर क्लिक करून तुमच्या क्षेत्र आधीच इन्शोड आहे की नाही ते बघायचा आहे आणि मग सबमिटा पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  • तिथं तुम्ही Insured Area या पर्यायासमोर तुम्हाला जेवढ्या चित्रावर विमा उतरवायचा आहे तेवढे क्षेत्र कमी-जास्त करू शकतात त्यानुसार विमा हप्त्याची रक्कम ही कमी किंवा जास्त तुम्हाला झालेली दिसून येईल
  • या क्षेत्रासाठी तुम्हाला किती हप्ता भरावा लागेल ते फार्मर शेअर्समध्ये दाखवला जाईल. इथे किती रक्कम दिसत असली तरी शेवटी पेमेंट करताना तुम्हाला एकच रुपया भरावा लागणार आहे. यानंतर नेक्स्ट पर्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे
हे वाचा-  आयुष्यमान भारत योजनेमधील दवाखान्यांची यादी अशी शोधा | ayushyaman Bharat hospital list

कागदपत्रे upload

  • आता तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहे यामध्ये सुरुवातीला बँकेच्या पासबुकचा फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर नुकताच काढलेला डिजिटल सही चा सातबारा उतारा आणि आठ उतारा हे दोन्ही एकच फाईल मध्ये अपलोड करायचे आहेत.
  • शेवटी पिक पेऱ्याच घोषणापत्र अपलोड करायचा आहे. या घोषणा पत्राचा एक नमुना अर्ज तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता.
  • हा जो नमुना अर्ज आहेत तसा तुम्ही पिक पेरायचा घोषणापत्र लिहू शकता त्यावर स्वतःचे सही करून ते तुम्हाला तिथे अपलोड करायचा आहे. हे 3 फोटो अपलोड करून झाले की त्या समोर असलेल्या अपलोड या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि मग त्यांनी फोटोंच्या समोर तुम्हाला सक्सेसफुल इथे फोटो अपलोड झाल्याचं मेसेज दिसेल

1 रुपया भरा

  • इथल्या नेक्स्ट वर क्लिक केलं की शेतकऱ्याची बँक खात्याची आणि पिकाची माहिती दाखवली जाईल किती प्रीमियम भरायचा ते दाखवलं जाईल तिथे असलेल्या सबमिट या बटनावर क्लिक करायचा आहे.
  • सबमिट या बटनावर क्लिक करून झालं की तुमच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला जाईल यात तुमच्या अर्जाचा क्रमांक विम्याचे रक्कम याची माहिती नमूद केली असेल.
  • आता तुम्हाला पेमेंट करायचा आहे एक रुपये इतका तुम्हाला इथं पेमेंट करायचा आहे. हे पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यूपीआय किंवा कोड किंवा क्रेडिट कार्ड वापरून करू शकता पेमेंट झालं की शेतकरी अर्जाची पावती तुम्हाला स्क्रीनवर दिसून येईल.
  • इथं खाली असलेल्या प्रिंट पॉलीसी रिसेट या पर्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या विमा सहभागाची पावती डाऊनलोड करू शकता.
हे वाचा-  लाडकी बहिण योजनेसाठी वेबसाईट वरून असा करा अर्ज..

अशा रीतीने शेतकरी स्वतः पिक विमा योजनेत ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकता.

पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही अर्ज केला याचा अर्थ तुम्ही या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरला असा होत नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या शेतातील शेतमालाचा नुकसान झालं तर ते नुकसान झाल्याच्या 72 तासाच्या तुम्हाला तशी माहिती पिक विमा कंपनीला द्यावी लागते.

त्यानंतर विमा कंपनीचे कर्मचारी आणि राज्य सरकारची काय कर्मचारी येऊन पाहणी करतात आणि मग पिक विमा योजनेच्या नियमानुसार तुम्ही योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत की नाही ते त्यांच्याकडून ठेवलं जातं.

शेतकरी मिञांनो सर्व समावेशक पीक विमा योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment