व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

कुक्कुटपालनासाठी सरकारकडून मिळत आहे 33 टक्के अनुदान, असा करा अर्ज | poultry pharming subsidy scheme

जर तुम्ही कुक्कुटपालन करत असाल किंवा कुक्कुटपालन करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी सरकारकडून 33%अनुदान शिवाय 10 लाखापर्यंत कर्ज भेटणार आहे.पण या योजनेची नेमकी कार्यपद्धती काय आहे आणि खरंच ही योजना आपल्यासाठी लाभदायक आहे का,यासाठी पात्रता काय असेल हे सर्व आपण येथे जाणून घेणार आहोत.

आत्ता आपण येथे सर्वप्रथम जाणून घेऊया की,10 लाखापर्यंत कर्ज तर मिळणार पण त्याचा व्याजदर काय असेल आणि त्यासाठी तुम्हाला किती कालावधी मिळणार आहे . या योजनेअंतर्गत,कमीत कमी तुम्हाला 9 लाखापर्यंत सहजपणे मिळू शकते.पण यासाठी बँकेच्या अटी काय असणार आहेत आणि त्याची आपण कशी पूर्तता करू शकतो हे खाली दिलेली पूर्ण माहिती वाचल्याशिवाय समजणार नाही.चला तर मग,पाहूया संपूर्ण माहिती.

कुक्कुटपालनासाठी 50% अनुदानाच्या दुसऱ्या योजनेसाठी खाली क्लिक करा. 👈

लोन कसे मिळवायचे?

कुक्कुट पालन या उद्योगाला चालना मिळावी म्हणून सरकारने पोल्ट्री फॉर्म कर्ज योजना सुरू केली आहे. आर्थिदृष्ट्या मागासलेले किंवा स्वतःचा व्यवसाय उभारू इच्छिणारे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

विशेषतः या योजनेसाठी इच्छुक असाल,तर तुम्हाला सांगू इच्छितो की, या योजनेतंर्गत मिळणाऱ्या कर्जावर सरकारकडून 25-30% सबसिडी मिळणार आहे.पण,याची पात्रता निकष पूर्ण करणे गरजेचे आहे.यासाठी आपण या योजनेसाठी पात्र आहोत का हे जाणून घ्यायला हवे.पात्रता असेल तर नक्की,पोल्ट्री फार्म च्या व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळेल.

हे वाचा-  शेळी - मेंढी पालन अनुदान योजने अंतर्गत 10 शेळ्या व 1 बोकड यासाठी मिळवा 50 ते 75 टक्के पर्यंत अनुदान

पोल्ट्री फार्म लोन योजना तुमच्यासाठी लाभदायक आहे का?

तर,कुक्कुटपालन हा शेतीशी संबंधित आणि महत्वाचा व्यवसाय मानला जातो,जो की आपण कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवू शकतो.जेणेकरून बेरोजगारी कमी होईल.यासाठी सरकार पात्र ठरणाऱ्या नागरिकांना आर्थिक मदत करीत आहे.

अगदी कमी खर्चात आणि कमी व्याजदरात नऊ लाखापर्यंत कर्ज मिळवू शकता.शिवाय या योजनेमध्ये जास्तीत जास्त सबसिडीचा लाभ मिळणार आहे.10 लाखापर्यंत कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना 75%सबसिडी देणार आहे.

कर्ज व्याजदर

जर तुम्हाला कुक्कुटपालन करायचे असेल म्हणजेच,पोल्ट्री फर्मसाठी कर्ज घ्यायचे असेल तर ,त्यासाठी लागू होणारा व्याजदर जाणून घ्यायला हवे.आत्ता,वेगवेगळ्या बँकांमध्ये कर्जावरील व्याजदर वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ,युनियन बँकेत 10.75% असेल,तर इतर बँकांमध्ये हा दर थोडा कमी जास्त असू शकतो.महत्त्वाचे म्हणजे सबसिडी देखील विभागानुसार बदलते.

या योजनेअंतर्गत सर्वसाधारण गटातील नागरिकांना 25% तर अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील नागरिकांना 33% पर्यंत अनुदान मिळते.


कर्जासाठी पात्रता काय असावी?

सरकारने कुक्कुटपालनासाठी लागणाऱ्या कर्जासाठी काही अटी ठेवल्या आहेत. या अटींचे पालन केल्यास तुम्हाला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जासोबत अनेक लाभ मिळू शकतात, शिवाय कर्ज कालावधी ही वाढवून मिळेल.यासाठी तुम्हाला खाली नमूद असलेल्या अटींचे पालन करणे आवश्यक्य आहे.

  • कर्ज घेण्यासाठी अर्जदारकडे संबंधित कागदपत्रे  असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराकडे  पुरेशी लागणारी जमीन आणि या व्यवसायासाठी  लागणारी व्यवस्था असावी.
  • तुम्ही राहता त्या भागात कायमचे रहिवासी असावे.
  • हे कर्ज फक्त पोल्ट्री फर्मसाठीच घेता येते.
  • दारिद्रयरेषेखालील नागरिकांना या योजेअंतर्गत कर्ज घेता येणार आहे.
हे वाचा-  सर्वोदय सोलर योजनेअंतर्गत मिळणार 1 कोटी कुटुंबांना मोफत सोलर

कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे?

हा व्यवसाय चालू करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.तुम्हाला कळवण्यात येत की, कागदपत्रे पूर्ण असेल तरच तुम्हाला कर्ज मिळू शकते.त्यामुळे खाली दिलेली सर्व कागदपत्रे गोळा करा.

  • आधार कार्ड – मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.
  • उत्पन्नाचा दाखला
  • कायमचे रहिवासी असल्याचा पुरावा
  • जातीचा दाखला
  • पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी मिळालेली परवानगी
  • तुमच्या व्यवसायाच्या प्रोजेक्ट रिपोर्ट
  • व्यवसाय चालू करण्यासाठी पुरेशी जागा
  • पक्षी माहिती प्रमाणपत्र
  • बँकेत खाते असणे आवशक्य

कुक्कुटपालनासाठी 50% अनुदानाच्या दुसऱ्या योजनेसाठी खाली क्लिक करा. 👈

कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते बाकी

या व्यवसायासाठी तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये अर्ज करू शकता.जर,तुमचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असेल तर सहजपणे  कर्ज घेऊ शकता.

  • प्रथम,तुम्हाला कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेला भेट द्यावी.
  • तेथील अधिकाऱ्यांशी याची संपूर्ण माहिती विचारून घेणे.
  • याची संपूर्ण information मिळाल्यानंतर ,तुम्हाला अर्ज फॉर्म देण्यात येतो.
  • अर्ज करताना काळजीपूर्वक संपूर्ण माहिती भरावी ,काही माहिती अपुरी वाटल्यास तेथील अधिकाऱ्याची बोलून घ्यावे.
  • माहिती भरून झाल्यानंतर महत्वचे कागदपत्रांचे झेरॉक्स अर्जासोबत जोडून द्यावे .
  • हा भरलेला अर्ज बरोबर आहे का चेक करून बँकेत जमा करावा.
  • अधिकारी कागदपत्रे चेक करेल आणि जर तुम्ही यासाठी पात्र असाल तर तुमचा अर्ज मंजूर होईल.

या योजनेसाठी अर्ज करा. 👈

हे वाचा-  मुख्यमंत्री वयोश्री योजना: ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी योजना

या योजनेच्या अधिक माहितीसाठी👈

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment