एक व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात फिरत आहे, ज्यामध्ये दोन दरोडेखोर एका दुकानाची तोडफोड करताना दिसत आहेत आणि लष्कराचे जवान त्यांना पकडतात. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे ही घटना भारतातील आहे आणि भारतीय लष्कराने दरोडेखोरांना पकडले आहे. पण या दाव्यांमागील सत्य काय आहे? चला तपासून पाहूया.
हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला गेला आहे. एका युजरने हा व्हिडिओ शेअर करताना दावा केला भारतीय लष्कराने दिवसाढवळ्या चोरी होण्यापासून रोखली. जेव्हा या व्हिडिओचा तपास केला गेला तेव्हा असे आढळून आले ही घटना भारतातील नसून बांगलादेशातील आहे.
पहा व्हिडिओ
क्यु ना करे हम अपनी इंडियन आर्मी पर हमें गर्व है !!
— Khushbu_journo (@Khushi75758998) August 24, 2024
यहां दो लोग चोरी करने के मकसद से आए और तोड़फोड़ करने लगे !!
लेकिन तभी इंडियन आर्मी वहां से गुजर रही थी और उसके बाद जो हुआ आप वीडियो में देखिए !! pic.twitter.com/b0Cf62j5lL
Faceboou आणि YouTube वर सापडलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसते की, फरीदपूरमध्ये काही दरोडेखोर धार धार शस्त्रांच्या साहाय्याने दुकानांची तोडफोड करत आहेत आणि बांगलादेशी लष्कराच्या जवानांनी त्यांना पकडले आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारे जवान भारतीय नव्हेत तर बांगलादेशी आहेत.
बांगलादेशातील वरिष्ठ फॅक्ट चेकर तौसिफ अकबर यांनी देखील पुष्टी केली आहे की व्हिडिओ बांगलादेशातीलच आहे आणि तो दाव्यासह भारतात शेअर केला जात आहे.
निष्कर्ष असा की, हा व्हिडिओ बांगलादेशमधील आहे आणि भारतीय लष्कराशी याचा काहीही संबंध नाही. परंतु या जवानाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.. जवानांनी तत्काळ गाडी थांबवून, दरोडेखोरांना ताब्यात घेतले.