व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 बिनव्याजी कर्ज👈  20000 तत्काळ कर्ज

एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती कर्ज आहे, हे सिबिल रिपोर्टच्या साह्याने कसे पाहायचे? | How much loan taken get on cibil report.

नमस्कार, आजच्या लेखामध्ये आपण सिबिल रिपोर्टच्या मदतीने एखाद्याच्या नावावर किती कर्ज आहे हे कसे पाहायचे? याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया.

देशातील कोणत्याही व्यक्तीचा क्रेडिट इतिहास जाणून घेण्यासाठी सिबिल रिपोर्ट खूप महत्त्वाचा दस्तऐवज आहे. या सिबिल रिपोर्ट मध्ये एखाद्या व्यक्तीच्या क्रेडिट स्कोर बरोबरच त्याने घेतलेल्या कर्जाची माहिती, थकबाकी, परतफेडीचा इतिहास आणि त्याचे वित्तीय वर्तन याबाबतची सविस्तर माहिती असते. या माहितीच्या आधारावरच सदर व्यक्तीला कर्ज द्यायचे की नाही हे बँका किंवा वित्तीय संस्था ठरवत असतात. सिबिल रिपोर्ट हा कोणत्याही व्यक्तीच्या आर्थिक वर्तनाचा आरसा आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती कर्ज आहेत हे पाहायचे असेल, तर तुम्ही सिबिल रिपोर्ट मिळवून सदर व्यक्तीच्या नावावर किती कर्ज आहे हे पाहू शकता.

सिबिल रिपोर्ट विषयी थोडक्यात..

सिबिल रिपोर्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण क्रेडिट इतिहासाचा सारांश होय. हा रिपोर्ट विविध बँका व वित्तीय संस्थांकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे तयार केलेला असतो. सिबिल रिपोर्ट मध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो? ते आपण खाली पाहूया:

  • सिबिल रिपोर्ट मध्ये क्रेडिट स्कोर चा समावेश असतो. हा क्रेडिट स्कोर 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. 750 किंवा त्यापेक्षा अधिक क्रेडिट स्कोर हा कर्ज घेण्यासाठी चांगला मानला जातो.
  • एखाद्याने घेतलेली सर्व कर्जे, त्या कर्जाची रक्कम आणि परतफेड चा इतिहास या सर्वाचा तपशील सिबिल रिपोर्ट मध्ये असतो.
  • सिबिल रिपोर्ट मध्ये कर्जाची थकबाकी किंवा डिफॉल्ट्स नमूद केलेली असतात.
  • एखाद्या व्यक्तीच्या क्रेडिट कार्ड्स वरील थकबाकी आणि खर्चाचा इतिहास रिपोर्टवर नमूद केलेला असतो.
  • एखाद्या व्यक्तीने वेळेवर कर्जाचा EMI वेळेवर भरला आहे का? किंवा उशिराने भरला आहे का? ही सिबिल रिपोर्टवर स्पष्ट केले जाते.
हे वाचा-  ऑनलाइन पॅन कार्ड कसे काढावे | pan card apply online in marathi

सिबिल रिपोर्ट पाहण्याचे फायदे

  • बँका किंवा वित्तीय संस्था यांना कर्ज कोणाला द्यायचे याबाबतचा निर्णय घेण्यास मदत होते.
  • आर्थिक जबाबदारीचे मूल्यांकन करता येते.
  • फसवणूक किंवा चुकीचे क्रेडिट व्यवहार शोधता येतात.
  • कर्जाबाबतची संपूर्ण माहिती अचूकपणे समजू शकते.

सिबिल रिपोर्ट संबंधित काही महत्त्वाचे..

  • CIBIL Report फक्त संबंधित व्यक्ती किंवा अधिकृत वित्तीय संस्थाच पाहू शकतात.
  • दुसऱ्या व्यक्तीचा सिबिल रिपोर्ट त्याच्या संमतीशिवाय पाहणे बेकायदेशीर आहे.
  • सिबिल रिपोर्ट मिळवण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे.
  • एखादी व्यक्ती वर्षातून फक्त एकदाच मोफत सिबिल रिपोर्ट मिळवू शकतो किंवा पाहू शकतो. वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा सिबिल स्कोर पाहायचा असेल तर तुम्हाला पैसे भरावे लागतात.
  • सिबिल रिपोर्ट साठी चुकीची माहिती भरल्यास सिबिल रिपोर्ट मिळण्यास अडचण येऊ शकते.

सिबिल रिपोर्ट कसा पाहायचा?

जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती कर्ज आहे हे पाहायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला सदर व्यक्तीचा CIBIL Report मिळवावा लागेल. CIBIL Report कसा मिळवायचा याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • CIBIL Report अहवाल मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सिबिलच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करावे लागेल. 👉🏽  https://www.cibil.com/
  • त्यानंतर तुम्हाला Get Your CIBIL Score किंवा Get Your Credit Report या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्ही ज्या व्यक्तीचे कर्ज पाहणार आहात त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती भरा. त्यामध्ये त्या व्यक्तीचे पूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, पॅन कार्ड नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इ.
  • वरील माहितीच्या आधारावर सदर व्यक्तीचे एक अकाउंट तयार केले जाईल. त्यानंतर त्या अकाउंटचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला मिळेल. अकाउंट ऍक्टिव्ह करण्यासाठी तुमच्या ईमेल वरती मेल पाठवला जाईल. त्या मेलमध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुमचे अकाउंट तुम्हाला सत्यापित करावे लागेल.
  • त्यानंतर परत मिळालेल्या लॉगिन आयडिया आणि पासवर्ड चा वापर करून सिबिलच्या वेबसाईट वरती लॉगिन करून घ्या.
  • आता तुम्हाला काही सबस्क्रिप्शन ची माहिती देण्यात येईल त्यामध्ये तुम्हाला वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा तुमचा सिबिल रिपोर्ट मिळवायचा असेल तर तुम्ही सबस्क्रीप्शन घेऊ शकता. परंतु जर तुम्ही रिपोर्ट फक्त वर्षातून एकदाच पाहणार असाल तर तुम्ही फ्री मध्ये हे काम करू शकता. त्यासाठी सबस्क्रिप्शन चा पर्याय तुम्ही टाळू शकता.
  • आता सदर व्यक्तीच्या पॅन कार्ड नंबर सह त्या व्यक्तीची अतिरिक्त माहिती भरा. त्याचबरोबर सदर व्यक्तीच्या पॅन कार्ड ची माहिती बरोबर टाकली आहे का? हे सुनिश्चित करा.
  • त्यानंतर तुम्हाला सदर व्यक्तीच्या लोन व क्रेडिट संबंधित काही प्रश्न विचारले जातील ज्याच्या आधारावर सदर व्यक्तीच्या सिबिल रिपोर्टची पूर्तता केली जाईल. त्यामुळे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अचूक पद्धतीने द्या.
  • आता तुम्हाला सदर व्यक्तीचा क्रेडिट रिपोर्ट तयार होताना दिसेल. इथे तुम्ही सीबिल रिपोर्ट पाहू शकता त्याचबरोबर डाऊनलोड करून घेऊ शकता.
हे वाचा-  शेतकऱ्यांना सरकारी योजना व सुविधांचा तत्काळ लाभ घेण्यासाठी, असे बनवा शेतकरी डिजिटल ओळखपत्र..| apply online for farmer id card

अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती कर्ज आहे हे पाहण्यासाठी सिबिल रिपोर्ट अशा पद्धतीने पाहू शकता किंवा डाऊनलोड करून घेऊ शकता.

सिबिल रिपोर्टच्या आधारे एखादे व्यक्तीच्या नावावर किती कर्ज आहे हे कसे पाहायचे?

CIBIL Report वरून एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती कर्ज आहे हे आपणाला कसे पाहता येते? याबाबतची संपूर्ण माहिती खाली पाहूया:

1. कर्जाचा एकूण तपशील

CIBIL Report च्या Credit Accounts विभागामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीने घेतलेली सर्व कर्जे पाहू शकता. त्यामध्ये खालील माहिती असते.

  • कर्जाचा प्रकार
  • कर्ज देणारी संस्था
  • कर्जाची रक्कम यामध्ये सुरुवातीला घेतलेले रक्कम आणि उर्वरित थकबाकीचा समावेश असतो.
  • कर्जाची स्थिती
  • मासिक EMI रक्कम

2. थकबाकी आणि विलंबित पेमेंट (overdue and late payments)

एखाद्या व्यक्तीने कधी आणि किती वेळा कर्जाच्या रक्कमेचा EMI भरला नाही याचा तपशील येथे तुम्ही पाहू शकाल. त्याचबरोबर कोणतेही कर्ज डिफॉल्ट मध्ये गेले असेल ते सुद्धा येथे तुम्ही पाहू शकता.

3. नवीन कर्जाचा अर्ज (Recent Loan Applications)

एखाद्या व्यक्तीने नवीन कर्जासाठी किंवा डेबिट कार्ड साठी अर्ज केला असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. कर्जासाठी अनेक अर्ज केल्यास क्रेडिट स्कोर कमी होऊ शकतो.

4. खात्यांची स्थिती (Account Status)

Settled, Closed, Written Off किंवा Active यासारखे टॅग्ज कर्जाच्या स्थितीबद्दल माहिती देतात. ते तुम्ही खात्याची स्थिती विभागांमध्ये पाहू शकता. कर्जाची स्थिती Written Off किंवा Settled असल्यास त्या व्यक्तीच्या क्रेडिट इतिहासावर नकारात्मक परिणाम होतो.

हे वाचा-  Union Bank Personal Loan: 20 मिनिटांत 50 हजार रुपयांपासून 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवा.

अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती कर्ज आहे? सिबिल रिपोर्टच्या साह्याने पाहू शकता.

सदर लेखांमध्ये आपण सिबिल रिपोर्टच्या साह्याने एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती कर्ज आहे हे कसे पाहायचे? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. या माहितीच्या आधारावर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेता येतो. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडलेला असेल. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page