होळी म्हणजे रंग, उत्साह आणि आनंदाचा सण! यंदा हा सण आणखीनच खास होणार आहे, कारण लाडकी बहीण योजना अंतर्गत महाराष्ट्र शासनाने मोठी घोषणा केली आहे. होळीच्या निमित्ताने राज्यातील पात्र महिलांना मोफत साडी वाटप करण्यात येणार आहे. यामुळे अनेक कुटुंबांसाठी हा सण अधिक रंगतदार होणार आहे.
फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपये हप्ता कधी मिळणार?
Mazi Ladki Bahin Yojana 8th Installment Update
लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला पात्र महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा केले जातात. मात्र, फेब्रुवारी महिन्याचा हा हप्ता अजून सर्वांच्या खात्यात आलेला नाही. शासनाने सांगितले आहे की महिला दिनाच्या मुहूर्तावर 8 मार्च रोजी फेब्रुवारी चा हप्ता जमा केला जाईल.
काही महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू असल्यामुळे आणि काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे थोडे उशिरा मिळू शकतात. पण योग्य निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना हा लाभ नक्कीच मिळेल.
सोलापुरात गुढीपाडव्याला ५७ हजार महिलांना साड्या
राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या निर्णयानुसार अंत्योदय योजनेतील कार्डधारकांना प्रत्येकी एक साडी दिली जाते. त्यानुसार सोलापूर शहरातील सहा हजार ७२ आणि ग्रामीणमधील ४९ हजार १०३ महिलांना आता गुढीपाडव्याला रेशन दुकानातून प्रत्येकी एक साडी मिळणार आहे. अजून शासन स्तरावरून साड्या आलेल्या नाहीत, पण गुढीपाडव्याला या महिलांना साड्यांचे वाटप होईल, असे नियोजन करण्यात आले आहे.
लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासण्यासाठी खाली क्लिक करा.
लाडकी बहीण मोफत साडी योजना कोणासाठी आहे?
Maharashtra Ladki Bahin Free Sadi Yojana Eligibility
होळीच्या आनंदात भर घालण्यासाठी, अंत्योदय रेशन कार्ड असलेल्या महिलांना ही मोफत साडी मिळणार आहे. शासनाने ठरवले आहे की प्रत्येक अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलेला “एक रेशन कार्ड – एक साडी” या तत्वावर साडी दिली जाईल.

पुणे जिल्ह्यातील किती महिलांना साडी मिळणार?
Ladki Bahin Free Sadi Yojana Pune District
पुणे जिल्ह्यात एकूण 48,874 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तालुक्यानुसार लाभार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे:
- आंबेगाव: 5,137
- बारामती: 7,975
- भोर: 1,909
- दौंड: 7,222
- हवेली: 251
- इंदापूर: 4,443
- जुन्नर: 6,838
- खेड: 3,218
जळगाव जिल्ह्यातील महिलांसाठी मोठी संधी
Ladki Bahin Free Sadi Yojana Jalgaon District
जळगाव जिल्ह्यात तब्बल 1,35,302 महिलांना मोफत साडी मिळणार आहे. हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लाभार्थी असलेले जिल्हे पैकी एक आहे.
साडी वाटप कधी सुरू होईल?
शासनाच्या माहितीनुसार, पुढील महिन्यापासून रेशन दुकानांमध्ये साडी वाटप सुरू होईल. ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे, त्यांनी आपल्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन ही साडी मोफत घेता येईल.
अन्नधान्य विभागाचा पुढाकार
हा उपक्रम अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून राबवला जात आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व रेशन दुकानांमध्ये मोफत साडी वितरित केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता महिलांना ही भेट मिळेल.
Ladki Bahin Yojana New Update Today
लाडकी बहीण मोफत साडी योजना म्हणजे महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. होळीच्या निमित्ताने शासनाने महिलांसाठी एक विशेष भेट दिली आहे. आर्थिक मदतीसह मोफत साडी मिळणार असल्यामुळे अनेक कुटुंबांचे चेहेरे खुलणार आहेत.
जर तुमच्याकडे अंत्योदय रेशन कार्ड असेल, तर लवकरात लवकर तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन मोफत साडी मिळवा आणि होळीचा सण आनंदाने साजरा करा!




