व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

स्वतःची दूध सुरू करण्यासाठी आता 13 लाखांचे कर्ज ! | कर्जावरही 4.50 लाखांचे अनुदान, अर्ज कसा करायचा ?

कोरोना विषाणूमुळे देशातील शेतकऱ्यांवर आलेली संकटे कमी करण्यासाठी आणि त्यांना मदत मिळावी यासाठी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नाबार्ड योजनेअंतर्गत नवी घोषणा केली आहे. देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी 30 हजार कोटींच्या अतिरिक्त निधीची घोषणा केली आहे. दुग्धव्यवसाय योजनेंतर्गत हा पैसा सहकारी बँकांच्या माध्यमातून सरकारला दिला जाणार असून, देशातील 3 कोटी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे..

पशुसंवर्धनाबरोबरच दुग्धव्यवसाय योग्य पद्धतीने चालावा यासाठी या दुग्धव्यवसाय योजनेंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगारांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला जाणार असून कर्जही दिले जाणार आहे. दुग्ध व्यवसाय योजनेंतर्गत, दुग्ध उत्पादनासाठी डेअरी फार्मची स्थापना करून पशुपालकांना प्रोत्साहन दिलं जात आहे. देशातील कोणत्याही शेतकऱ्याला नाबार्डच्या या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

नाबार्ड योजनेचा लाभ कोणाला मिळणार ? 

नाबार्ड योजनेचा लाभ : शेतकरी, उद्योजक, स्वयंसेवी संस्था, संघटित गट, छोटं – मोठ्या कंपन्या, असंघटित क्षेत्र इत्यादींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

दुग्धव्यवसाय योजनेंतर्गत कर्ज देणाऱ्या संस्था..

डेअरी फार्मिंग योजनेंतर्गत, हे कर्ज फक्त काही निवडक बँकांद्वारे प्रदान केले जाईल ज्यामध्ये व्यावसायिक बँका, प्रादेशिक बँका, राज्य सहकारी बँका, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका आणि नाबार्डकडून पुनर्वित्तासाठी पात्र असलेल्या इतर संस्थांचा समावेश आहे..

हे वाचा-  कोर्टाने SBI बँकेला दिला इशारा, आता कमी CIBIL score असलेल्यांनाही कर्ज मिळणार.

3.5 लाख रुपयांचा ट्रॅक्टर फक्त 35 हजार रुपये मध्ये मिळवा. अधिक माहितीसाठी खालील बटनवर क्लिक करा.

नाबार्ड पशुसंवर्धन डेअरी योजनेअंतर्गत किती मिळेल अनुदान..

देशात दुग्ध उत्पादन युनिट सुरू करण्यासाठी डेअरी उद्योजकता विकास योजनेंतर्गत सबसिडी देखील दिली जाते. तुम्ही नाबार्ड डेअरी योजनेद्वारे दूध उत्पादनासाठी प्रक्रिया उपकरणे खरेदी करू शकता.

या योजनेद्वारे, तुम्ही 13 लाख रुपयांपर्यंतच्या दुधाच्या उत्पादनासाठी उपकरणे खरेदी केल्यास, तुम्हाला त्यावर 25% अनुदान दिले जाते, म्हणजेच 3.30 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळतं.

तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या सर्व अर्जदारांना योजनेअंतर्गत 4.50 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते.

गोठा बांधण्यासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळेल. अधिक माहितीसाठी खालील बटनवर क्लिक करा.

बँकेकडून किती रक्कम मंजूर होते..

या योजनेत कर्जाची रक्कम बँकेकडून मंजूर केली जाईल आणि 25% रक्कम लाभार्थ्याने स्वत: द्यावी लागेल. या योजनेंतर्गत व्यवसाय सुरू असलेले सर्वजण थेट बँकेशी संपर्क साधू शकतात. योजनेंतर्गत पाच गायींसह डेअरी फार्म सुरू करण्यासाठी, लाभार्थी नागरिकाला खर्चाचे प्रमाणपत्र द्यावे लागेल, यासाठी सरकार 50% पर्यंत अनुदान देते.

नाबार्ड डेअरी कर्जासाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा ?

अर्ज करण्‍यासाठी, सर्वप्रथम तुम्‍हाला कोणता डेअरी फार्म उघडायचा आहे हे ठरवायचे आहे. जर तुम्‍हाला नाबार्ड योजनेंतर्गत डेअरी फार्म उघडायचे असेल, तर तुम्‍हाला तुमच्या परिसरातील नाबार्ड कार्यालयात जावे लागेल.

हे वाचा-  ऑनलाइन पॅन कार्ड साठी अर्ज करा | apply for pan card.

याबाबत तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊनही माहिती मिळवू शकता. बँकेत गेल्यावर तुम्हाला सबसिडी फॉर्म भरून त्यात अर्ज करावा लागेल. जर कर्जाची रक्कम वाढली असेल, तर त्या व्यक्तीकडे त्याचा प्रकल्प अहवाल नाबार्डला सादर करावा लागणार आहे.

आवश्यक कागदपत्रे :-

आधार कार्ड
पॅन कार्ड
जात प्रमाणपत्र
बँक खात्याचा कॅन्सल चेक
बँकेचे ना – हरकत प्रमाणपत्र
Dairy Project रिपोर्ट

डेअरी उद्योजकता विकास योजना हेल्पलाइन क्रमांक :-
हेल्पलाइन क्रमांक-022-26539895 /96/99
ईमेल आयडी- [email protected]

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment