नमस्कार, आपला आजचा लेख हा सिम कार्ड वैधतेविषयीचा आहे. भारतीय दूरसंचार नियम प्राधिकरण जे देशातील संपूर्ण दूरसंचार कंपन्यांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या कायदेशीर नियंत्रण ठेवत असते. भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरणाने (TRAI) नुकताच सिम कार्ड वैधतेवर लक्ष केंद्रित करणारा एक नियम आणला आहे. हा नियम देशातील जवळपास सर्व सिम कार्ड कंपन्यांना लागू असणार आहे.
हा नियम jio, Airtel, Vodafone-Idea म्हणजेच VI, आणि सरकारी मालकीची कंपनी BSNL या दूरसंचार कंपन्यांचे सिम कार्डस् दीर्घकाळ रिचार्ज शिवाय सक्रिय ठेवण्यासाठी आणण्यात आला आहे.
या नियमामुळे देशातील एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरकर्त्यांना खूप फायदा होताना दिसत आहे. कारण सदरच्या दूरसंचार कंपन्यां त्यांच्या सिम कार्ड वर रिचार्ज नाही केला तर, त्या सिम कार्डचे इन्कमिंग आउटगोइंग तात्काळ बंद करत असत. त्यामुळे सिम कार्ड वापरकर्त्याला अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असे. परंतु सदरच्या नियमामुळे सिम कार्ड वापरकर्त्यांना वारंवार करावे लागणारे रिचार्ज टाळता येणार आहेत. त्यामुळे त्यांचा रिचार्ज वरील खर्च कमी होईल.
दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांना लागू होणारे सिम वैधता नियम
दूरच्या क्षेत्रातील ज्या कंपन्यांना सिम वैधता नियम लागू होतात त्या कंपन्या कोणत्या आहेत? त्याचबरोबर सिम कार्ड कोणत्याही रिचार्ज किती दिवस सक्रिय राहू शकते. याबाबतची माहिती आपण खाली पाहूया:
Jio सिम कार्ड वैधता नियम
Jio सिम कार्ड वापरकर्त्यासाठी, jio सिम कार्ड कोणत्याही रिचार्ज शिवाय म्हणजेच त्या सिम कार्ड चा रिचार्ज संपल्याच्या दिवसापासून 90 दिवसापर्यंत सक्रिय राहील. या 90 दिवसाच्या कालावधीनंतर रिॲक्टिवेशन प्लॅनची आवश्यकता असेल. या 90 दिवसांमध्ये इनकमिंग कॉल सुविधामध्ये बदल होऊ शकतो. जसे की काही वापरकर्त्यांसाठी ते एका महिन्यासाठी इनकमिंग मिळू शकतात काहींसाठी एका आठवड्यासाठी किंवा अगदी एका दिवसासाठी सुविधा उपलब्ध असेल. हे सर्व वापरकर्त्याच्या मागील किंवा शेवटच्या रिचार्ज वर अवलंबून असेल. परंतु 90 दिवस सिम कार्ड वापरकर्त्याकडून वापरले गेले नाही तर ते कार्ड डिस्कनेक्ट केले जाईल.
एअरटेल सिम कार्ड वैधता नियम
एअरटेल सिम कार्ड त्याचा शेवटचा रिचार्ज संपल्यानंतर 60 दिवसापर्यंत सक्रिय राहील. या कालावधीनंतर, सिम कार्ड वापरकर्त्याला त्याचा नंबर चालू ठेवण्यासाठी किमान वैधता प्लॅनचा रिचार्ज करावा लागेल.
वोडाफोन-आयडिया (VI) सिम कार्ड वैधता नियम
वोडाफोन आयडिया सिम कार्ड वापर करताना त्यांचे सिम कार्ड रिचार्ज न करता 90 दिवसापर्यंत सक्रिय राहील. सदर नंबरची सेवा टिकवून ठेवण्यासाठी वापरकर्त्याला किमान वैधता यांचा विचार करणे अनिवार्य आहे.
बीएसएनएल (BSNL) सिम कार्ड वैधता नियम
बीएसएनएल ही दूरसंचार क्षेत्रातील सरकारी कंपनी आहे. ही कंपनी इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वात जास्त सिम कार्ड वैधता कालावधी प्रदान करते. बीएसएनएल सिम कार्ड कोणत्याही रिचार्ज शिवाय 180 दिवस सक्रिय राहील. बीएसएनएल सिम कार्ड वापरकर्त्याला मिळणारा कालावधी हा खूपच जास्त आहे.
भारतीय दूरसंचार विभागाचे टेलिकॉम कंपन्यांना सिम कार्ड वैधता त्वरित लागू करण्याचे आदेश
दूरसंचार विभागाने एअरटेल, जिओ, बीएसएनएल आणि वोडाफोन आयडिया याबरोबरच प्रमुख टेलिकॉम कंपन्यांना विलंब न करता कॉलर नेम प्रेझेंटेशन सेवा त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या नियमांचा मुख्य उद्देश्य बनावट कॉल्सना आळा घालणे आणि कॉल करणाऱ्याचे सत्यापित नाव प्राप्त कर्त्याच्या फोनवर प्रदर्शित करून वापरकर्त्यांची सुरक्षितता वाढवणे हा आहे.
सिम कार्ड वैधता नियमांतर्गत 90 दिवसानंतर काय होईल?
सिम कार्ड वर 90 दिवसापर्यंत वापरले गेले नाही तर कंपनी 15 दिवसाचा ग्रेस पिरियड देते. यादरम्यान ग्राहक कस्टमर केअरशी संपर्क साधून किंवा कंपनीच्या स्टोअर ला जाऊन सिम कार्ड पुन्हा सक्रिय करू शकतात.
सिम कार्ड वैधता नियम फायदे
सिम कार्ड वैधता नियमांतर्गत सिम कार्ड वापरकर्त्याला खालील फायदे मिळणार आहेत.
- सिम कार्ड वापरकर्त्याला फक्त ₹20 मध्ये सिम कार्ड सक्रिय ठेवता येणार आहे.
- या नियमामुळे दुसरे सिम कार्ड निष्क्रिय होण्याची चिंता मिटणार आहे.
- देशातील टेलिकॉम क्षेत्रातील सर्व प्रमुख कंपन्यांकडून ही सुविधा उपलब्ध असणार आहे.
सिम कार्ड वैधता नियमांतर्गत ₹20 चा प्लॅन कसा वापरायचा?
- Jio ग्राहकांनी Jio App किंवा MyJio वर ₹20 चा रिचार्ज निवडा. जर सिम कार्ड पुन्हा सक्रिय करायचे असेल तर Jio Store ला भेट द्या.
- BSNL ग्राहक, BSNL च्या अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवरून ₹20 चा रिचार्ज करू शकतात. सिम कार्ड पुन्हा सक्रिय करायचे असेल तर BSNL Customer Care शी संपर्क साधू शकतात.
- Airtel ग्राहक, Airtel Thanks App वरून ₹20 चा प्लॅन निवडू शकतात. सिम कार्ड सक्रिय करण्यासाठी Airtel Store ला भेट देऊ शकता.
- Vodafone-Idea (VI) ग्राहक, VI App किंवा वेबसाईटवरून प्लॅन ऍक्टिव्हेट करू शकतात. त्याचबरोबर सिम कार्ड सक्रिय करण्यासाठी कस्टमर केअर वर कॉल करून मार्गदर्शन घेऊ शकता.
₹ 20 मध्ये 4 महिने राहणार सिम कार्ड सक्रिय
TARI च्या नव्या नियमानुसार, जर सिम कार्ड 90 दिवसापेक्षा जास्त काळ वापरले गेले नाही तर, वापरकर्त्याला फक्त 20 रुपयांचा रिचार्ज करून ते पुढील 30 दिवसांसाठी सक्रिय ठेवता येणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की,₹20 मध्ये चार महिने सिम कार्ड सक्रिय कसे राहणार? इथे तर 30 दिवसांसाठी सांगितले आहे. तर TARI नव्या नियमानुसार 90 दिवसापर्यंत सिम कार्ड विनारिचार्ज सुरू राहणार आहे, नंतरच्या एक महिन्यासाठी फक्त ₹20 चा रिचार्ज करावा लागणार आहे. यामुळे ज्या सिम कार्डचा वापर कमी होतो त्या सिम कार्ड साठी आता जास्त खर्च करण्याची गरज नाही.
सदर लेखांमध्ये आपण भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरणाने सिम कार्ड वैद्यतेसाठी जे काही नियम आणले आहेत त्याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. ही माहिती प्रत्येक सिम कार्ड वापर वापरकर्त्याला माहित असणे अनिवार्य आहे. म्हणूनच सदरची माहिती प्रत्येकाला माहित व्हावी या दृष्टीने आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे. धन्यवाद!