नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मानधन दिले जाते. या योजनेमध्ये सध्या अनेक बदल झाले आहेत. पी एम किसान योजना पात्र असणाऱ्या तसेच अपात्र शेतकऱ्यांची यादी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येत आहे. ही यादी नुकतीच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेमध्ये झालेले सर्व बदल ऑनलाइन पाहता येत आहेत.
पी एम किसान योजना पात्र तसेच अपात्र शेतकऱ्यांची यादी
प्रधानमंत्री सन्मान निधी योजना या योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेमध्ये फक्त पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी योजनेस पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेतला होता अशा शेतकऱ्यांना आता या योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे. अशा अपात्र शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपयाचे तीन हप्ते मिळणार नाहीत. तसेच यापूर्वी जेवढे ज्या लोकांनी या योजनेत पात्र नसतानाही दोन हजार रुपयांचे हप्ते मिळवले असतील तर त्यांच्याकडून वसूलही करण्यात येणार आहेत. शेतकरी मित्रांनो तुमच्या गावातील अशा अपात्र शेतकऱ्यांची नावे आता ऑनलाईन पाहता येत आहेत. या शेतकऱ्यांना आता येथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही.
पी एम किसान योजना तुमच्या गावातील पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन पाहण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर www.pmkisan.gov.in वर जावे लागेल.
पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा. 👇
या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला पेमेंट सक्सेस या खालील डॅशबोर्ड या टॅब वर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि तुमचे गाव निवडावे लागेल. यानंतर तुम्ही सबमिट बटणावर क्लिक करा.
शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावातील सर्व पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी आता पाहता येईल.