व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

फाइंड माय डिवाइस ॲप डाऊनलोड करा. | Download find my device app.

स्मार्टफोन हरवल्यास मोठे समस्या निर्माण होते. आर्थिक नुकसान होण्यासोबतच डेटा देखील गमवावा लागू शकतो. मात्र, तुम्ही सोप्या प्रोसेसच्या हरवलेल्या फोनला सहज ट्रॅक करू शकता.

तुमचा फोन हरवण्याआधी ही सेटिंग नक्की करा.

आजच्या काळात स्मार्टफोन महत्त्वाच्या डिव्हाइसपैकी एक आहे. फोनच्या माध्यमातून अनेक कामे मिनिटात शक्य होतात. त्यामुळे फोन हरवला अथवा चोरीला गेल्यास मोठी समस्या निर्माण होते. यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच, सोबतच फोनमध्ये असलेले महत्त्वाचे फोटो, व्हिडिओ आणि फाइल्स देखील गमवाव्या लागतात. मात्र, काही सोप्या ट्रिक्स आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही हरवलेला स्मार्टफोन सहज शोधू शकता. तुम्ही हरवलेल्या फोन स्विच ऑफ असताना देखील ट्रॅक करू शकता. समजा, तुमचा फोन हरवला असल्यास तुम्ही मोबाइल नंबरवर कॉल करू शकता. एखाद्या चांगल्या व्यक्तीला फोन सापडला असल्यास पुन्हा मिळण्याची शक्यता देखील असते. तसेच, तुमच्या फोनला पासवर्ड, पॅटर्न लॉक देखील ठेवा. जेणेकरून, फोन हरवला अथवा चोरीला गेला तरीही इतर व्यक्तींना अ‍ॅक्सेस मिळणार नाही. फोन हरवल्यानंतर तुम्ही पोलिसात तक्रार देखील करू शकता. फोन हरवला अथवा चोरीला गेल्यास अँड्राइड आणि आयफोन यूजर्स कसे ट्रॅक करू शकतात, या प्रोसेसविषयी जाणून घेऊया.

हे वाचा-  या 30 लाख महिलांना अर्ज मंजूर असूनही मिळणार नाहीत पैसे|लाडकी बहीण योजना 3 हजार रुपये

फाइंड माय डिवाइस ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

अँड्राइड यूजर्स फोनला असे करू शकतात ट्रॅक

तुम्ही जर अँड्राइड फोन वापरत असल्यास हरवलेल्या डिव्हाइसला सहज ट्रॅक करू शकता. फोन शोधण्यासाठी तुम्ही अँड्राइड डिव्हाइस मॅनेजरमधील फाइम्ड माय डिव्हाइस फीचरचा वापर करू शकता. मात्र, अँड्राइड डिव्हाइसची लोकेशन ट्रॅकिंग सर्विस फोनमध्ये जीपीएस फीचर ऑन असल्यावरच काम करेल. अन्यथा हे फीचर वापरता येणार नाही. तुम्ही http://android.com/find या लिंकवर साइन इन करून देखील फोनला ट्रॅक करू शकता. येथे तुम्हाला ‘लॉस्ट फोन’चा पर्याय दिसेल, हे फीचर तुम्हाला फोन ट्रॅक करण्यास उपयोगी येईल. तसेच, डेटा देखील डिलीट करता येईल.

स्मार्टफोन कुठे तरी ठेऊन विसरणं ही सामान्य गोष्ट आहे. बऱ्याचदा घरी किंवा ऑफिसमध्ये जिथे फोन शोधणं कठीण नसतं अशा ठिकाणी आपण निष्काळजीपणे वागू लागतो. अशावेळी आपण दुसऱ्या लोकांच्या फोनवरून कॉलकरून डिवाइस शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु जर तुम्ही फोन सायलंटवर ठेवला असेल तर काय करायचं?

तुम्हाला माहिती आहे का तुम्ही सायलंटवर असलेला अँड्रॉइड डिवाइस देखील शोधू शकता? अँड्रॉइडच्या नव्या व्हर्जनमध्ये लोकेशन ट्रॅकिंग फिचर ऑन सेल तर तुम्ही तुमचा हरवलेला फोन गुगल मॅप्स किंवा बिल्ट इन Find My Device फिचरच्या मदतीनं हरवलेला डिवाइस शोधू शकता, मग तो सायलंटवर असाल तरी काही हरकत नाही. चला जाणून घेऊया कसं ते.

हे वाचा-  पेट्रोल आणि चार्जिंग दोन्ही वर चालणारी हायब्रीड गाडी Yamaha ने केली लॉन्च

फाइंड माय डिवाइस ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Find My Device वापरून कसा शोधायचा अँड्रॉइड डिवाइस

जर तुम्ही गुगल अकाऊंट वापरून अँड्रॉइड फोन सेटअप केला असेल तर फाईंड माय डिवाइस तुमच्या गॅजेटवर आपोआप सेटअप झालं असेल. तुम्ही ह्या फिचरचा वापर करून तुमच्या फोनवर मोठ्याने रिंग प्ले करू शकता. फक्त तुम्ही फोनपासून रिंग ऐकू येईल इतक्या अंतरावर असलं पाहिजे. त्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:

  • डेस्कटॉप कंप्यूटर किंवा दुसऱ्या मोबाइल डिवाइसवर वेब ब्राऊजर ओपन करा आणि android.com/find वर जा.
  • इथे तुमच्या हरवलेल्या मोबाइलमध्ये साइन इन असलेल्या गुगल अकाऊंटनं साइन इन करा.
  • जर तुमच्याकड़े अनेक अँड्रॉइड डिवाइस असतील साइड बारमधून हरवलेल्या फोनची निवड करा.
  • त्यानंतर ‘Play Sound’ मेनूची निवड करा.

आता तुमच्या अँड्रॉइड फोनवर मोठ्याने रिंग वाजू लागेल जरी तुमचा गॅजेट सायलंटवर असला तरी. ही रिंग ५ मिनिटे सुरु राहील. मोबाइलवर पावर बटन प्रेस करून किंवा फाईंड माय डिवाइसवर स्टॉप रिंगिंग प्रेस करून देखील रिंग बंद करता येईल. करत नाही. महत्वाची बाब म्हणजे हे फिचर वापरताना ‘Device located’ हे नोटिफिकेशन दिसलं पाहिजे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment