व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

हक्क सोडपत्र म्हणजे काय? (What is Release Deed) ते कसे करावे? जाणून घ्या संपूर्ण माहिती..

नमस्कार, सदर लेखांमध्ये आज आपण हक्कसोड पत्राविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण हक्कसोड पत्र म्हणजे काय? हक्क सोड पत्र कोणाला करता येते? हक्क सोड पत्राचा मोबदला काय असतो? हक्क सोड पत्र नोंदणीकृत असणे आवश्यक आहे का? त्याचबरोबर हक्क सोड पत्राच्या दस्ता मध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद करता येतात? हक सोडपत्र कुठे तयार करून मिळते? मालमत्तेच्या वाटाघाटीमध्ये हक्क सोड पत्राचे महत्त्व काय आहे? या मुद्द्यांची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण पाहूया.

हक्क सोडपत्र म्हणजे काय?

हक्क सोडपत्र म्हणजे एकत्र कुटुंबातील एखाद्या सदस्यांनी किंवा सह हिस्सेदाराने त्याच्या वैयक्तिक हिस्स्याच्या असलेल्या मालमत्तेवरील मालकी हक्क (सदर मालमत्तेमध्ये शेती, घर किंवा काहीही मालमत्ता असू शकेल) कमी करण्यासाठी हक्क सोडपत्रावर सही केली जाते. ही हक्कसोडपत्र कायदेशीर रित्या तयार केले जाते. असे कायदेशीर रित्या तयार केलेल्या हक्क सोडपत्रालाच मान्यता असते.

हक्क सोडपत्र कोण करू शकतो?

हक्क सोडपत्र हे एकत्र कुटुंबाचा सदस्य, मग तो पुरुष असो वा स्त्री किंवा सहहिस्सेदार कोणीही हक्क सोडपत्र करू शकतो. वारसा हक्काने आई-वडिलांच्या मालमत्तेमध्ये मुलींना देखील वाटा आहे हे शासनाने कायद्याप्रमाणे नमूद केले आहे. त्यामुळे मुली त्यांचा हक्क घेतात किंवा हक्कसोड प्रमाणपत्रावर सही करून त्यांचा असणारा मालमत्तेवरील हक्क सहहिस्सेदारांच्या नावावर करतात. हक्क सोड पत्र हे स्वतःच्या हिश्श्याच्या काही भागाचे किंवा संपूर्ण भागाचे करता येते.

हे वाचा-  आता सबसिडीसाठी वाट पाहावी लागणार नाही, अवघ्या 8 दिवसांत कृषी उपकरणांवर अनुदानाची मंजुरी मिळणार आहे.

तुमच्या जमिनीचा सातबारा नकाशा पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

हक्क सोडपत्र कोणत्या मिळकतीचे होऊ शकते?

हक्क सोडपत्र ही फक्त वारसा हक्काने किंवा वारसा अधिकाराने मिळालेल्या किंवा मिळू शकणाऱ्या एकत्र कुटुंबातील त्याच्या मिळकतीच्या संबंधात होऊ शकते.

हक्क सोडपत्र व मोबदला

हक्क सोडपत्र हे कुटुंबातील व्यक्तींच्या नावे असल्याने त्यावर शासन कोणताही मोबदला आकारत नाही. त्याचबरोबर जी व्यक्ती मालमत्तेवरील मालकी हक्क सोडत आहे त्या व्यक्तीस हक्क सोडण्याचा मोबदला इतर मालमत्तेमध्ये हक्क सांगणारी इतर व्यक्ती देऊ शकतात. हक्क सोड पत्र हे नोंदणीकृत असणे खूप आवश्यक असते त्यामुळे मुद्रांक शुल्का एवढेच नोंदणी शुल्क आकारले जाते.

हक्क सोडपत्र नोंदणीकृत असणे का आवश्यक आहे?

हक्क सोडपत्राची नोंदणी करणे खूप आवश्यक असते, अन्यथा त्याची नोंद सरकार दप्तरी होत नाही. कायद्याने हक्क सोडपत्र हे तोंडी किंवा लेखी असू शकते, मात्र तोंडी हक्क सोडपत्र सिद्ध करणे शक्य नसते. म्हणूनच ती लेखी असणे खूपच आवश्यक आहे. हक्क सोडपत्र ही लेखी असल्यास त्याची नोंदणी करणे ही खूप महत्त्वाचे आहे. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882 कलम 123 अन्वये मालमत्ता हस्तांतरण नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. नोंदणी अधिनियम 1908 कलम 17 अन्वये तावर मालमत्तेचे दान किंवा बक्षीस पत्र याची नोंदणी करणे आवश्यक आहे.

हक्क सोडपत्राच्या दस्ताची कार्यपद्धती

हक्क सोडपत्र लिहून देणाऱ्यांनी स्वतंत्रपणे किंवा संयुक्तिकरित्या सर्वांनी मिळून कुटुंबाच्या कोणत्याही एका सदस्याच्या किंवा एकापेक्षा जास्त सदस्यांच्या नावावर करून ठेवता येते. हक्क सोडपत्राचा दोस्त हा एखाद्या जाणकार वकिलांकडून करून घेणे गरजेचे असते. दस्त हा अद्यावत तरतुदीनुसार किती रकमेचा आहे हे पाहून त्या मुद्रांकपत्रावर लेखी असावा. त्याचबरोबर दस्तामध्ये खाली दिलेल्या गोष्टी नमूद असाव्यात.

  • हक्क सोडपत्र देणाऱ्या व्यक्तीचे नाव, वय, पत्ता, धंदा याचा संपूर्ण तपशील
  • हक्क सोड पत्र घेणाऱ्या व्यक्तीचे नाव, वय, पत्ता, धंदा याचा संपूर्ण तपशील
  • एकत्र कुटुंबाच्या हिस्स्याप्रमाणे किंवा संपूर्ण मिळकतीचे वर्णन
  • एकत्र कुटुंबाच्या वंशावळीचा दस्ताऐवज
  • दोन साक्षीदार व त्यांची नावे, वय, पत्ता याचा संपूर्ण तपशील
  • दस्ताचे निष्पादन व साक्ष
  • दस्तास आवश्यक मुद्रांक
  • दस्ताची नोंदणी
  • हक्क सोड पत्र स्वतःच्या हिश्याच्या सर्व किंवा त्यातील काही मालमत्तेवरच करता येते. हक्क सोडपत्र स्वतःच्या हिस्स्याच्या कोणकोणत्या मालमत्तेबाबतीत आणि कोणाच्या नावे करीत आहे आणि स्वतःच्या हिस्स्याच्या कोणत्या मालमत्ते बाबतीत हक्क सोडपत्र केले नाही. याचा स्पष्ट उल्लेख हक्क सोडपत्रात करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही.
हे वाचा-  लाडका भाऊ योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती | लाडका भाऊ योजनेअंतर्गत 10 हजार रुपयांची मदत.

७/१२ डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .

हक्क सोडपत्र कधी आणि कुठे तयार करता येते?

हक्क सोड पत्र कधीही करता येते त्यास मुक्तीच्या कायद्याचा अडसर येत नाही. हक्क सोडपत्र गाव कामगार तलाठी तयार करून देत असल्याने, हक्क सोडपत्र तयार करायचे असल्यास गाव कामगार तलाठी कार्यालयात जावे लागते. या ठिकाणीच या पत्राची नोंदणी करून कागदपत्रांची देखील तपासणी केली जाते. हक्क सोडपत्र नोंदणीकृत असेल तरच गाव नमुना 6 मध्ये त्याची तलाठ्याद्वारे नोंद करून सर्व हितसंबंधितांना नोटीस बजावली जाते. नोटीस बजावल्यानंतर पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये कोणत्याही हितसंबंधिताची तक्रार नसल्यास मंडळ अधिकारी द्वारे नोंद करून हक्क लाभदारांची नावे ७/१२ वर दुरुस्त केली जातात. अनोंदणीकृत हक्क सोडपत्राची नोंद करणे अवैध आहे.

हक्क सोडपत्राचे महत्व

शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये मालमत्तेच्या खटल्यात हक्क सोड प्रमाणपत्र तयार केले जाते. एखाद्या मालमत्तेमध्ये हिस्सेदार असतील तर ते त्यांचा हिस्सा सोडत असल्यास त्यांच्या नावे हक्क सोड प्रमाणपत्र देतात. एकदा हक्क सोड प्रमाणपत्र दिल्यानंतर त्यांचा वंशपरंपरागत मालमत्तेमध्ये काहीही हक्क नाही असा त्याचा अर्थ होतो. एकदा का नोंदणीकृत पद्धतीने हक्क सोड पत्र दिल्यानंतर मालमत्तेतून हक्क सोडलेल्या व्यक्तीचा वडिलोपार्जित कोणत्याही मालमत्तेमध्ये हक्क उरत नाही. त्यामुळेच हक्क सोड पत्र हे वडीलोपार्जित मालमत्तेमध्ये खूपच महत्त्वाचे आहे. या कारणामुळेच कोणीही जर वडिलापार्जित मालमत्तेमध्ये हक्क सोड पत्र देत असेल तर त्याने हा निर्णय खूप विचारपूर्वक करणे आवश्यक आहे.

हे वाचा-  सिबिल स्‍कोर खराब झाला तर सुधारण्यासाठी किती वेळ लागतो? 90% लोकांना माहीत नाही. / How long does it take to improve CIBIL score if it gets bad?

सदर लेखामध्ये आपण हक्क सोडपत्राविषयी संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदरची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे त्याचबरोबर सदरचा लेख तुम्हाला खूप आवडलेला असेल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page