केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मंगळवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार 3.0 चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. रोजगार वाढवण्यासाठी 5 योजना जाहीर करण्यात आल्या असून, या योजनांसाठी दोन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तसेच, मुद्रा कर्ज योजनेच्या रकमेत वाढ करण्यात आली असून, ही मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
रोजगार वाढवण्यासाठी प्रमुख घोषणा
- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना: या योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
- महिला सशक्तीकरण: महिलांच्या विकासासाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. महिलांचा विकास म्हणजे देशाचा विकास आहे, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
- उच्च शिक्षणासाठी कर्ज: देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख कर्जावर सरकारकडून मदत देण्यात येईल.
- प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-4: पायाभूत सुविधांसाठी 11 लाख कोटींचा निधी देण्यात येणार आहे.
- नवीन इंटर्नशिप योजना: 5 वर्षांत 1 कोटी तरुणांना 500 टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळेल. या कालावधीत दरमहा 5000 रुपये मिळणार आहेत.
अन्य महत्त्वाच्या घोषणा
- चलनवाढीचा दर कमी: भारतात चलनवाढीचा दर 4% लक्ष्यापर्यंत कमी झाला आहे.
- कृषी क्षेत्रासाठी तरतूद: कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
- पीएम आवास योजना: 3 कोटी नवीन घरे बांधण्यात येणार आहेत.
- आदिवासी उन्नत गाव मोहीम: 63,000 गावांचा विकास करण्यात येणार आहे.
- पायाभूत सुविधा विकास: चेन्नई ते विशाखापट्टनम इंडस्ट्रीयल कॉरिडोअर बांधणे, बिहारमध्ये रस्ते बांधणीसाठी 26 हजार कोटी, तसेच आंध्र प्रदेशला अतिरिक्त 15 हजार कोटींचा निधी देणे.
- खाद्य गुणवत्ता तपासणी: खाद्य गुणवत्ता तपासणीसाठी 100 लॅब उघडण्यात येणार आहेत.
- स्वच्छ पाणी पुरवठा: 100 शहरांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी योजना आणली जाणार आहे.
- इंटरनशिप योजना: 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देण्यात येणार आहे, यामध्ये दरमहा 5000 रुपये मिळणार आहेत.
अर्थसंकल्प 2024 मध्ये रोजगार, कौशल्य, MSME, उत्पादन, सेवा, ऊर्जा, सुरक्षा, इन्फ्रास्ट्रक्चर, जमीन सुधारणा, शहरी विकास आणि सुधारणा या नऊ क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. निर्मला सीतारामन यांनी यावेळी या क्षेत्रांमध्ये वाढ आणि विकासासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.