व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

जन्माचा दाखला मोबाईल वरून कसा काढायचा| महाराष्ट्र जन्म प्रमाणपत्र, जन्म दाखला Birth Certificate Online

शासकीय किंवा महत्त्वाच्या कागदोपत्री कामांसाठी जन्म प्रमाणपत्र Birth Certificate हे अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आहे. जर तुम्हाला घरी बसून सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून जन्म प्रमाणपत्र काढायचे असेल, तर तुम्ही ते महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईट वरून काढू शकता. आम्ही आज या लेखात जन्माचा दाखला Birth Certificate काढण्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

दैनंदिन जीवनात आधार कार्ड आणि पॅन कार्डप्रमाणेच जन्म प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे. शाळा प्रवेश, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार यादी, आधार क्रमांक नोंदणी, विवाह नोंदणी, आणि सरकारी नोकरीसाठी जन्म प्रमाणपत्र लागते. जर तुम्ही हे प्रमाणपत्र काढण्याचा विचार करत असाल, तर खालील माहिती तुम्हाला उपयोगी पडेल.

आधार कार्डवर 50 हजार रुपये मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करा.

Birth Certificate Online | ऑनलाइन जन्म दाखला काढण्याची पद्धत

महाराष्ट्र सरकारने राज्यातील नागरिकांसाठी ऑनलाइन पोर्टल द्वारे जन्माचा दाखला काढण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार या पोर्टलवर ही सुविधा उपलब्ध आहे.

जन्माचा दाखला काढण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

  1. जन्माचा दाखला Birth Certificate काढण्यासाठी सर्वप्रथम आपले सरकार पोर्टलवर जा. आपले सरकार वेबसाइट
  2. तुमचे आपले सरकार पोर्टलवर खाते असल्यास लॉगिन करा, आणि जर तुमचे खाते नसेल तर नवीन खाते तयार करा. वेबसाइटवर खाते तयार करून लॉगिन करा.
हे वाचा-  आयुष्यमान भारत योजनेमधील दवाखान्यांची यादी अशी शोधा | ayushyaman Bharat hospital list
Aapale Sarkar portal login for birth Certificate
  1. Login केल्यानंतर प्रथम सेवा विभाग निवडा. सेवा विभागात जाऊन जन्म दाखला हा पर्याय निवडा.
  2. अर्ज फॉर्म भरा: अर्ज फॉर्म भरून आवश्यक माहिती जमा करा.
  3. कागदपत्रे अपलोड करा: आधार कार्ड, हॉस्पिटलचे दाखले इत्यादी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
Select जन्म नोंद दाखला
  1. अर्ज प्रक्रियेची 100 रुपये ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे. फी भरण्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग वापरू शकता
  2. अर्ज सबमिट करा: अर्ज जमा करा आणि नोंदणी क्रमांक जपून ठेवा.

जर तुमचा अर्ज योग्य असेल, तर तो १५ दिवसांच्या आत संबंधित नगरपालिकेच्या ग्रामपंचायतीकडे जमा केला जाईल. काही दिवसांनंतर तुमचे जन्म प्रमाणपत्र तयार होईल आणि तुम्ही ते मिळवू शकता.

ऑफलाइन पद्धत

तुम्हाला जन्म प्रमाणपत्र ऑफलाइन बनवायचे असल्यास, आवश्यक कागदपत्रांची यादी खाली दिली आहे:

  • मुलाच्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज पुस्तक
  • पालकांचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, किंवा पत्त्याचा पुरावा
  • दहावीचे प्रमाणपत्र (असल्यास)
  • अर्ज आणि प्रतिज्ञापत्र

जन्म-मृत्यू नोंदणी कायदा

1 ऑक्टोबरपासून जन्म-मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा 2023 लागू होणार आहे. यामुळे जन्म प्रमाणपत्र हे एकमेव पुरावा म्हणून वापरले जाईल. काही महत्वाच्या ठिकाणी जन्म दाखला उपयोगी पडेल.

  • शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदार यादी
  • आधार क्रमांक नोंदणी
  • विवाह नोंदणी
  • सरकारी नोकरी

आपले सरकार पोर्टलवर अर्ज केला की, पुढच्या 5 दिवसांत तुम्हाला जन्म प्रमाणपत्र मिळायला हवे. अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमच्या गावाच्या ग्रामसेवकाला अर्ज क्रमांक पाठवून ठेवा, ज्यामुळे अर्ज मंजूर झाल्यावर ठरावीक कालमर्यादेत तुम्हाला जन्म प्रमाणपत्र मिळेल.

हे वाचा-  लाडकी बहीण योजनेच्या अपार यशानंतर, राज्य सरकार लाडकी गृहिणी योजना आणणार.

ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने जन्म प्रमाणपत्र काढणे आता सोपे झाले आहे. आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आणि दिलेल्या प्रक्रियेचे पालन करा. योग्य कागदपत्रे आणि प्रक्रियेचे पालन केल्यास तुम्हाला लवकरच जन्म प्रमाणपत्र मिळू शकते.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment