व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

APAAR ID Card:   प्रत्येक विद्यार्थ्याला काढावे लागणार ‘अपार कार्ड’याचा नेमका उपयोग काय?हा क्रमांक कसा मिळेल?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या देशाच्या एकूणच शैक्षणिक पारखतीत अमूल्य ग्रह बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अभ्यासक्रमातील पासून ते कार्यपद्धती बदलापर्यंतचा हा मोठा पट आहे. यातीलच अपार हा एक उपक्रम कार्यान्वित झाला आहे. याद्वारे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतंत्र ओळख क्रमांक आणि सोबतच डिजिलॉकरची सोय उपलब्ध करून दिली जात आहे. एक देश एक विद्यार्थी ओळख या संकल्पनेच्या अंतर्गत हा उपक्रम आहे.

‘अपार ‘म्हणजे काय?

ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमीक अकाउंट रजिस्ट्री याचे लघु म्हणजे अपार अपार हा देशातील पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा बारा अंकी इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस म्हणजेच यू-डायस पोर्टलमध्ये सध्या प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. येथे त्याचा व्यक्तिगत शैक्षणिक क्रमांक नोंदविला अपार आयडी’या पीइएन ची जागा घेणार आहे.

त्याचा नेमका उपयोग काय?

प्रत्येक विद्यार्थी वा विद्यार्थिनीची शैक्षणिक आणि शिक्षण तेवर प्रगती विषयक माहिती डिजिलॉकर मध्ये सुरक्षित करणे आणि या डीजी लॉकर साठी स्वतःचा स्वतंत्र ओळख क्रमांक असणे हा अपारचा उद्देश आहे. शिक्षणासाठीची अधिकृत मूळ कागदपत्रे या व्यासपीठावर सहज उपलब्ध होणार आहेत. एखाद्या विद्यार्थ्यांची शाळा बदलल्यास त्याला नव्या शाळेत सगळी कागदपत्रे जमा करण्याची गरज पडणार नाही कारण डिजिलॉकर उपलब्ध असेल. एखाद्या कंपनीला नोकरी देताना उमेदवाराचा शैक्षणिक अर्हतेची खातर जमा करण्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे.

क्रमांक कसा मिळेल?

‘अपार’ओळख क्रमांकासाठी शाळांनी पालकांशी संपर्क साधायचा आहे पालकांनीही याबाबत जागरूक असण्याची अपेक्षा आहे’ अपार’ साठी यु-डायस नोंदणी क्रमांक, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर, आईचे नाव, वडिलांचे नाव, आधार कार्ड वरील नाव, आधार क्रमांक, सर्व तपशील आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे यु-डायस आणि आधार कार्ड वरील नाव सारखे असणे गरजेचे आहे. विद्यार्थी हा 18 वर्षाखालील असेल तर प्रक्रियेसाठी पालकांची लेखी संमती आवश्यक आहे. या सगळ्या माहितीची शाळांना खातर जमा करायची आहे ‘अपार’आयडी तयार झाला की तो डिजिलॉकरशी जोडला जाईल. याला विजू लोकर म्हणूनही ओळखले जाते.

डिजिलॉकर काय आहे?

डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत केंद्राच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने डिजिलॉकर हे नागरिकांसाठी क्लाऊड आधारित डॉक्युमेंट वॉलेट तयार केले. शासकीय व्यवहारात कागदपत्रांचा वापर टाळणे, ही प्रक्रिया डिजिटल करणे हा मूळ आणि मुख्य उद्देश आहे. अधिकृत कागदपत्रे, प्रमाणपत्रे सुरक्षित ठेवली जातात. गरजेनुसार ती उपलब्ध करून दिली जातात.

डिजिलॉकरमधील कागदपत्रे ही माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 नुसार अधिकृत मानली गेली आहेत.

सद्यस्थिती काय आहे?

