व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

‘नो क्लीन शेव्ह, नो लव्ह’ अशी भन्नाट मागणी करत मुलींनी काढली रॅली! ‘नो बीर्ड बॉयफ्रेंड’ ची केली मागणी

No Clean Shave, No Love: सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मुली अनोख्या मागण्या घेऊन मोर्चा काढताना दिसत आहेत. 

Madhya Pradesh news: तुम्ही आजवर वेगवेगळ्या प्रकारची निदर्शने, मोर्चे पाहिले असतील. आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी मोर्चे काढले जातात. पण काही मुलींच्या अशा काही मागण्या आहेत ज्या ऐकून तुम्ही चक्रावून जाल. विचित्र मोर्च्याची घटना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये घडली. या अनोख्या मोर्च्याच्या आणि त्यांच्या मागणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  इंदूरमध्ये मुलींनी एक वेगळीच मागणी घेऊन असे मोरचयह काढला की केवळ मुलेच नाही तर मुलीही अवाक झाल्या. 

नक्की कशाबद्दल होता मोर्चा?

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मुलींनी अशा पद्धतीने मोर्चा काढला की तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. इंदूरमध्ये मुलींनी क्लीन शेव्हन बॉयफ्रेंडसाठी रॅली काढली. या मुलींच्या हातात फलक असून त्यावर काही घोषणाही लिहिल्या आहेत. या फलकांवर ‘नो क्लीन शेव, नो लव्ह’ आणि ‘दाढी ठेवा किंवा गर्लफ्रेंड, ही तुमची चॉईस’, असे लिहिले आहे. मुलींच्या या मोर्च्याकडे या व्हिडीओमध्ये काही लोक त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत आहेत.

हे वाचा-  2kW सोलार सिस्टिम बसवण्यासाठी 60000 अनुदान घेतलं तर किती येईल खर्च, पहा संपूर्ण माहिती

सोशल मीडियावर व्हायरल 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. @gharkekalesh नावाच्या युजरने सोशल साईट x वर हा व्हिडीओ शेअर केला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे. युजर्स व्हिडीओवर विविध प्रकारच्या कमेंट्सही करत आहेत.

बघा व्हायरल व्हिडीओ 

नेटिझन्सच्या कमेंट्स 

मुलींच्या या मागणीने लोक आश्चर्यचकित झाले आहेत, सोशल मीडियावर लोक निदर्शनाबाबत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. लोक हा व्हिडीओ मजेदार आणि मनोरंजक मानत आहेत, तर काही लोक म्हणतात की हा शो किंवा रीलसाठी केलेला स्टंट आहे. मात्र, या रॅलीचा खरा उद्देश काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा काही प्रमोशनल इव्हेंटचा भाग असू शकतो किंवा तो फक्त विनोद म्हणून केला गेलाला असावा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment