व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

बेस्ट 5 पर्सनल लोन ॲप्स डाऊनलोड करा | best 5 personal loan apps download

नमस्कार मित्रांनो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय खूपच नाजूक आहे याचे कारण असे की, आर्थिक विषय म्हटलं की तो नाजूकच असतो. तर नाजूक विषय म्हणजे कर्ज जे की सर्वसामान्यांना आर्थिक गरजा भागवण्यासाठी ही कर्जे काढली जातात.

याचा वापर लग्न, गाडी, बंगला,शिक्षण, व्यवसाय यासारख्या असंख्य बाबींसाठी कर्ज घेणे हे आजकाल कॉमन झाले आहे. हे कर्ज बँका, पतसंस्था,सोसायटी यासारख्या संस्थाकडून मिळवले जात असे. पण सध्या कर्ज मिळवणे हे खूप सोपे झाले आहे कारण पर्सनल लोन देणाऱ्या खूप साऱ्या बँका कंपन्या स्थापन झाले आहेत,जे की पर्सनल लोन खूपच जलद देतात आणि त्यासाठी ची प्रोसेस पण खूपच सोपी आहे, तर आपण भारतातील सर्वोत्तम पाच इन्स्टंट लोन देणारी एप्लीकेशन कोणते आहेत ते सविस्तरपणे पाहू.

धनी (Dhani) App

धनी लोन अँड सर्विस लिमिटेड ही कंपनी ग्राहकांना लोन सेवा पुरवते. सुरुवातीच्या काळात वैयक्तिक लोन देण्यासाठी ही कमी प्रसिद्ध होती मात्र गेल्या काही वर्षापासून या कंपनीने मेडिकल कर्ज लग्नासाठी कर्ज,वाहन कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पण ही कंपनी गृह कर्ज देत नाही.

धनी ही मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे ग्राहकांना अनेक आर्थिक सेवा पुरवते त्यांचे प्राथमिक लक्ष हे वैयक्तिक कर्ज देण्यावर आहे. धनी कडून वैयक्तिक कर्ज हे ग्राहकाच्या सिबिल स्कोर च्या आधारावर दिले जाते.

धनी त्यांच्या ऍप द्वारे पात्र व्यक्तींना त्वरित किंवा जलद वैयक्तिक कर्ज देते. पात्र व्यक्तींना डिजिटल पद्धतीने अर्ज आणि निधी प्राप्त करता येतो. या मोबाईल द्वारे 1000 ते 15 लाखापर्यंत लोन घेता येते. कंपनीच्या वेबसाईट वरून 13.99% पासून व्याजदर आकारले जातात असे दिसून आले आहे.

या एप्लीकेशन द्वारे कर्ज मिळवण्यासाठी ग्राहकांना अर्ज करणे खूपच सोपे आहे त्यासाठी केवळ पॅन कार्ड आणि आधार कार्ड देण्याची गरज आहे. हे कर्ज तीन ते 24 महिन्याच्या मूर्तीसाठी घेता येते परंतु वेळेत कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे नाहीतर कर्जदार वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जाऊन शकतो.

वैयक्तिक कर्जा बरोबरच धनी या वेबसाईटवर किराणा, कपडे, इलेक्ट्रिक वस्तू,घर सजावटीच्या वस्तू याही उपलब्ध आहेत तिथे ग्राहक शॉप नाव पे लेटर चा उपयोग करू शकतात आणि खरेदी केल्यानंतर ठराविक मुदतीत पैसे भरू शकतात.

धनी  द्वारे कर्ज कर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पूर्ण केली जाते. अर्ज करताना वैयक्तिक आणि आर्थिक माहिती प्रदान करणे आवश्यक आहे.आणि कंपनी ग्राहकांनी दिलेली माहिती त्यांच्या कर्जासाठी पात्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी वापरते त्यानुसार कर्जाची रक्कम ठरवली जाते.

बजाज फायनान्स (Bajaj finance) App

बजाज फायनान्स एक भारतीय कमनी आहे त्याचे मुख्यालय पुणे येथे आहे. त्यांच्या 294 पेक्षा जास्त ग्राहक शाखा आहेत. ही कंपनी आपल्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज प्रदान करते. बजाज फायनान्स ही एक खूप मोठी कंपनी आहे जी की इलेक्ट्रॉनिक उत्पादने, ग्रहकर्ज, व्यवसाय कर्ज,आरोग्य कर्ज, वाहन कर्ज अशा विविध गोष्टींसाठी वैयक्तिक कर्ज देते.

हे वाचा-  Earn money online gaming app: घरबसल्या मोबाईलवर गेम खेळून पैसे कमवण्याचा सोपा मार्ग!

