व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

मोबाईल वरून तुमचे लाईट बिल कसे भरायचे |pay Electricity Bill using phonepe, Gpay.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Electricity Bill: नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला PhonePe, gpay आणि paytm द्वारे वीज बिल कसे भरायचे याबद्दल जाणून घेणार आहोत. काही वेळेस वीज बिल भरण्यासाठी असणारी अधिकृत वेबसाईट काम करत नाही आणि त्यामुळे अनेक वेळा वीज बिल भरण्यात अडचणी येतात.

मात्र आज आपण वीज बिल भरण्याच्या काही सोप्या पद्धती पाहणार आहोत. मित्रांनो, PhonePe, google pay आणि paytm या ॲप्स चा वापर करून वीज बिल भरणे खूप सोपे आहे आणि देशातील सर्व नागरिक याद्वारे त्यांचे वीज बिल भरू शकतात.

फोन पे वरून एक लाख रुपयांचा पर्सनल लोन दहा मिनिटात मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

मित्रांनो, मोबाईलद्वारे वीज बिल भरण्याचे अनेक मार्ग इंटरनेटवर उपलब्ध आहेत, जसे की वीज बिल अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपल्याला वीज बिल भरता येऊ शकते, वीज विभागाच्या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे वीज बिल जमा केले जाऊ शकते. या सोबतच, या ॲप्स चा वापर करून तुम्ही इतर बिले देखील भरू शकणार आहात. Electricity Bill

फोन पे द्वारे वीज बिल भरणे |phonepe Electricity Bill

फोन पे द्वारे वीज बिल कसे भरायचे ते आता आपण जाणून घेऊ. खाली दिलेल्या सर्व स्टेप्स तुम्ही काळजीपूर्वक वाचा जेणेकरून तुम्हाला तुमचे वीज बिल सहज भरता येईल.

  • सर्वप्रथम, वीज बिल भरण्यासाठी, तुम्हाला Google Play Store वरून Phonepe APP इंस्टॉल करावे लागेल.
  • आता फोनपे ऍप्लिकेशनमध्ये लॉगिन करा.
  • या फोन पे च्या होम पेजवर तुम्हाला रिचार्ज अँड पे बिलच्या पर्यायामध्ये वीज बिलाचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.
  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर वीज विभागाच्या सर्व अधिकृत वीज कंपन्यांची नावे तुमच्यासमोर येतील.
  • समजा तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात आणि ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर (MSEB) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ या पर्यायावर क्लिक करा.
  • आता येथे तुम्हाला तुमचा वीज बिल खाते क्रमांक जो की 12 अंकी आहे, टाईप करुन कन्फर्म करा.
  • कन्फर्म बटणावर क्लिक करताच तुमचे वीज बिल तुमच्या समोर येईल. आता हे बिल भरण्यासाठी पे बिल पर्यायावर क्लिक करा.
  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्ही तुमच्या फोनवरील मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे हे वीज बिल भरू शकता आणि तुमचे वीज बिल महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ च्या खात्यात जमा केले जाईल.
हे वाचा 👉  Aadhaar card ATM: डेबिट कार्ड नसल्यास आता आधार कार्ड वर मिळणार पैसे, घरबसल्या मिळेल कॅश, जाणून घ्या कसे.

अशा प्रकारे तुम्ही तुमचे वीज बिल फोन पे च्या साहाय्याने सहज भरू शकता किंवा तुम्ही किती वीज बिल भरले आहे की नाही ते तपासू शकता. Electricity Bill

येथे कोणीही आपले कोणतेही काम करण्यासाठी विनातारण कर्ज घेऊ शकतो. अधिक माहितीसाठी खालील बटनवर क्लिक करा.

Google Pay च्या मदतीने वीज बिल भरणे:

Google Pay द्वारे देखील ऑनलाइन वीज बिल भरण्याची सेवा दिली जाते. म्हणजे आता तुम्हाला वीज बिल भरण्यासाठी इतर कोणत्याही पोर्टलप्रमाणे या ॲप वर सुद्धा ही सेवा उपलब्ध असणार आहे. वीज ग्राहक Google Pay ॲपच्या मदतीने अगदी कमीत कमी वेळात ऑनलाइन वीज बिल भरू शकतील. यासाठी, Google Pay ने अनेक राज्यांच्या वीज वितरण आणि राज्य सरकारांशी भागीदारी केली आहे, जेणेकरून देशात ऑनलाइन पेमेंट वाढवता येईल.

  • सर्वात प्रथम Google Pay अ‍ॅप उघडल्यावर New Payment वर क्लिक करा.
  • यामध्ये तुम्हाला बिल पेमेंटचा पर्याय मिळेल.
  • यानंतर वीज बिल पर्यायावर क्लिक करा आणि बिलासाठी एजन्सी निवडा. यानंतर ग्राहक खाते क्रमांक टाकून तो लिंक करा.
  • आता तुम्हाला विज बिलाची रक्कम लिहावी लागेल आणि UPI पिन टाकून पेमेंट पूर्ण करावे लागेल. Electricity Bill

Paytm द्वारे वीज बिल भरणे | pay electricity bill using Paytm.

  • सगळ्यात आधी पेटीएम अ‍ॅप ओपन केल्यावर तुम्हाला वीज बिल पर्याय निवडायचा आहे.
  • त्यांनतर तुम्हाला तुमच्या विद्युत मंडळाची निवड करावी लागेल. पुढे तुम्हाला ग्राहक क्रमांक टाकायचा आहे आणि Get Bill पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बिलाची सगळी माहिती दिसून येईल.
  • यापुढे तुमचे वीज बिल भरण्यासाठी तुम्हाला फास्ट फॉरवर्ड वर क्लिक करायचे आहे आणि बिल भरण्यासाठी तुम्हाला तुमचा UPI पिन टाकायचा आहे.
  • त्यांनतर तुम्हाला Proceed To Pay वर क्लिक करायचे आहे आणि क्लिक केल्यावर लगेचच तुमचे वीज बिल जमा केले जाईल. Electricity Bill
हे वाचा 👉  पंतप्रधान आवास योजना – घर बांधण्यासाठी अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page