आतापर्यंत ३४ कोटींची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रातही यासंबंधीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सगळी माहिती २० नोव्हेंबर पर्यंत संकलित करण्याच्या राज्यातील शाळांना सूचना होत्या. मात्र दिवाळीच्या सुई आणि विधानसभा निवडणुकीमुळे या कामावर परिणाम होत आहे ‘अपार’ओळख क्रमांक हा डिजिलॉकर शी संबंधित असल्याने डिजिलॉकर विषयी जागरूकता निर्माण करण्याचे आव्हान शैक्षणिक संस्था पुढे यंत्रणे पुढे आहे शासकीय यंत्रणांचं प्रसंगी डीजीलॉकर स्वीकारत नसल्याची उदाहरणे असल्याने केवळ अपार प्रमाणात तयार करून ही प्रक्रिया थांबवणार की डिजिलॉकरचा पुरेपूर उपयोग होणार हे दिसेलच.

कोणत्या कामासाठी ठरेल उपयोगी?

‘अपार कार्ड’मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात जतन करण्यात येईल. हे कार्ड म्हणजे त्याचे शिक्षण माहितीपत्रक असेल. विद्यार्थ्यांना कोणत्या येते पर्यंत शिक्षण पूर्ण केले त्याला कोणती बक्षीस मिळाली प्रमाणपत्र मिळाली. त्याची शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा निपुणता त्याचा आलेखच हे कार्ड असेल. त्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल तर त्याची माहिती देण्यात येईल. त्याच्या गुणवत्तेचा आलेख असेल शाळा बदलली तर ती पण माहिती जतन होईल.

    APAAR ID कार्डचा फायदा काय?

  1. अपार कार्ड विद्यार्थ्यांना सार्वजनिक बस सेवेत सवलत मिळेल. सध्या राज्यात एसटी महामंडळ विद्यार्थ्यांना सवलतीत प्रवास योजना राबवते. त्यासाठी हे कार्ड ग्राह्य असेल.
  2. अपार कार्ड मुळे विद्यार्थ्यांना विविध सरकारी संग्रहालयात मोफत प्रवेश असेल
  3. विद्यार्थ्यांना विविध परीक्षा शुल्क भरणा, उत्तीर्ण परीक्षा आणि त्यांचा रेकॉर्ड ट्रॅक होईल. विद्यार्थ्यांचा त्यांच्या बारा अंकी क्रमांका आधारे शैक्षणिक क्षेत्रातील निकाल ऑनलाईन पाहता येईल.
  4. करताना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत दाखला घेतात देशातील कोणत्याही महाविद्यालया, शिक्षणासाठी प्रवेश घेताना अपार गार्डचा डेटा वापरता येईल. कार्ड आयडी आपार बारा अंकाच्या आधारे त्यांचा प्रवेश निश्चित होईल. कागदपत्रांची झंझट संपेल.
  5. विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार कार्ड आणि अपार कार्ड संलग्न असेल. विद्यार्थ्यांसाठी च्या सर्व सरकारी योजनांचा थेट लांब या खात्यात जमा होईल. त्यांच्या पुरस्कारांची रक्कम विविध परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरची रक्कम या खात्यात जमा होणार आहे.
  6. विद्यार्थ्याचे बँकेतील खाते उघडताना आधार कार्ड आणि अपार आयडी महत्त्वाचे असेल त्यामुळे गरजू पात्र विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली हे निश्चित होईल.
  7. सरकारकडे एकदा डाटा आल्यानंतर गरजू विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना मोफत पुस्तक आणि व यांचा पुरवठा होईल त्यांना स्टेशनरी पुरवण्यात येईल.
  8. विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड आणि त्याला पॅन कार्ड जोडणे झाल्यानंतर गरजू आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा फायदा देणे सोपी होईल.
  9. देशभरात शैक्षणिक सहली आयोजन करताना विद्यार्थ्यांच्या या माहितीचा उपयोग होईल.
  10. विद्यार्थ्यांची संख्या विविध अभ्यासक्रमातील जागा व्यवसायिक अभ्यासक्रमातील जागा या सर्व माहितीची गोळा करून आणि नोकरीची रोजगारांची उपलब्ध यांची सांगड घालता येईल त्याद्वारे नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment