व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

लाडकी बहिण सारख्याच सरकारच्या 1500 रुपये लाभ देणाऱ्या 4 योजना, कोण आहे पात्र

सध्या लाडकी बहीण योजनेवर चर्चेचा केंद्रबिंदू असला तरी सरकारकडे आणखी काही महत्त्वपूर्ण योजना आहेत ज्या तुम्हाला दरमहा 1500 रुपये मिळवून देऊ शकतात. या योजनांचे प्रमुख उद्दीष्टे समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या काही अटी आहेत आणि त्यासाठी अर्ज प्रक्रियाही सोपी आहे. चला या लेखात जाणून घेऊ या योजनांबद्दल सविस्तर.

1. संजय गांधी निराधार अनुदान योजना

ही योजना प्रामुख्यानं विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त महिलांसाठी उपयुक्त आहे. अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500 रुपये लाभ मिळतो. योजनेचा उद्देश दुर्बल घटकांना अर्थसहाय्य देणे आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज, वयाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, दिव्यांगत्व प्रमाणपत्र ( किमान ४०%), उत्पन्नाचा दाखला इत्यादी.

अर्ज कुठे करावा

तहसील कार्यालय किंवा सेतु केंद्रात अर्ज करावा किंवा अधिकृत वेबसाइटवर अर्ज सादर करावा.

2. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

ही योजना 65 वर्षांवरील निराधार वृद्धांसाठी आहे. या योजनेतही अर्ज मंजूर झाल्यानंतर दरमहा 1500 रुपये मिळतात.

अर्ज कुठे करावा

या योजनेसाठी तहसील कार्यालय, सेतु केंद्रात किंवा ऑनलाइन अर्ज सादर करावा.

आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज, वयाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला ( कमाल वार्षिक उत्पन्न 21,000 रुपये ), आधार कार्ड, रेशनकार्ड आणि निवडणूक ओळखपत्र इत्यादी.

3. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना योजना दारिद्रय रेषेखालील 65 वर्षांवरील वृद्धांसाठी आहे. अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500 रुपये लाभ मिळतो.

हे वाचा-  5 kW हाइब्रिड सोलर सिस्टम: विना बॅटरी रात्रंदिवस चालवा 2 AC, हीटर आणि सर्व लोड

आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज करण्यासाठी वयाचा दाखला, दारिद्रय रेषेचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशनकार्ड इत्यादी कागदपत्रे लागतात

अर्ज कुठे करावा

तहसील कार्यालय किंवा ऑनलाइन अर्ज करू शकता.

4. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

ही योजना 18 ते 79 वयोगटातील 80% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या योजनेतही दरमहा 1500 रुपये लाभ दिला जातो.

आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज, अपंगत्व प्रमाणपत्र, दारिद्रय रेषेचा दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड आणि निवडणूक ओळखपत्र इत्यादी.

अर्ज कुठे करावा

तहसील कार्यालय, सेतु केंद्र किंवा ऑनलाइन अर्ज सादर करू शकता.

सरकारच्या या योजनांमुळे दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य मिळवण्याचा मोठा आधार मिळतो. योग्य कागदपत्रांसह अर्ज करा आणि या योजनांचा लाभ मिळवा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment