birth certificate online: नमस्कार, आपण या लेखामध्ये एक महत्त्वाचा दस्तावेज म्हणून जो दस्तावेज ओळखला जातो,तो म्हणजे जन्म प्रमाणपत्र किंवा बर्थ सर्टिफिकेट होय. जन्म प्रमाणपत्र किंवा बर्थ सर्टिफिकेट जर तुमच्याकडून हरवले असेल किंवा सापडत नसेल तर ते घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कसे मिळवता येते? याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन मिळवण्यासाठी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करायचा? आणि या जन्म प्रमाणपत्रात चा उपयोग कोणकोणत्या ठिकाणी होतो. या मुद्द्यांचे विश्लेषण सविस्तरपणे करूया.
जन्म प्रमाणपत्र हे आधार कार्ड व पॅन कार्ड प्रमाणेच एक अतिशय महत्त्वाचा दस्तावेज म्हणून ओळखले जाते. जन्म प्रमाणपत्र हे तुम्हाला सरकारी हॉस्पिटल, तहसील किंवा महानगरपालिका कार्यालयांमधून मिळवता येतो, तसेच ऑनलाईनही काढता येतो.
जन्म प्रमाणपत्र हे एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख, जन्म ठिकाण, लिंग यांची पुष्टी करते. जन्म प्रमाणपत्र एखाद्या व्यक्तीचे कायदेशीर अस्तित्व सिद्ध करते, त्याचबरोबर जन्म प्रमाणपत्राची नोंदणी ही त्या व्यक्तीच्या मालकीच्या लोकसंख्येच्या मूलभूत महत्वपूर्ण डेटाचा स्त्रोत आहे.
पॅन कार्ड दाखवल्यावर मिळतील एक लाख रुपये. खालील बटन वर क्लिक करा.
जन्म प्रमाणपत्राचे उपयोग
जन्म प्रमाणपत्राचा उपयोग जवळजवळ सर्व महत्त्वाच्या ठिकाणी होतो. जन्म पत्राचा उपयोग कोणकोणत्या ठिकाणी केला जातो हे खालीलप्रमाणे:
- शाळेत प्रवेश घेण्यासाठी
- नोकरीसाठी तर ही प्रमाणपत्र अनिवार्यच आहे.
- बँक अकाउंट काढण्यासाठी
- पासपोर्ट काढण्यासाठी
- ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी
- लग्नाच्या नोंदणीसाठी
- विमा पॉलिसी साठी
जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठीची पात्रता
जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी ची पात्रता खालीलप्रमाणे:
- भारतामध्ये जन्मलेली कोणतीही व्यक्ती जन्म प्रमाणपत्र मिळवू शकते.
- कोणत्याही वयोगटातील व्यक्ती म्हणजेच नवजात ते प्रौढांपर्यंत जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पात्र आहेत.
- जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांच्या मुलांसाठी आई-वडील अर्ज करू शकतात.
- परदेशामध्ये जन्मलेल्या भारतीय नागरिकांची मुले ही जन्म प्रमाणपत्र मिळवण्यास पात्र आहेत.
जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी किती शुल्क लागते?
जन्म प्रमाणपत्राची फी राज्यानुसार वेगवेगळी असू शकते. सर्वसाधारणपणे जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी ची फी 50 ते 100 रुपये असू शकते. काही राज्यांमध्ये तर जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणतीही फी नसते.
TATA Capital कडून 40 हजार रुपये मिळवण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा👇👇
उशिरा जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते?
- मुलाच्या जन्मापासून 21 दिवस ते 1 वर्षादरम्यान जन्म प्रमाणपत्र काढायचे असेल तर स्थानिक रजिस्टारची परवानगी लागते.
- 1 वर्ष ते 15 वर्षाच्या मुलांचे जन्म प्रमाणपत्र काढायचे असेल तर जिल्हा मॅजिस्ट्रेटची परवानगी लागते.
- 15 वर्षापेक्षा मोठ्या मुलांचे जन्म प्रमाणपत्र काढायचे असल्यास कोर्टाचा आदेश लागतो.
जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:
- मुलाच्या जन्माचे रुग्णालयातील प्रमाणपत्र
- आई-वडिलांचे आधार कार्ड
- आई-वडिलांचे पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला (वीजबिल, रेशन कार्ड)
- मुलाचे पासपोर्ट साईज फोटो
- आई-वडिलांचे विवाह प्रमाणपत्र
जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज कसा करायचा?
जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो. यासाठीची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहू:
- सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटवर जावे लागेल.👉🏽 https://crsorgi.gov.in
- त्यानंतर तुम्हाला होम पेजवर General Public Sign Up यावर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी भरा.
- त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून व्हेरिफिकेशन करा.
- नंतर पासवर्ड सेट करून अकाउंट बनवा.
- रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगिन करून Apply for Birth Certificate वर क्लिक करा.
- त्यानंतर मुलाची आणि आई-वडिलांची माहिती भरून जन्मतारीख, जन्म ठिकाण, हॉस्पिटलचे नाव टाका.
- त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- फॉर्म भरल्यानंतर फी भरण्यासाठी ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआयचा वापर करा.
- पेमेंट केल्यानंतर पेमेंटची स्लिप डाऊनलोड करा.
- फी भरल्यानंतर तुम्हाला ॲप्लीकेशन नंबर मिळेल. या नंबर वरून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता. अर्ज प्रोसेसिंगला 7 ते 21 दिवस लागू शकतात.
- अर्ज स्वीकारला गेल्यानंतर तुम्हाला एक SMS किंवा मेल येईल. लॉगिन करून तुमचे डिजिटल जन्म प्रमाणपत्र डाऊनलोड करा.
- तुम्ही जन्म प्रमाणपत्राची प्रिंट आऊटही काढू शकता.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे जन्म प्रमाणपत्र किंवा बर्थ सर्टिफिकेट हरवले असेल किंवा सापडत नसेल तर ऑनलाईन अर्ज करून घरबसल्या मिळवू शकता.
सदर लेखामध्ये आपण बर्थ सर्टिफिकेट किंवा जन्म प्रमाणपत्र हरवले किंवा सापडत नसेल तर ते घरबसल्या कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही तुमचे जन्म प्रमाणपत्र हरवले असेल किंवा सापडत नसेल तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घरबसल्या मिळवू शकता. धन्यवाद!