बजाज फायनान्स चा वैयक्तिक कर्जाचा व्याजदर वार्षिक 11 टक्के पासून सुरु होतो या कर्जासाठी पात्र होण्यासाठी चांगला सिबिल स्कोर किंवा पाचशे पॉईंट च्या पुढे स्कोर असणे आवश्यक आहे. जर तुमचा सिबिल स्कोर कमी असेल तर लोन सुद्धा कमी मिळते.

बजाज फायनान्स द्वारे पस्तीस लाखापर्यंत तत्काळ वैयक्तिक कर्ज देता येते. हे कर्ज कोणालाही कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी उपलब्ध आहे. या कर्जाची मुदत 84 महिन्यांची आहे. कर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची तुम्ही तात्काळ पूर्तता केल्यास कर्ज पाच मिनिटात मिळते. कर्ज मंजुरीनंतर 24 तासाच्या आत कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते. बजाज फायनान्स वैयक्तिक कर्ज अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन उपलब्ध आहेत.

बजाज फायनान्स कर्ज पात्रतेसाठी तुमचे वय 21 ते 67 च्या दरम्यान असावे. सिबिल स्कोर 750 किंवा त्याहून जास्तीचा असावा. अर्जदाराचे मासिक उत्पन्न किमान 22 हजार किंवा त्यापेक्षा जास्त प्रति महिना असणे आवश्यक आहे. ग्राहक हा भारतीयत्व प्रदान असलेला असावा.

होम क्रेडिट (Home credit) App

होम क्रेडिट पर्सनल लोन या ॲप एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे आपत्कालीन परिस्थिती ग्राहकांना आर्थिक सहाय्य करते. होम क्रेडिट हे कर्ज प्रक्रिया ही डिजिटल पद्धतीने राबवली जाते ज्याद्वारे अर्ज करण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही कोणत्याही वेळी कधीही घरबसल्या सोईस्कर रित्या आपण अर्ज करू शकतो.

होम क्रेडिट पर्सनल लोन हे पाच लाख रुपये पर्यंत मिळू शकते. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेमुळे होम क्रेडिट वैयक्तिक कर्ज मंजुरी जलद होते. तातडीच्या आर्थिक गरजांसाठी बँक खात्यात जलद व सुनिश्चित वितरण केले जाते. अर्जदाराने होम क्रेडिट वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्राच्या डिजिटल प्रति ऑनलाईन सबमिट करणे आवश्यक आहे.

हे वाचा-  भांडी संच योजना बांधकाम कामगारांना मिळणार आहेत घरातील भांडी मोफत. | बांधकाम कामगार योजना अर्ज करा.

असुरक्षित कर्ज म्हणून या वित्त पुरवठा योजनेअंतर्गत निधी सुरक्षित करण्यासाठी कोणत्याही तारणाची आवश्यकता नाही. वैयक्तिक कर्जासाठी गॅरंटी ची सुद्धा आवश्यकता नसते.

होम क्रेडिट वैयक्तिक कर्ज व्याजदर हे कर्जाचे रक्कम कर्जाचा कालावधी आणि अर्जदाराच्या पतपात्रतेनुसार बदलू शकतात संपूर्ण कर्जाच्या कालावधीसाठी व्याजदर हे निश्चित केले जातात म्हणजेच संपूर्ण कर्जाच्या कालावधीत EMI रक्कम ही बदलत नाही ती सारखीच राहते. हे लोन पर्सनल आणीबाणी उभारले जात असल्याने कोणताही तारण किंवा सिबिल स्कोर ची आवश्यकता नसल्यामुळे होम क्रेडिट वैयक्तिक कर्जावरील व्याजदर 19% ते 49 टक्के पर्यंत बदलतो. पाच टक्के पर्यंत प्रक्रिया शुल्क ही लागू होते.होम क्रेडिट वैयक्तिक कर्जाचा कालावधी 36 ते 51 महिन्या दरम्यान असतो.

होम क्रेडिट वैयक्तिक कर्ज घेताना अर्जदाराचे वय 19 ते 60 वर्षे दरम्यान असावे.मासिक उत्पन्न किमान पाच हजार रुपये असणे आवश्यक आहे. सिबिल स्कोर अनिवार्य नाही. अर्जदार हा कर्मचारी, स्वयंरोजगार असणे आवश्यक आहे.

होम क्रेडिट वैयक्तिक कर्जासाठी ओळख पुरावा त्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड,पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे. उत्पन्नाचा पुरावा म्हणजेच बँक स्टेटमेंट किंवा व्यवसाय मालकाच्या बाबतीत आर्थिक स्टेटमेंट आवश्यक आहे. रोजगाराचा पुरावाही अनिवार्य आहे.

एअरटेल पेमेंट बँक(Airtel payment Bank) App

पर्सनल लोन साठी एअरटेल पेमेंट बँक हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही घरबसल्या पर्सनल लोन घेऊ शकता यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही.तसेच कोणतेही उत्पन्न पुरावा देण्याची ही गरज नाही. एअरटेल पेमेंट बँकेकडून 50 हजार रुपये पर्यंतचे कर्ज सहजरित्या मिळते ही प्रक्रिया फक्त पाच मिनिटात होते व कर्जाचे रक्कम थेट बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते.

एअरटेल पेमेंट बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेतल्यानंतर ते तुम्हाला पूर्ण करण्यासाठी बारा महिने म्हणजेच एक वर्ष ते साठ महिन्यापर्यंत ची मुदत मिळू शकते तेही हप्त्याच्या स्वरूपात. वैयक्तिक कर्ज व्याज हे नऊ टक्के ते 15 टक्के पर्यंत राहते तेही तुमच्याकडे कोणती कागदपत्रे आणि तुमचे बँकेचे असणारे संबंध यावर अवलंबून राहतात म्हणजेच तुमचा क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे.

एअरटेल पेमेंट बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराला आधार कार्ड, (मोबाईल नंबरची लिंक करणे अनिवार्य आहे). पॅन कार्ड, बँक खाते, बँकेचे सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी वरील सर्व कागदपत्रे कर्ज मिळवण्यासाठी अनिवार्य आहेत.

हे वाचा-  OLX वरून जुन्या गाड्या घ्या |buy old vehicles from olx

एचडीएफसी बँक (HDFC Bank) App

एचडीएफसी बँक सुद्धा पर्सनल लोन देण्यासाठी अग्रेसर असते. जर ग्राहक एचडीएफसी मध्ये नवीन असेल तर त्याला एचडीएफसी कडून चार तासापेक्षा कमी वेळेत इन्स्टंट पर्सनल लोन मिळू शकते. पण जर एचडीएफसी चा विद्यमान ग्राहक असेल आणि त्याला पर्सनल लोन हवे असेल तर ते केवळ अवघ्या दहा सेकंदात उपलब्ध होऊ शकते. पण जे विद्यमान ग्राहक नाहीत त्यांना मात्र चार तास हा कालावधी लागू शकतो. एचडीएफसी बँकेत कर्ज घेण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी फार कमी कागदपत्राची आवश्यकता असते ज्याद्वारे हे कर्ज सहज रित्या उपलब्ध होऊ शकते व अर्जही सहजरित्या होऊ शकतो.

एच डी एफ सी मध्ये पर्सनल लोन हे कमीत कमी पाच हजार रुपये पासून जास्तीत जास्त 40 लाख रुपये पर्यंत मिळू शकते.               एचडीएफसी चा वैयक्तिक कर्ज व्याजदर हा 10.75 ते 21.50% आहे. त्याचबरोबर एचडीएफसी थकीत ईएमआय दर दोन टक्के प्रति महिना आकारते.

एचडीएफसी वैयक्तिक कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी किमान 12 महिने आणि जास्तीत जास्त साठ महिने चा कालावधी बँकेकडून दिला जातो.

एचडीएफसी वैयक्तिक कर्ज हे शिक्षणासाठी, लग्नासाठी, घर बांधण्यासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी घेऊ शकतात. हे लोन मिळवण्यासाठी अर्जदाराला काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची सुरक्षा जमा करण्याची ही गरज नाही.

एचडीएफसी बँक ही आपल्या ग्राहकांना विमा संरक्षण ही देते. वैयक्तिक कर्जासाठी 21 ते 60 वर्षे वयोगटातील अर्जदार अर्ज करू शकतात. त्याचबरोबर अर्जदाराचे मासिक उत्पन्न हे 25 हजार रुपये असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे जेणेकरून एचडीएफसी बँक वैयक्तिक कर्ज बिन शर्त देऊ शकेल. अर्जदार हा कोणत्याही ठिकाणी दोन वर्षे कालावधीसाठी काम करत असावा.

एचडीएफसी वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड,पासपोर्ट, उत्पन्न प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो,निवास प्रमाणपत्र, पॅन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा असणे अत्यंत गरजेचे आहे.

वरील पाच मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे आपण कमीत कमी वेळेत आणि कमी कमी कागदपत्राची पूर्तता करून इन्स्टंट लोन किंवा वैयक्तिक कर्ज मिळवणे सोपे आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page