व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

कोणत्याही बँकेतून कर्ज घेताना फसवणूक होऊ नये म्हणून घ्या ही काळजी

नमस्कार मित्रांनो आज आपण बँकेतून कर्ज घेताना कोणकोणत्या बाबींकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे याबद्दल माहिती घेऊया.

दैनंदिन जीवनात कधी ना कधी बँकेकडून कर्ज घेणे कर्ज घेणे आवश्यक असते कारण त्याशिवाय माणसाच्या आयुष्यात प्रगती होत पण बँक कर्ज देताना आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

बँक आपल्याला त्यांची प्रलोभने दाखवून त्यांच्या अटी व शर्ती तोडण्याची त्यांची शक्य नसते कारण आपल्याकडून जास्त प्रमाणात व्याजदर हा वसूल करणे हे बँकेचे धोरण असते त्यांच्या अटी व शर्ती आपण तपासून पाहणे हे फार गरजेचे आहे .

कारण आपण कर्ज घेताना फारशी चौकशी करत नसल्यामुळे ते आपल्या या गोष्टीचा फायदा घेऊ शकतात फक्त व्याजदर न चेक करता इतर महत्त्वाच्या बाबींकडे आपण लक्ष देणे फार गरजेचे आहे .

पण बँकेचा फक्त व्याजदर नसून बाकीच्या इतर अटी अशा बऱ्याच असतात की ज्याचे आपल्याकडून अतिशुल्क बँकेतर्फे वसूल केले जातात ज्याची आपल्याला थोडीशीही कल्पना नसते .

कारण बँकेतील कर्मचारी आपल्याला या गोष्टींबद्दल जराही माहिती देत नाहीत तुम्हाला फक्त निवडक माहिती व व्याजदर फार कमी आहे असे सांगितले जाते पण बऱ्याचदा हा व्याजदर मोठ्या प्रमाणात आपल्याकडून वसूल केला जातो.

पण आपण कर्ज घेताना आपल्याला कर्जाची खरच तातडीची गरज आहे का हे आपण विचारात घेणे गरजेचे आहे जर आपल्याला कर्जाची गरज नसेल तर आपण कर्ज घेणे टाळणे हे कधीही चांगले.

कारण कर्ज घेतलेल्या दिवसापासून आपल्याला व्याजदर हा चालू होतो त्यामुळे आपण कर्ज घेऊन ज्यामध्ये गुंतवणूक करणार आहे त्यामधून आपली वेळेत परतफेड होईल ? आपल्याकडून व्यवस्थित रित्या कर्जाचे हप्ते बँकेला पोहोचतील का या सर्व गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे नाहीतर आपल्याला बँकेला दंड भरावा लागतो.

हे वाचा-  35% कर्ज माफ, सरकार देत आहे कर्ज | PMEGP Loan Yojana Online Apply

मित्रांनो आता आपण कर्ज घेताना कोणकोणत्या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे पाहूया….

परतफेड ची एकूण रक्कम

जर आपण कोणत्याही बँकेकडून मुद्दल रक्कम किती घेतले आहे व त्याची परतफेड आपल्याला व्याजासहित किती रक्कम बँकेला द्यावी लागते तपासून पाहणे आवश्यक आहे .कारण बँक फक्त व्याजदर न करता इतर शुल्क देखील आकारते जसे की प्रोसेसिंग फी, इन्शुरन्स, फिक्स डिपॉझिट व आपल्याला इतर चार्जेस लावले जातात .जे आपल्याला सांगितले जात नाहीत आपल्याकडून कर्जाच्या रकमेच्या दोन टक्के इतकी प्रोसेसिंग फी आपल्याकडून घेतले जाते व ती काही वेळेस जास्त देखील असू शकते जर आपण त्याची चौकशी केली नाही.

तर जसे की आपण जर एक लाख रुपये मुद्दल बँकेकडून घेतली. तर ते आपल्याला किमान पंधरा टक्के व्याजदर असं एक लाख पंधरा हजार इतकी बँकेला त्याची पूर्ण रक्कम परतफेड करावी लागते. परंतु जर बँकेने अतिरिक्त चार्जेस लावलेत तर ही रक्कम एक लाख तीस हजारांकडे जाऊ शकते. कारण आपण बारीक सारीक गोष्टी तपासून पाहत नाही त्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते.

फिक्स डिपॉझिट च्या नावाखाली होणारी फसवणूक

पण कर्ज घेत असताना अशा बँकेची निवड करावी. की ज्या बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट घेतले जात नाही जरी घेतले तरी ते कमी प्रमाणात असावे कारण जिल्हा मध्यवर्ती बँकेत मुद्दे मुद्दलीच्या रकमेमधील सात ते आठ टक्के रक्कम ही फिक्स डिपॉझिट म्हणून घेतली जाते .नियमाप्रमाणे कर्ज परतफेड झाल्यावर ती रक्कम आपल्याला परत करणे हे बँकेकडून आवश्यक असते पण आपण परतफेड करतेवेळी दंड व इतर कारणामुळे ती रक्कम आपल्याला परत केले जात नाही. त्यामुळे आपण कर्ज घेताना राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेणे कधीही चांगले कारण खाजगी बँकांमध्ये त्यांच्या स्वतःच्या अटी व शर्ती असतात व ते आपल्याला मान्य करावे लागतात राष्ट्रीयकृत बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट हे अल्प प्रमाणात घेतले जाते. व आपल्याला कर्जाची परतफेड झाल्यावर ते परत देखील केले जाऊ शकते.

हे वाचा-  बँकेत FD करण्यापेक्षा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून मिळवा 4 पट परतावा

कमी EMI नावाखाली होणारी फसवणूक

कोणतीही बँक कर्ज देताना आपल्याला जास्तीत जास्त कालावधीत परतफेडीसाठी देण्याची प्रयत्न करते कारण या गोष्टीमुळे आपल्याकडून जास्त प्रमाणात व्याजदर वसूल केला जावा कारण जितका आपण बँकेकडून कालावधी जास्त घेतो तितका व्याज आपल्याकडून जास्त वसूल केले जाते जर कालावधी वाढला तर व्याज देखील वाढते.

आपण आपला एम आय निवडताना आपल्या मासिक उत्पन्नाच्या रकमेच्या पंचवीस टक्के किमान एम आय करून घ्यावा कारण जेवढा कमी कालावधीत आपण कर्जाचे पडत परतफेड करणार तेवढे आपल्याला लाभदायक असते सर्व प्रकारच्या कर्जासाठी तुमचा मासिक खर्च हा निव्वळ कोणाच्या 50 टक्के पेक्षा जास्त नसावा दहा टक्के पेक्षा जास्त नसावा.

बँकेचे इतर अटी व शर्ती

⚪ चक्रवाढ व्याज

बँकेकडून कर्ज घेतल्यावर आपल्याला मुद्दलीवर जे व्याज आकारले जाते त्या व्याजाच्या रकमेवर पुन्हा जे व्याज आकारले जाते त्याला चक्रवाढ व्याज म्हणतात पण वेळ जर परतफेड केली नाही तर व्याजाला पुन्हा आपल्याला मूळ मुद्दलीला लागलेल्या आकारले जाते.

⚪ प्रोसेसिंग चार्ज

आपण बँकेकडून जेवढे कर्ज घेतले आहे त्याच्या फक्त दोन टक्के इतका चार्ज आपल्याकडून प्रोसेसिंग फी म्हणून नियमानुसार घेतला जातो पण त्याच्यापेक्षा जर जास्त चार्ज आपल्याकडून घेतला जात असेल तर आपली शुद्ध फसवणूक होत आहे असे समजावे तो बँकेतील कर्मचाऱ्यास याबद्दल आपण माहिती विचारणे गरजेचे आहे.

हे वाचा-  शेतकऱ्यांना ही बँक घर बांधण्यासाठी देत आहे एक लाख रुपयांपासून 50 लाख रुपयांपर्यंत चे कर्ज | BOI star home loan.

⚪ दंड शुल्क

आपण कर्ज कर्ज घेत असताना दंडशुल्क किती आहे हे तपासून पाहणे गरजेचे आहे कारण कर्ज घेतल्यानंतर आपल्याला अतिरिक्त लावला जाऊ शकतो यामुळे एमआयच्या रकमेपेक्षा 25% दंड हा नियमानुसार वसूल केला जातो व त्यापेक्षा जास्त असेल तर आपण तो जास्त का आहे हे बँकेमध्ये विचारणे गरजेचे आहे व शक्य तेवढे प्रयत्न करून आपण कर्जाची परतफेड ही वेळेत करणे फार गरजेचे आहे त्यामुळे आपला सिबिल स्कोर हा चांगला राहतो व कर्जाची परतफेड झाल्यावर वाढतो देखील त्यामुळे आपल्याला पुढील कर्ज घेण्यासाठी जास्त कर्ज मंजूर होते.

काही महत्त्वाच्या बाबी

वरील सर्व बाबींच्या बाबींकडे लक्ष देता आपण कोणत्याही कर्ज करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी बारीक मुद्रितांसह अटी व शर्ती काळजीपूर्वक पहा व तुम्हाला समजत नसलेले कोणतेही कलम किंवा शब्दरचना असल्यास कर्ज घेणाऱ्या बँकेकडे शांतपणे त्याची चौकशी करा व कर्जाची उर्वरित रक्कम ही विमा कंपनीकडे परतफेड केली जाईल याची काळजी घ्या कारण कर्जाचा नियम व अटी संपूर्णपणे समजून घेणे हे सुनिश्चित करते की तुम्हाला तुमच्या अधिकार जबाबदाऱ्या त्यात समाविष्टअसलेल्या धोक्यांची जाणीव आहे

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

1 thought on “कोणत्याही बँकेतून कर्ज घेताना फसवणूक होऊ नये म्हणून घ्या ही काळजी”

Leave a Comment