व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

महाराष्ट्रात महिलांना दरमहा 1200 रुपये, लाडकी बहिण योजनेची सुरुवात होणार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रतील महिलांना आनंदाची बातमी दिली आहे. मध्यप्रदेश आणि कर्नाटक प्रमाणे आता महाराष्ट्रातही महिलांना लाडकी बहिण योजने अंतर्गत 1200 ते 1500 रुपये मासिक भत्ता देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मध्यप्रदेश मधील शिवराज सिंग चौहान सरकारच्या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लाडकी बहिण योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

लाडली बहन योजना महाराष्ट्र या योजनेमधून महाराष्ट्रातील महिलांना  महिन्याला १२५० ते १५०० रुपये दिले तर महिलांना वार्षिक पंधरा हजार रुपये होतात. त्यामुळे महाराष्ट्रात ही लाडली बहन योजना तर यातून महाराष्ट्रातील महिलांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत होऊ शकते. आपण आज महाराष्ट्र लाडकी बहन योजना 2024 बद्दल माहिती पाहणार आहे.

लाडकी बहिण योजना लाभ Ladaki Bahin Yojana Maharashtra Benefits

लाडकी बहिण योजना

प्रत्येक महिन्याला बाराशे रुपये एवढा लाभ मिळणार.

या योजनेमध्ये 18 वर्षे पुढील महिला, विधवा महिला परित्यक्ता महिला आणि जास्तीत जास्त 60 वर्षापर्यंत असणाऱ्या महिलांना लाभ मिळतो.

याचा उद्देश महिलांना आर्थिक मदत करणे हे आहे तसेच समाजामध्ये लैंगिक समानता आणणे आहे. लाडकी बहिण योजनेचा लाभ समाजातील गोरगरीब, शेतकरी आणि कामगार महिला ज्यांच्या दुसरा उत्पन्नाचा स्त्रोत नाही अश्या ना होणार आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्तिकरण करणे या योजनेमागे प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्र शेजारील अश्याच प्रकारची एक योजना कर्नाटक राज्यात सुरू आहे. या अंतर्गत कर्नाटक राज्यातील 18 ते 75 वयोगटातील सुमारे 80 लाख महिलांना दरमहा हजार रुपये दिले जातात.

हे वाचा-  शिधापत्रिकेची केवायसी केली नसल्यास बंद होणार तुमचे रेशन कार्ड! लगेच करा e-KYC.

लाडकी बहिण योजना कागदपत्रे Ladaki Bahin Yojana Maharashtra Documents

  • महिलांचे आधार कार्ड / लाभार्थीचे आधार कार्ड
  • रहिवासी दाखला.

  • विवाह प्रमाणपत्र.

  • बँक खाते पासबुक प्रत.

  • उत्पन्नाचा दाखला- अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे. तसेच या कुटुंबांमध्ये कोणीही आयकर न भरणारा पाहिजे.

प्रमुख मुद्दे

◆ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मोठ्या घोषणा केली आहे.

◆ मध्य प्रदेशच्याधर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पैसे दिले जाणार आहेत.

◆ महिलांना दरमहा बाराशे ते पंधराशे रुपये दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

◆ राज्यातील 90-95 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment