व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

गाडी नंबर वरून मालकाचे नाव तपासा |check vehicle number using mobile number

गाडीच्या नंबर वरुन मालकाचे नाव माहित करुन घेण्यासाठी आपण येथे काही पद्धतींचा वापर करणार आहोत. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तिचा तुम्ही वापर करु शकता. चला तर आपण आता गाडीच्या मालकाचे नाव आणि पत्ता कसा पहायचा हे पाहूया. 

1. अँपचा वापर करुन मालकाचे नाव आणि पत्ता कसा पहायचा?

M parivahan ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा 👇

तुम्हाला पहिल्यांदा वरील लिंक वर क्लिक करून प्ले स्टोअर वर जाऊन mParivahan हे अँप डाउनलोड करावे लागेल. अँप डाउनलोड केल्यानंतर ते Install करा व नंतर मग ते ओपन करा. अँप ओपन केल्यानंतर तुम्हाला समोर डॅशबोर्ड दिसेल. तेथे RC या Option वर क्लिक करुन गाडीचा नंबर टाका.

तुम्हाला ज्या गाडीच्या मालकाचे नाव आणि पत्ता माहित करुन घ्यायचा आहे त्या गाडीचा नंबर येथे टाकायचा आहे. गाडी नंबर टाकल्यानंतर सर्च बार वर क्लिक करा. तुम्हाला त्या गाडी मालकाचे नाव आणि पत्ता हि सर्व माहिती समोर दिसेल. 

2. मेसेजचा वापर करुन मालकाचे नाव आणि पत्ता कसा पहायचा?

तुम्हाला जर फोनमध्ये अँप install न करता एखाद्या गाडीच्या नंबर वरुन मालकाचे नाव माहित करुन घ्यायचे असेल तर तुम्ही मेसेजचा वापर करुन हे काम करु शकता. जर तुमच्या फोनमध्ये इंटरनेटची सुविधा नसेल तर हा पर्याय तुमच्यासाठी फार फायदेशीर आहे. हि सुविधा तुम्ही २४ तास वापरु शकता. 

हे वाचा-  किसान मानधन योजनेसाठी अर्ज करा | apply for kisan mandhan yojana

मेसेजच्या माध्यमातून मालकाचे नाव आणि पत्ता जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या फोन मधील मेसेज अँप ओपन करावे लागेल. त्यानंतर मेसेज बॉक्समध्ये कॅपिटल लेटरमध्ये VAHAN असे टाईप करा. मग स्पेस देऊन गाडीचा नंबर टाका. हा मेसेज 7738299899 या नंबर वर पाठवा. (उदा: VAHAN <space> गाडीचा नंबर) 

मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला ID Vahan कडून एक मेसेज येईल. ज्यामध्ये गाडी नंबर असलेल्या मालकाचे नाव आणि पत्ता तुम्हाला पहायला मिळेल. 

3. वेबसाईटचा वापर करुन मालकाचे नाव आणि पत्ता कसा पहायचा?

वेबसाईटचा वापर करुन तुम्ही केवळ २ मिनिटात गाडीच्या मालका विषयी संपूर्ण माहिती घेऊ शकता. वेबसाईटच्या माध्यमातून मालकाची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर vahaninfos.com वर जावं लागेल. तेथे खाली गेल्यानंतर तुम्हाला गाडीचा नंबर टाकून कॅपचा भरावा लागेल. 

कॅपचा भरुन झाल्यावर Submit बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला गाडीच्या नंबर वरुन सगळी माहिती मिळेल. जसे कि ती गाडी कुणाच्या नावावर रजिस्टर आहे. गाडी केव्हा घेतली गेली होती या प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. 

अपघात झाल्यानंतर किंवा जुनी गाडी विकत घेताना गाडी विषयी संपूर्ण माहिती घेण्यासाठी तुम्ही वरील तीन मार्गांपैकी कोणता हि एक मार्ग वापरु शकता. गाडीच्या नंबर वरुन मालकाचे नाव आणि पत्ता पाहण्यासाठी तुम्हाला जो मार्ग सोपा वाटेल तुम्ही तो निवडू शकता.

हे वाचा-  सरकारची मोठी घोषणा; मागेल त्याला मिळणार मोफत सौर ऊर्जा पंप

अशाच प्रकारची तंत्रज्ञानातील अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment