व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

मासिक उत्पन्न किती असावे? जेणेकरून तुम्ही गृह कर्ज किंवा होम लोन घेऊन घर खरेदी करू शकता? गृह कर्ज किंवा होम लोन घेण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती..

नमस्कार मित्रांनो, आपला आजचा विषय हा गृह कर्ज किंवा होम लोन संदर्भातील आहे. म्हणजे तुम्ही जर होम लोन घेऊन घर खरेदी करणार असाल तर तुमची महिन्याची कमाई किती आहे? हे खूप महत्त्वाचे आहे. एकंदरीत आपली कमाई होम लोन घेऊन घर खरेदी करण्याएवढी आहे का? नसेल तर आणखी कोणता पर्याय उपलब्ध आहे? म्हणूनच आपण सदर लेखांमध्ये गृह कर्जाचे संपूर्ण व्यवस्थापन कसे करायचे ते पाहूया.

स्वतःचे घर असावे, हा एक प्रत्येकाच्या आयुष्यातील भावनिक किंवा जिव्हाळ्याचा विषय आहे. सध्या स्वतःचे घर असण्याचे स्वप्न होम लोन च्या माध्यमातून पूर्ण करणे खूपच सोपे झाले आहे. पण, बऱ्याच वेळी होम लोन घेतल्यानंतर अनेकदा बरेच लोक अडचणीमध्ये सापडतात, याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या नियमित उत्पन्न मधून गृह कर्जाच्या किंवा होम लोनच्या EMI चे व्यवस्थापन करू शकत नाहीत.

गृह कर्ज किंवा होम लोन कोणी घ्यावे?

अनेकदा असे म्हटले जाते की घर कोणी खरेदी करावे? गृह कर्ज किंवा होम लोन घ्यावे की नाही? त्याचबरोबर काहींचे असे मत असते की भाड्याने राहणे चांगले. हे सर्व इतरांचे मत आहे. पण तुम्ही गृह कर्ज घेऊन घर खरेदी करावे? की, भाड्याने राहावे, हे सर्वस्वी तुमच्या उत्पन्नावर अवलंबून असते. म्हणजेच गृह कर्ज किंवा होम लोन घेणे हे तुमच्या शाश्वत उत्पन्नावर अवलंबून आहे. असे कोणीही गृह कर्ज किंवा होम लोन घेऊ शकते. गृह कर्ज किंवा होम लोन घेण्याचा निर्णय आर्थिक स्थितीवर अवलंबून असतो.

शाश्वत उत्पन्न किती असावे? जेणेकरून गृह कर्ज घेणे योग्य असेल

नोकरी किंवा व्यवसाय असेल तर त्या शाश्वत उत्पन्नावर गृह कर्ज किंवा होम लोन घेऊन घर खरेदी करणे कधीही चांगले आहे. त्याचबरोबर नियमित उत्पन्नाच्या किती रक्कम घरावर खर्च करावी? EMI किती असावा? घर खरेदीसाठी ग्रह कर्ज किंवा होम लोन घेत असाल तर, तुमचे शाश्वत उत्पन्न आणि गृह कर्ज किंवा होम लोन EMI यामध्ये योग्य समतोल साधने महत्त्वाचे आहे. होम लोन किंवा ग्रह कर्ज घेऊन तुम्ही घर खरेदी करत असाल तर त्या कर्जाचा EMI तुमच्या पगाराच्या 20 ते 25% असणे आवश्यक आहे. उदाहरणादाखल जर पाहायचे झाले तर, समजा तुमचे शाश्वत उत्पन्न मासिक एक लाख रुपये असेल तर, तुम्हाला घर खरेदी करण्यासाठी 25 हजार रुपयांचा EMI परवडू शकतो.

हे वाचा 👉  CSC केंद्र सुरू करण्याबाबत स्टेप बाय स्टेप माहिती |how to apply for CSC Service center.

मासिक 50 ते 70 हजार रुपये उत्पन्न असेल तर काय करावे?

जर तुमचे मासिक उत्पन्न 50 ते 70 हजार रुपये असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे 25 हजार रुपयांचा EMI घेणे योग्य ठरणार नाही, तुमचा हा निर्णय आर्थिक दृष्ट्या खूपच चुकीचा ठरेल. गृह कर्ज किंवा होम लोनची परतफेड करण्यासाठी किमान 20 वर्षे लागतात. यामुळे मासिक उत्पन्नाच्या निम्मी रक्कम EMI स्वरूपात भरणे मूर्खपणाचे ठरू शकते. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला घर खरेदी करायचे असेल तर तुमचा EMI 20 हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. या EMI मध्ये तुम्ही जास्तीत जास्त 25 लाख रुपये किंमतीचे घर खरेदी करू शकता. यापेक्षा जास्त महागडे घर खरेदी करणे तुमच्यासाठी परवडणारे नाही. 25 लाख रुपये किमतीचे घर तुम्हाला खरेदी करायचे नसेल तर तुम्ही भाड्याने राहणे अधिक योग्य ठरू शकेल.

