व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

लाडकी बहीण योजना पहिला हप्ता कधी मिळणार आहे | ladki bahin Yojana first installment date

Ladki Bahin Yojna : राज्य सरकारने या अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेची घोषणा होताच राज्यभरातील महिलांचा याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला लाईन लाऊन अर्ज दाखल करत आहे. ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरुन घेतले जात आहेत. यासाठी नारीशक्ती दूत ॲप, पोर्टल, सेतू कार्यालय, अंगणवाडी सेविका आणि महिला व बाल कल्याण विभाग या माध्यमातून योजनेचे अर्ज जमा केले जात आहेत. ज्या महिला इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. आता यापैकी इतर योजनेतील लाभार्थी महिला कोण आहेत याची माहिती मिळवणे सरकारसाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी जुनाच डेटा वापरणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे ज्या महिला इतर योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये

  • लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतील
  • 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी
  • विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांसाठी
  • एका कुटुंबातील एका अविवाहित महिलेलाही लाभ

लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचा अर्ज करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

लाडकी बहीण योजना पहिला हप्ता कधी मिळणार आहे

अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची मुदत: 31 ऑगस्ट 2024 पर्यंत
  • तात्पुरती लाभार्थी यादी: 16 जुलै 2024
  • अंतिम लाभार्थी यादी: 1 ऑगस्ट 2024
  • पहिला हप्ता जमा होण्याची तारीख: 14-15 ऑगस्ट 2024
  • पुढील हप्ते: दर महिन्याच्या 15 तारखेला
हे वाचा 👉  आधार कार्डशी कोणता नंबर लिंक आहे हे जर तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही या पद्धतीने शोधू शकता. |Aadhar Card Mobile Number Link

लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचा अर्ज करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

दरमहा 1500 रुपये

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. राज्य सरकारमधील महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांकडे असलेला जुना डेटा घेण्यात येणार आहे. इतर योजनेतील लाभार्थी महिलांची माहिती त्यामुळे सरकारला मिळणार आहे.

या योजनेसाठी लाखो महिलांचे अर्ज येणार असल्याने इतकी माहिती जमा करणे आणि त्याचं पडताळणी करणे सोपे नाही. त्यामुळेच राज्य सरकार संकलन करण्यात आलेला डेटा वापरणार आहे. ग्रामीण विकास आणि नागरी पुरवठा या विभागांकडे जुन्या योजनेतील संकलित माहिती सरकार यासाठी वापरणार आहे. महिला आणि बालविकास विभाग ही माहिती विविध विभागांनी घेऊन त्यानंतर लाभार्थी महिलांची बँक खाती आणि अन्य तपशील माहिती तंत्रज्ञान विभागाकडे देणार आहे.

या योजनेअंतर्गत अपात्र महिला

  1. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास
  2. कुटुंबातील सदस्य आयकरदाता असल्यास
  3. कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत कायमस्वरूपी असल्यास
  4. इतर योजनांमधून दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त लाभ मिळत असल्यास
  5. कुटुंबातील सदस्य सध्याचे किंवा माजी खासदार/आमदार असल्यास
  6. कुटुंबातील सदस्य सरकारी बोर्ड/उपक्रमांचे पदाधिकारी असल्यास
  7. कुटुंबाकडे सरकारी वाहन असल्यास (ट्रॅक्टर वगळून)

ladki bahin Yojana first installment date

हे वाचा 👉  पोस्ट ऑफिस एफडी योजना: Post Office Time Deposit अंतर्गत पाच लाख गुंतवून 15 लाख रुपयांचा रिटर्न मिळवा.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचा अर्ज करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

मुदत किती तारखेपर्यंत

महाराष्ट्रातील जवळपास अडीच कोटी महिलांना याचा थेट लाभ मिळणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. इतक्या महिलांची माहिती घेऊन ती पडताळणी करणे इतक्या कमी वेळात शक्य नाही. त्यामुळे सरकारने ही युक्ती लढवली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहे. त्यानंतर १५ ऑगस्टच्या आधी पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page