व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड तयार करण्याबाबत स्टेप बाय स्टेप माहिती. | Golden card step by step info

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आयुष्मान भारत हेल्थ कार्ड तयार कसे करायचे

खालील स्टेप्स फॉलो करून तुम्ही आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड म्हणजेच हेल्थ कार्ड तयार करू शकता.

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला PMJAY च्या ऑफिशियल वेबसाईट ला pmjay.gov.in भेट द्यायची आहे.

आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇

स्टेप 2: त्या नंतर पोर्टल च्या होम पेज वर Am I Eligible? असा ऑप्शन दिसेल. त्यात जाऊन तुम्ही या गोल्डन कार्ड साठी पात्र आहात की नाही ते चेक करू शकता. पण बहुतेक वेळा या पोर्टलचे सर्व्हर बिझी असल्याने चेक करता येत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला दुसऱ्या पर्यायाची माहिती देतो.

स्टेप 3: वेबसाइट उघडल्यावर डाव्या बाजूला वरती Menu चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करायचे आहे. त्या नंतर पोर्टल (Portal) या ऑप्शन मध्ये जायचे आहे. आता यात तुम्हाला Village level SECC data असा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

Ayushman Bharat Card Tayar Kase Karayche Step 3

स्टेप 4: मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व Get OTP या बटन वर क्लिक करायचे आहे. थोड्याच वेळात तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो टाकून नंतर दिलेला कॅपचा टाकायचा आहे व नंतर Log In बटन वर क्लिक करायचे आहे.

Ayushman Bharat Card Tayar Kase Karayche Step 3

स्टेप 5: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला एक इंटरफेस आलेला दिसेल. त्यात विचारलेली माहिती टाकून तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का ते चेक करू शकता.

हे वाचा 👉  ₹39,000 मध्ये दमदार Electric Scooter – 157KM रेंज आणि स्टायलिश फीचर्ससह.

स्टेप 6: या माहितीत तुम्हाला खाली दिलेली सर्व माहिती टाकायची आहे.

  1. राज्य नाव / State Name
  2. जिल्हा नाव /District Name
  3. ब्लॉक प्रक्रर / Block Type (जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर Block ऑपशन निवडा आणि जर शहरी भागातून असला तर ULB ऑपशन निवडा)
  1. तालुका किंवा जवळचे मोठे गाव / Block Name
  2. गावाचे नाव / Village Name

शेवटी Search ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Ayushman Bharat Card Tayar Kase Karayche Step 4

स्टेप 7: मित्रांनो, आता तुमच्या गावातून जे लोक या योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्या नावाची लिस्ट तुम्हाला डाउनलोड करायची आहे त्यासाठी थोडे खाली स्क्रोल करून pdf आयकॉन ऑपशन वर क्लिक करा.

Ayushman Bharat Card Tayar Kase Karayche Step 5

स्टेप 8: आता ती pdf उघडा आणि लिस्ट मध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचे आहे. जर तुमचे नाव असेल तर तुमच्या नावासमोर एक FamilyID दिलेला असेल तो कॉपी करून सेव्ह करा किंवा स्क्रीनशॉट काढा.

Ayushman Bharat Card Tayar Kase Karayche Step 6

स्टेप 9: मित्रांनो, तुम्हाला आता केवायसी करायची आहे. ही केवायसी तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा सुचिबद्ध केलेल्या प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये तुम्हाला केवायसी फॅसिलिटी मिळून होईल. तसेच कोणत्याही जन सुविधा केंद्र किंवा CSC सेन्टर मध्ये तुम्हाला ही सुविधा मिळून जाईल. तिथे तुम्ही 30 रुपये फी भरून केवायसी पूर्ण करू शकता.

मित्रांनो, केवायसी झाल्यानंतर 10 दिवसानंतर तुमचे कार्ड इश्यू केले जाते. व तसे तुम्हाला SMS वर नोटिफिकेशन ही मिळते. व नंतर तुम्ही पोर्टल वरून तुमचे कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता. किंवा CSC सेन्टर भेट देऊ शकता.

हे वाचा 👉  बालिका समृद्धी योजना: मुलींच्या उज्वल भविष्यासाठी केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत उचलले एक महत्त्वपूर्ण पाऊल.. जाणून घ्या योजनेबद्दल सविस्तर.!

(मित्रांनो, वर सांगितल्या प्रमाणे, हे कार्ड बनवण्यासाठी 30 रुपये मोजावे लागत होते. परंतु, आयुष्मान गोल्डन कार्ड आता मोफत बनवले जात आहेत. यामुळे ही गरीब लोकांसाठी खूप दिलासा देणारी बाब आहे. )

आयुष्मान गोल्डन कार्ड काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात?

मित्रांनो, या योजनेसाठी तुम्हाला ओळखपत्र, आधार कार्ड, शिधा पत्रिका, पासपोर्ट आकाराचा फोटो व रेजिस्टर मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे लागतील.

आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यासाठी पात्रता काय आहे?

मित्रांनो, आरोग्य यादीत जर तुमचे नाव असेल तरच तुम्हाला गोल्डन कार्ड दिले जाते. म्हणजे तुम्ही पात्र आहात. तसेच अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. आणि दारिद्र्यरेषेखालील बीपीएल कार्डधारक (पिवळे राशन कार्ड) असणे आवश्यक आहे. याशिवाय कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर पक्के घर नसावे. यासोबतच अर्जदाराचे नाव जनगणना डेटा मध्ये समाविष्ट असले पाहिजे.

आयुष्मान भारत कार्डचे फायदे

मित्रांनो, PMJAY अंतर्गत गोल्डन कार्ड चे फायदे पुढील प्रमाणे आहेत…

  • या योजनेट संपूर्ण कुटुंब समाविष्ट होऊ शकते.
  • हे गोल्डन कार्ड समाजातील गरीब वर्गातील लोकांना आरोग्य विम्याची सुविधा प्रदान करते.
  • लाभार्थी या योजनेचा लाभ संपूर्ण देशभरात कोणत्याही सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये अगदी मोफत घेऊ शकतात.
  • कोविड पेशन्ट देखील हे कार्ड वापरू शकतात.
  • सुचिबद्ध हॉस्पिटल मध्ये लोक कॅशलेस उपचारांचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना रुपये 5 लाख पर्यंतचे कॅशलेस मोफत उपचार घेता येतील.
  • तसेच तुम्हाला तुमचे आयुष्मान गोल्डन कार्ड 15 दिवसात मिळते.
हे वाचा 👉  तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन डिजिटल सहीचा सातबारा डाऊनलोड करा 2024. | Digital satbara 7/12 download.

आयुष्मान भारत योजने अंतर्गत कोण कोणत्या आजारांवर उपचार केले जातील?

मित्रांनो, या योजने अंतर्गत सुमारे 1300 आजारांवर उपचार करण्यात येतात. त्यात किडनीरोग, कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह आदी आजारांवर उपचार केले जाणार आहेत.

आयुष्मान गोल्डन कार्ड बनवल्यानंतर किती रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात?

मित्रांनो, गोल्डन कार्ड बनवल्यानंतर तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात.

आयुष्मान गोल्डन कार्ड हरवले असेल तर काय करावे?

मित्रांनो, तुमचे गोल्डन कार्ड जर कुठे हरवले असेल आणि तुम्हाला त्याचे डुप्लिकेट कार्ड बनवायचे असेल किंवा त्याची प्रिंट काढायची असेल, तर फक्त 15 रुपये देऊन तुम्हाला तुमचे बायोमेट्रिक्स ऑथेंटिकेट करावे लागेल. व त्या नंतरच तुम्हाला नवीन कार्ड दिले जाईल.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण आयुष्मान भारत गोल्डन कार्ड कसे बनवायचे या बद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

1 thought on “आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड तयार करण्याबाबत स्टेप बाय स्टेप माहिती. | Golden card step by step info”

Leave a Comment

You cannot copy content of this page