मासिक उत्पन्नाच्या आधारावर किती किमतीचे घर खरेदी करणे चांगले

तुम्ही जर तुमच्या मासिक उत्पन्नाच्या आधारावर गृह कर्ज किंवा होम लोन घेऊन घर खरेदी करणार असाल तर, सर्वप्रथम तुमचे मासिक उत्पन्न किती आहे? हे पाहणे खूप गरजेचे आहे. जर तुमचे मासिक उत्पन्न 50 ते 70 हजार रुपये असेल, तर तुम्ही 25 लाख रुपये किमतीचे घर खरेदी करणे चांगले. यापेक्षा जास्त किमतीचे घर तुम्ही खरेदी करणे योग्य नाही, कारण यामुळे तुमचे आर्थिक नियोजन किंवा व्यवस्थापन पूर्णपणे ढासळू शकते. जर तुम्हाला 25 लाख रुपये पेक्षा जास्त किमतीचे घर खरेदी करायचे असेल तर तुम्ही तुमचे मासिक उत्पन्न एक लाख रुपये होत नाही तोपर्यंत थांबा.

हे वाचा 👉  'महिलांना महिन्याला 1500 रुपये', 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना संपूर्ण माहिती / mukhymantri Majhi ladaki bahin yojana

तुमचे मासिक उत्पन्न एक लाख रुपये असेल, तर तुम्ही तीस ते पस्तीस लाख रुपयांपर्यंतचे होम लोन किंवा गृह कर्ज घेऊन 30 ते 35 लाख रुपये किमतीचे घर खरेदी करू शकता. जर तुमचे मासिक उत्पन्न दीड लाख रुपये असेल तर तुम्ही 50 लाख रुपयापर्यंतचे होम लोन किंवा गृह कर्ज घेऊन घर खरेदी करू शकता. आणि या होम लोन चा EMI सहज भरू शकता. एकंदरीत EMI बाबत बोलायचे झाले तर, EMI हा तुमच्या पगाराच्या 25% पर्यंत असणे खूप आवश्यक आहे. यापेक्षा जास्त EMI झाला तर, तुमचे आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडू शकते.

तुमच्या नोकरीच्या किंवा कामाच्या आधारावर निर्णय घ्या

प्रत्येकाने त्यांच्या नोकरी आणि करिअरच्या प्रगतीच्या आधारावर घर खरेदीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. तुमची नोकरी ज्या क्षेत्रामध्ये आहे म्हणजेच तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्राची स्थिरता आणि पगार वाढ यावर विचार करणे आवश्यक आहे. महागाईमुळे तुमच्या पगारामध्ये वाढ होईल का? त्याचबरोबर तुमचे जॉब प्रोफाइल कसे आहे? या सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेणे हिताचे ठरेल.

अनेक वेळा असे घडते की, लोक नोकरीच्या सुरुवातीलाच होम लोन किंवा गृह कर्ज घेतात. पण नोकरीच्या सुरुवातीलाच प्रमोशन किंवा ट्रान्सफर मुळे शहर बदलण्याची वेळ येते. अशावेळी तुम्ही घेतलेले घर रेंटवर देऊन तुम्हाला दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हावे लागते. म्हणून नोकरीच्या सुरुवातीलाच घर खरेदी न केलेले केव्हाही चांगले.

हे वाचा 👉  भारतीय रेल्वेच्या नव्या तिकीट बुकिंग नियमांमुळे प्रवाशांच्या सोयीसाठी कोणते बदल करण्यात आले? new railway ticket booking rules

खरेदीसाठी मालमत्तेची योग्य निवड करा

गृह कर्ज किंवा होम लोन घेऊन घर खरेदी करणे शक्य असेल तितके टाळावे. घर खरेदी करण्यापेक्षा जमीन खरेदीसाठी कर्ज घेतलेले चांगले, कारण जमिनीच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे तुम्ही कर्ज घेऊन घर खरेदी करण्यापेक्षा योग्य मालमत्ता खरेदीसाठी कर्ज घेऊन भविष्यामध्ये त्या मालमत्तेपासून जास्त नफा मिळवू शकता. पण घर खरेदी करण्याशिवाय कोणताही पर्याय नसेल तर तो सर्वस्वी तुमचा निर्णय आहे.

एकापेक्षा अधिक EMI भरणे टाळा.

अनेक वेळा गरजा पूर्ण करण्यासाठी कमी मासिक उत्पन्न असून सुद्धा EMI काढले जातात. आज-काल बाजारातील प्रत्येक वस्तू EMI वर उपलब्ध आहे. अशा वस्तू खरेदी करणे टाळून बचतीवर लक्ष देणे खूप फायद्याचे आहे. लोक गृह कर्ज किंवा होम लोन घेतल्यानंतर गाडी किंवा इतर चैनीच्या वस्तूसाठी EMI काढायला सुरुवात करतात. यामुळे तुमचे आर्थिक व्यवस्थापन बिघडू शकते. त्यामुळे कमीत कमी EMI काढून बचतीवर लक्ष केंद्रित करा.

सदर लेखामध्ये आपण गृह कर्ज किंवा होम लोन घेऊन घर खरेदी करत असाल तर तुमची मासिक कमाई किती असणे आवश्यक आहे? त्याचबरोबर मासिक कमाई कमी असेल तर इतर कोणता पर्याय उपलब्ध आहे का? याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. वरील माहितीच्या आधारे तुम्हाला सुद्धा चांगले आर्थिक नियोजन किंवा व्यवस्थापन करता येईल.धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page