व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

Mahindra SUV BE6: ही इलेक्ट्रिक कार 682 किमी रेंज साठी चार्ज होते फक्त 20 मिनिटांमध्ये, जाणून घ्या या कार विषयीची AtoZ माहिती..

नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर चारचाकी गाड्यांचे शौकीन असाल तर हा लेख खास करून तुमच्यासाठी आहे, कारण महिंद्रा कंपनीने नोव्हेंबर 2024 मध्ये दोन नवीन इलेक्ट्रिक SUV BE6 आणि XEV 9E लॉन्च केल्या आहेत. आपण सदर लेखामध्ये महिंद्रा कंपनीने लॉन्च केलेल्या या दोन इलेक्ट्रिक फोर व्हीलर गाड्यांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया महिंद्रा इलेक्ट्रिक कार विषयी संपूर्ण माहिती.

महिंद्रा SUV BE6 आणि XEV 9E कारच्या टॉप मॉडेलची किंमत

नोव्हेंबर 2024 मध्ये महिंद्रा कंपनीने या दोन नवीन SUV इलेक्ट्रिक गाड्यांच्या फक्त बेस मॉडेलच्या किमती जाहीर केल्या होत्या. नुकतेच महिंद्रा कंपनीने या दोन्ही कारच्या टॉप मॉडेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. यामध्ये BE 6 च्या टॉप मॉडेल ची किंमत 26.90 लाख रुपये आहे. त्याचबरोबर बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 18.90 लाख रुपये आहे. सध्या फक्त महिंद्रा कंपनी कडून बेस आणि टॉप मॉडेल च्या किमती जाहीर करण्यात आले आहेत. याच्या मिड मॉडेलची किंमत अजून कंपनीकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

नवीन अल्टो चा जबरदस्त लुक, देणार तब्बल 35 किलोमीटरचे आवरेज. 👇

महिंद्रा SUV BE6 आणि XEV 9E कारची बुकिंग आणि डिलिव्हरी

महिंद्रा BE6 च्या टॉप मॉडेल चे बुकिंग 14 फेब्रुवारी पासून सुरू होईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहेत. याशिवाय बेस आणि मिड मॉडेल चे बुकिंग मार्चमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. या गाड्यांची डिलिव्हरी मार्च 2025 च्या अखेरीस सुरू होईल. महिंद्रा कंपनीच्या या दोन्ही कार ग्राहक कंपनीच्या ॲपवरून बुकिंग करू शकतात.

हे वाचा-  2024 मध्ये इंटनेटवरून पैसे कसे कमवायचे -ऑनलाइन पैसे कमावण्याचे दहा मार्ग-दररोज 500 ते 1000 रुपये कमवा

महिंद्रा SUV BE6 आणि XEV 9E कार लूक आणि डिझाईन

महिंद्रा BE 6 च्या लूक आणि डिझाईन बद्दल सांगायचे झाल्यास, ही एक खूप स्टायलिश एसयुव्ही कार आहे. या कारमध्ये विंग मिरर आणि फ्लॅश-फिटिंग डोअर आहेत. त्याचबरोबर या कार मधील ग्लास थीक आहेत. या कारमध्ये लोगोसह नवीन C साईजचा LED डे टाईम रनिंग लाईट स्प्लिट स्पायर आहे. कारच्या प्रोफाईल मध्ये कंपनीकडून बरेच बदल करण्यात आलेले आहेत.

महिंद्रा SUV BE6 आणि XEV 9E कार बॅटरी बॅकअप, इलेक्ट्रिक मोटर आणि रेंज

महिंद्रा BE6 कार मध्ये दोन बॅटरी बॅकअप पर्याय आहेत. यामध्ये 59 kWh आणि 79kWh हे दोन बॅटरी बॅकअप पर्याय आहेत. यामध्ये रियर एक्सल माउंटेन इलेक्ट्रिक मोटर आहे 231PS ते 285.5PS पर्यंत पावर जनरेट करते. महिंद्रा BE6 कार फुल चार्ज झाल्यानंतर 682 किलोमीटर पर्यंत रेंज देते. महिंद्रा कार 175 kW पर्यंत DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, ज्याद्वारे ही बॅटरी फक्त 20 मिनिटात 20 ते 80% चार्ज होते.

महिंद्रा SUV BE6 आणि XEV 9E कारमधील फिचर्स

महिंद्रा BE6 मध्ये ड्युअल इंटिग्रेटेड स्क्रीन सेटअप, मल्टी झोन एसी, ड्युअल वायरलेस फोन चार्जर आणि 1400 वॅट 16-स्पीकर हरमन गार्डन साऊंड सिस्टिम याशिवाय यात फिक्सड सनरूप आणि ऑगमेंटेड रियालिटी बेस्ड हेडअप डिस्प्ले अशा फीचर्सचा नवीन महिंद्रा कार मध्ये समावेश केला गेला आहे.

हे वाचा-  नवीन TVS RAIDER  येणार  खुप साऱ्या आकर्षित फीचर्स  सह, तेही फक्त इतक्या कमी किमतीत

नवीन अल्टो चा जबरदस्त लुक, देणार तब्बल 35 किलोमीटरचे आवरेज. 👇

महिंद्रा SUV BE6 आणि XEV 9E किती सुरक्षित?

महिंद्रा BE6 कार अँग्लो प्लॅटफॉर्म बेस्डवर आधारित आहे. या कारला क्रॅश टेस्टिंग मध्ये 5 स्टार मिळालेले आहेत. प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी या कारमध्ये 7 एअरबॅग्ज(स्टॅंडर्ड), इलेक्ट्रॉनिक्स स्टेबिलिटी प्रोग्राम(EPS) आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम(TPMS) यासारखी फीचर्स आहेत. याशिवाय या कारमध्ये लेव्हल 2 ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम (ADAS) टेक्निक देखील आहे, ज्यामध्ये लेन-कीप असिस्ट, फॉरवर्ड कॉलिजन वार्निंग आणि ॲडॉप्टीव्ह क्रूझ कंट्रोल यासारख्या सेफ्टी फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ही महिंद्रा इलेक्ट्रिक एसयूव्ही कार खूपच सुरक्षित मानली जात आहे.

सदर लेखामध्ये आपण महिंद्रा BE6 इलेक्ट्रिक एसयुव्ही कार विषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहिती ही ज्यांना कारमध्ये खूपच रस आहे त्यांच्यासाठी त्याचबरोबर ज्यांना इलेक्ट्रिक कार खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आमचा हा लेख तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page