नमस्कार मित्रांनो, भारत सरकारने डिजिटल इंडिया उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पुढाकार घेतलेले आहेत. डिजिटल इंडिया उपक्रमाचाच एक भाग म्हणून आधार कार्ड आणि बँक खाते लिंक प्रक्रिया हे देखील एक महत्त्वाचे आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) एक नवीन ऑनलाईन पोर्टल लॉन्च केले आहे. या पोर्टलची खासियत म्हणजे ज्या लोकांना त्यांचे बँक खाते घरबसल्या आधार कार्डची लिंक करायचे आहे ते या पोर्टलवरून करू शकतात. NPCI पोर्टलवरून घरबसल्या बँक खाते आधार कार्ड ची लिंक कसे करायचे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर मग पाहूया बँक खाते आधार कार्डची NPCI पोर्टलवरून कसे लिंक करायचे?
NPCI पोर्टलवरून आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे का गरजेचे आहे?
आधार कार्ड देशातील एक प्रमुख ओळखीच्या पुराव्याचा दस्तावेज आहे. आधार कार्ड चा उपयोग सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी त्याचबरोबर आर्थिक व्यवहार सुरक्षित करण्यासाठी केला जातो. बँक खाते आधार कार्ड ची लिंक केल्यामुळे तुमची सबसिडी, पेन्शन आणि इतर सरकारी योजनांचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात. त्याचबरोबर ही प्रक्रिया तुमचे बँकिंग व्यवहार देखील सुरक्षित करते आणि कोणत्याही फसवणुकीपासून संरक्षण करण्यास मदत करते. NPCI ने सुरु केलेले नवीन पोर्टल ही नागरिकांसाठी एक डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत टाकलेले एक मोठे पाऊल आहे. या पोर्टलच्या मदतीने तुम्हाला बँकेमध्ये न जाता तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करू शकता.
तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का हे तपासण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
NPCI पोर्टलची वैशिष्ट्ये
- या पोर्टल द्वारे तुम्ही काही मिनिटांमध्ये घरबसल्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला आता लांब रांगेमध्ये उभे राहण्याची गरज नाही.
- हे पोर्टल कधीही, कोणत्याही दिवशी लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे.
- हे पोर्टल NPCI द्वारे चालवले जाते, जे देशातील डिजिटल पेमेंटचे मुख्य केंद्र आहे.
- हे पोर्टल देशातील अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे देशातील विविध प्रदेशातील लोकांना ते सहजपणे वापरता येते.
- आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यासाठी तुम्हाला फक्त आधाराने बँक तपशील प्रदान करणे आवश्यक आहे. सिस्टीम आपोआप तुमची माहिती सत्यापित करेल.
आधार कार्डला बँक खाते लिंक करण्याचे फायदे
आधार कार्ड बँक खाते लिंक करण्याचे अनेक फायदे आहेत जे केवळ तुमची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करत नाहीत तर तुमचे दैनंदिन जीवन देखील सोपे बनवतात. हे फायदे कोणते आहेत? ते खाली पाहूया:
- आधार कार्ड ला बँक खाते लिंक केल्यामुळे सरकारी सबसिडी आणि योजनांचे फायदे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात.
- आर्थिक फसवणूक होत नाही.
- पेन्शन, शिष्यवृत्ती आणि इतर सरकारी योजना सारख्या अनेक सेवा आणि फायदे मिळवणे सोपे होते.
- आधार-बँक लिंकिंग केल्यामुळे UPI आणि इतर डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म वापरणे सोपे आणि सुरक्षित आहे.
तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का हे तपासण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
NPCI पोर्टलवरून आधार कार्डशी बँक खाते लिंक कसे करायचे?
NPCI पोर्टलवरून आधार कार्डची बँक खाते लिंक कसे करायचे? याबाबत स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:
- सर्वप्रथम तुम्हाला NPCI च्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल. 👉🏽https://www.npci.org.in/
- पोर्टल वर गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला होम पेजवर ग्राहक पर्याय निवडून त्यावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर भारत आधार सीडींग सक्षमकर्ता या पर्यायावर क्लिक करा.
- आधार सीडिंग वर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
- तुमची सर्व माहिती भरल्यानंतर पुढे जावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, OTP प्रविष्ट करा आणि सबमिट करा वर क्लिक करा.
- सबमिट केल्यानंतर तुमची एप्लीकेशन प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर पुढील 24 ते 48 कामाच्या तासांमध्ये तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होईल.
NPCI पोर्टलवरून आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करताना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी
- तुम्हाला तुमचा अचूक आधार आणि बँक खात्याचा तपशील प्रविष्ट केल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
- आधार-बँक खाते लिंकिंगचा दावा करणाऱ्या कोणत्याही संशोधपत ई-मेल किंवा एसएमएस क्लिक करू नका.
- फक्त NPCI चे अधिकृत पोर्टल वापरा.
लिंक प्रक्रियेत समस्या आल्यास काय करावे?
- तुमच्या बँकेच्या कस्टमर केअर कडून मदत मिळवा.
- NPCI च्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करा.
- जर तुम्हाला ऑनलाईन प्रक्रियेत समस्या येत असतील तर, तुम्ही जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊन मदत घेऊ शकता.
सदर लेखांमध्ये आपण NPCI पोर्टलवरून आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसे करायचे? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी घरबसल्या लिंक करून सरकारी योजनांचा लाभ घ्या. धन्यवाद!