व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

माय रेशन 2.0 ॲपवरून रेशन कार्ड मोबाईल नंबरशी असे करा घरबसल्या लिंक..जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

नमस्कार, सदर लेखामध्ये आपण रेशन कार्डला किंवा शिधापत्रिकेला मोबाईल नंबर मेरा राशन 2.0 ॲपवरून लिंक कसा करायचा? याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया.

रेशन कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे खूप महत्त्वाचे आहे कारण यामुळे तुम्हाला सार्वजनिक वितरण प्रणाली द्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांची लाभ वेळेवर घेता येतात. त्याबाबतची सर्व आवश्यक माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळू शकते.

रेशन कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्याचे फायदे

रेशन कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करण्याचे फायदे काय आहेत? ती आपण खाली पाहूया:

  • अन्नसुरक्षा योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना यासारख्या सरकारी योजनांचा लाभ सहज मिळू शकतो.
  • ओटीपी आधारित सेवा असल्यामुळे डिजिटल व्यवहार करणे सोपे जाते.
  • सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी राशन व्यवस्थापन करणे अधिक सोपे जाते.
  • ई-रेशन कार्ड, अन्नधान्य वितरण संबंधित संपूर्ण माहिती एसएमएसद्वारे मिळते.

मेरा रेशन ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

रेशन कार्ड मोबाईल नंबर ला लिंक केल्यामुळे वरील सर्व फायदे तुम्हाला मिळू शकतात. म्हणून तुम्हाला वरील सर्व फायदे घ्यायचे असतील तर रेशन कार्ड ला मोबाईल लिंक करणे खूप गरजेचे आहे.

रेशन कार्ड मोबाईल नंबर ला लिंक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

रेशन कार्ड मोबाईल नंबर ला लिंक करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कागदपत्राची पूर्तता करावी लागत नाही परंतु, सदर कागदपत्रावरील महत्त्वाचे क्रमांक तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. कोणकोणत्या कागदपत्रावरील महत्त्वाचे क्रमांक तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे ते आपण खाली पाहूया:

  • रेशन कार्ड/शिधापत्रिका क्रमांक
  • आधार कार्ड क्रमांक
  • चालू मोबाईल नंबर
  • आधार कार्डला लिंक केलेला मोबाईल नंबर
  • माय रेशन 2.0 ॲप मध्ये लॉगिन करण्यासाठी आधार ओटीपी
हे वाचा 👉  Free Scooter Scheme: तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर तुम्हाला मिळणार फ्री स्कूटर. पहा काय आहे योजना.

रेशन कार्ड मोबाईल नंबर ला माय रेशन 2.0 ॲप वरून लिंक कसे करायचे?

घरबसल्या रेशन कार्ड मोबाईल नंबर ला माय रेशन 2.0 वरून लिंक कसे करायचे? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

मेरा रेशन ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

  • रेशन कार्ड मोबाईल नंबर ला लिंक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये Google Play Store वरून माय रेशन 2.0 ॲप डाउनलोड करावे लागेल.👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.onenationonecard
  • माय रेशन 2.0 ॲप डाऊनलोड केल्यानंतर हे ॲप ओपन करून लॉगिन करण्यासाठी आधार क्रमांक प्रविष्ट करा. आणि ओटीपी पाठवा वर क्लिक करा.
  • तुम्हाला तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबर वर OTP प्राप्त होईल. OTP आणि इतर सर्व आवश्यक माहिती प्रविष्ट करून माय रेशन 2.0 ॲप मध्ये लॉगिन करा.
  • त्यानंतर रेशन कार्डला मोबाईल नंबर लिंक आणि अपडेट करण्यासाठी पेंडिंग मोबाईल अपडेट पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर सर्व सदस्यांच्या नावासमोरील View पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला आधार कार्ड ला लिंक करण्यासाठी जो मोबाईल नंबर टाकायचा आहे तो इंटर करा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर OTP सत्यपित करा.
  • एकदा OTP सत्यापित झाल्यानंतर मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी सबमिट पर्यावर क्लिक करा.
  • सबमिट पर्यावर क्लिक करताच, तुमचा मोबाईल नंबर रेशन कार्डशी लिंक करण्याची प्रोसेस यशस्वीरित्या पूर्ण होईल.
हे वाचा 👉  Farm Loan: 1 एकर जमिनीवर किती कर्ज मिळते? मर्यादा आणि कर्ज मिळवण्याची पद्धत पहा.

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या माय रेशन 2.0 ॲपवरून रेशन कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करू शकता.

सदर लेखामध्ये आपण रेशन कार्ड मोबाईल नंबरची माय रेशन 2.0 ॲपवरून लिंक कसे करायचे? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. वर दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही तुमचे रेशन कार्ड मोबाईल नंबरची अद्याप लिंक किंवा अपडेट केलेले नसेल तर शक्यता लवकर माय रेशन 2.0 वरून लिंक करून सरकारच्या शिधापत्रिका किंवा रेशन कार्ड संबंधित सर्व योजना आणि सुविधांचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page