आधार कार्ड वर मिळणार 5 लाख रुपये, कसे ते? पहा संपूर्ण माहिती..|Aadhar Card 5 Lakh Personal Loan

नमस्कार, सदर लेखामध्ये आपण आधार कार्ड वरून 5 लाख रुपये वैयक्तिक कर्ज (Aadhar Card 5 Lakh Personal Loan) कसे घ्यायचे? याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण सदर कर्जासाठी आवश्यक पात्रता काय आहे? सदर कर्जाचा व्याजदर व परत भेटीचा कालावधी किती आहे? सदर कर्ज घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे? त्याचबरोबर हे कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करायचा? वरील मुद्दे आपण सविस्तरपणे पाहूया.

आधार कार्ड विषयी थोडक्यात..

आधार कार्ड भारत सरकार द्वारे भारतातील नागरिकांना जारी केलेले ओळखपत्र आहे. आधार ही जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक आयडी प्रणाली म्हणून ओळखली जाते. आधार कार्डवर 12 अंकी क्रमांक छापलेला आहे जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) जारी केलेला आहे. हा क्रमांक भारतात कुठेही व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून काम करतो. भारतातील कोणतीही व्यक्ती आधारसाठी नोंदणी करू शकते. आधारसाठी नोंदणी ही फक्त एकदाच करता येते. नाव नोंदणी मोफत आहे. आधार कार्ड हे फक्त एक ओळखपत्र आहे, ते नागरिकत्वाचे प्रमाणपत्र नाही.

आधार कार्ड 2009 मध्ये भारत सरकारने लॉन्च केले होते. सध्या आधार कार्ड हे कोणत्याही व्यवहारामध्ये एक महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. तुम्हाला आधार कार्डवर वैयक्तिक कर्जही घेता येते. कोणत्याही तातडीच्या कामासाठी, त्याचबरोबर शिक्षण, लग्न, घराचे नूतनीकरण किंवा नवीन घराची बांधणी करण्यासाठी तात्काळ वैयक्तिक कर्ज फक्त आधार कार्ड या दस्तऐवजावर मिळू शकते. त्यामुळे आधार कार्ड हा खूप महत्त्वाचा दस्तावेज म्हणून ओळखला जातो.

Aadhar Card 5 Lakh Personal Loan व्याजदर व परतफेडीचा कालावधी

आधार कार्ड वरून घेतलेल्या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर तुमच्या कर्जाच्या रकमेवर अवलंबून असतो. त्याचबरोबर तुमच्या क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर वर देखील सदरचा व्याजदर अवलंबून असतो. आधार कार्ड वरून वैयक्तिक कर्जाचा व्याजदर हा 10.50% ते 14% पर्यंत असू शकतो. पण सदरचा व्याजदर हा तुम्ही ज्या बँकेकडून किंवा इतर कोणत्याही पर्सनल लोन प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन कर्ज घेता त्यावर अवलंबून असतो.

सदर कर्जाच्या परतफेडीचा कालावधी सुद्धा कर्जाच्या रकमेवर अवलंबून असतो,सरासरी विचार केला तर कर्जफेडीचा कालावधी हा 3 महिने ते 60 महिन्यापर्यंतचा असतो. सदरच्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी सुद्धा तुम्ही हे वैयक्तिक कर्ज बँकेकडून किंवा कोणत्या प्लॅटफॉर्मवरून घेता यावर सुद्धा अवलंबून असू शकतो.

Aadhar Card 5 Lakh Personal Loan पात्रता

आधार कार्ड वरून पाच लाख रुपये पर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार व्यक्तीला काही अटी व शर्ती मध्ये पात्र होणे आवश्यक आहे. सदरच्या अटी व शर्ती कोणते आहेत ते खालीलप्रमाणे:

  • अर्ज करणारा व्यक्ती हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे, तरच तो आधार कार्ड द्वारे कर्ज घेऊ शकेल.
  • अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे.
  • अर्जदाराचा आधार नंबर त्याच्या मोबाईल नंबरची लिंक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे किमान मासिक उत्पन्न हे 25,000  रुपये असावे.
  • अर्जदार व्यक्तीचा सिबिल स्कोर 750 च्या वर असणे गरजेचे आहे.

Aadhar Card 5 Lakh Personal Loan आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य आहे. सदरची कागदपत्रे कोणती आहेत ते खालीलप्रमाणे:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक खाते
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर

Aadhar Card 5 Lakh Personal Loan अर्ज कसा करायचा?

आधार कार्ड वरून वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याबाबतची संपूर्ण माहिती आपण खाली स्टेप बाय स्टेप पाहूया:

  • सर्वप्रथम तुम्हाला तुम्ही ज्या बँकेकडून आधार कार्डवर कर्ज घेणार आहात त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर वैयक्तिक कर्ज यावर क्लिक करा.
  • येथे एक नवीन पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड इ. माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर तुम्ही दिलेली माहिती योग्य आहे का हे पुन्हा एकदा तपासून सबमिट बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही पुढील टॅबवर जा.
  • येथे एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये कर्जाची रक्कम आणि कालावधी निवडा.
  • वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बँक किंवा ज्या वित्तीय संस्था तुमची कागदपत्रे आणि पात्रता तपासले.
  • जर तुम्ही सदर कर्जासाठी पात्र असाल तर तुमचा कर्ज अर्ज मंजूर केला जाईल, तुम्ही जर सदर कर्जासाठी पात्र नाही असे आढळल्यास तुमचा अर्ज नाकारला जाईल.
  • पात्र ठरल्यानंतर बँकेची विहित प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड वरून मिळणाऱ्या वैयक्तिक कर्जाचा लाभ घेता येईल.

अशा पद्धतीने तुम्हाला आधार कार्ड वरून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करता येतो.

सदर लेखामध्ये आपण आधार कार्ड वरून पाच लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज (Aadhar Card 5 Lakh Personal Loan) कसे घ्यायचे? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही आधार कार्ड वरून वैयक्तिक कर्ज मिळवून तुमच्या योजना किंवा अत्यावश्यक गरजा पूर्ण करू शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page

×