भारताच्या वेगवेगळ्या राज्यांतील सरकारी महिला शक्तीकडून बळकट करण्यासाठी आणि महिला आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक योजना सुरू करत असतात. म्हणूनच या वर्षी महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना सरकारकडून दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक सहाय्य दिलं जातं. सरकारकडून ही रक्कम डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर च्या माध्यमातून थेट महिलांच्या खात्यात जमा होते.
विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकदम मिळाले. आता निवडणुकी ही संपली, निकाल लागला, आचारसंहिता ही संपली नवीन सरकार सत्तेवर ही आले तरी देखील डिसेंबर मधील दीड हजार रुपये कधी मिळणार याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडून मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. आता दरमहा 2100 रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार अशा महिलांच्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, लाडक्या बहिणींना मकर संक्राती पूर्वी चौदा जानेवारीला दोन हप्ते मिळतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लाडक्या बहिणींना मिळणार पर्सनल लोन 👇👇👇
सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख दहा हजार लाडक्या बहिणींचा राज्यातील अडीच कोटीहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्ज केलेले आहेत. या योजनेअंतर्गत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. लाडके व नेण्यासाठी लागणाऱ्या पैशांमधून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. मात्र दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांना प्रतिउत्तर दिल्याने या योजनेवरून विधानसभा निवडणूक काळात वातावरण चांगलं तापलं होतं. दोन पक्षांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण झालं होतं. माहितीच्या नेत्यांकडून आम्ही जर सत्तेवर आलो तर 2100 रुपये देऊ अशी घोषणा करण्यात आली होती. तर दुसरीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना 3000 रुपये दिवशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. आता पुन्हा राज्यात माहितीच सरकार आलं तर ही योजना बंद पडेल निवडणुकीसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती असा आरोप देखील महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता.
याला आता पुन्हा एकदा भाजप नेते सुधीर मनगुंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटले की लाडके बहिण योजना सुरूच राहणार आहे. पण ते अजून पुढे बोलले की, कुटुंबाच वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्यावर आहे अशा लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच कर भरणाऱ्या महिलांचा अर्ज देखील अपेक्षित नाहीये असे देखील बोलल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडके बहिण योजनेबाबत मोठे विधान केलं होतं.फडणवीस म्हणाले, या योजनेत लाभार्थ्यांच्या अर्जाच्या नोंदीची तपासणी केली जाईल. ज्या महिलांनी योजनेच्या नियमांचे पालन केले नाही.त्या महिलांना या योजनेचा लाभ कदापि मिळणार नाही. त्या महिलांना या योजनेतून बाहेर केले जाईल.