व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

घनदाट जंगलामध्ये साखळीने विदेशी महिलेला घातले होते बांधून; गुराख्याला येत होता आवाज.

विदेशी महिला घनदाट जंगलात सापडली

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सावंतवाडीच्या रोणपाल-सोनुर्ली परिसरातील घनदाट जंगलात एका विदेशी महिलेला साखळदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. या महिलेला गेले दोन-तीन दिवस अन्न आणि पाण्याशिवाय ठेवण्यात आले होते. ही घटना एका गुराख्याच्या जागरूकतेमुळे उघडकीस आली. तिची प्रकृती गंभीर असून तिला येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुराख्याच्या सतर्कतेमुळे उघड झाली घटना

शनिवारी सकाळी सोनुर्ली रोणापाल येथील जंगलात मोठ्या आवाजाने किचळण्याचा आवाज येत होता. गुराख्याने हा आवाज ऐकून त्या दिशेने जात शोध घेतला असता त्याला झाडाला साखळदंडाने बांधलेली महिला आढळली. हा प्रकार बघून तो घाबरून गावात येऊन ग्रामस्थांना आणि पोलिसांना याची माहिती दिली. सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन साखळदंड कापून महिलेला मुक्त केले.

महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल

ही महिला गेले दोन-तीन दिवस मुसळधार पावसात भिजत होती, त्यामुळे तिच्या हातापायांना सूज आली होती. ती बोलण्याचा प्रयत्न करत होती पण आवाज येत नव्हता. तिच्याकडे काही कागदपत्र सापडली, त्यात तिचं नाव ललिता कायी कुमार एस असून ती तामिळनाडूमधील रहिवासी असल्याचं समजलं. ती मूळची अमेरिकन नागरिक असल्याचं स्पष्ट झालं.

हे वाचा-  आयुष्यमान भारत योजनेमधील दवाखान्यांची यादी अशी शोधा | ayushyaman Bharat hospital list

घटनेचे कारण आणि संशयित

महिलेला उजव्या पायाला साखळदंड लावून झाडाच्या बुंध्याला बांधण्यात आलं होतं. तिचा पाय सूजलेला होता पण बाकीच्या अंगावर कुठेही जखम आढळली नाही. ती सुधारत असली तरी अद्याप बोलू शकत नाही. पोलिसांनी तिच्या पतीवरच संशय व्यक्त केला आहे. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी महिलेला रुग्णालयात आणून तिचा जबाब नोंदविण्याचा प्रयत्न केला आहे.

मडुरा रेल्वे स्थानक आणि शक्यता

घटनास्थळावरून मडुरा रेल्वे स्थानक दहा ते पंधरा मिनिटावर आहे. त्यामुळे कदाचित अपराध करणाऱ्या व्यक्तिने मडुरा स्थानकावर उतरून नंतर तिला रोणापालच्या जंगलात नेले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही.

सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडमध्ये.

सावंतवाडीतील या अकल्पित घटनेने सर्वत्र खळबळ माजवली आहे. महिलेच्या पतीवर संशय असल्याने पोलिस तपास करत आहेत. या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिस आणि प्रशासन यांनी या प्रकरणात तात्काळ आणि कठोर पावले उचलली पाहिजेत.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment