व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

फार्मर आयडी नंबर मिळायला सुरुवात; तुमच्या आयडीचे स्टेटस कसे तपासाल? जाणून घ्या सविस्तर माहिती. | Check farmer id card status online

केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषीविषयक विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) अनिवार्य करण्यात आला आहे. यासाठी सरकारने अॅग्रीस्टॅक योजना सुरू केली असून, शेतकऱ्यांना त्यात नावनोंदणी करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमुळे सरकारी योजनांचा लाभ अधिक पारदर्शकपणे आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवण्यास मदत होणार आहे.

फार्मर आयडीची गरज का?

शेतकरी ओळख क्रमांक हा आधार कार्ड किंवा पॅनकार्डप्रमाणेच एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे. फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांची संपूर्ण शेतीविषयक माहिती एकाच ठिकाणी जमा केली जाईल. यामुळे योजनांचा लाभ घेण्यास अधिक सोपे होणार आहे.

या योजनेचे मुख्य उद्देश:

  • शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करणे.
  • सरकारी योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे.
  • दलाल आणि मध्यस्थांची भूमिका कमी करणे.
  • वारंवार KYC करण्याची आवश्यकता कमी करणे.
  • PM Kisan Yojana यासारख्या योजनांची पडताळणी सोपी होईल.

फार्मर आयडी नंबर मिळण्यास सुरुवात

ज्या शेतकऱ्यांनी Farmer ID साठी नोंदणी केली आहे, त्यांना आता त्यांच्या मोबाईलवर फार्मर आयडी नंबरचा SMS मिळू लागला आहे. जर तुम्हाला हा मेसेज आला नसेल आणि तुमच्या अर्जाचे स्टेटस तपासायचे असेल, तर ते कसे करायचे याची संपूर्ण माहिती येथे दिली आहे.

तुमच्या फार्मर आयडी अर्जाचे स्टेटस कसे तपासाल?

जर तुम्ही Farmer ID साठी अर्ज केला असेल आणि तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्यायची असेल, तर खालील पद्धतीने तुम्ही ते ऑनलाइन तपासू शकता.

  1. सर्वप्रथम https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/checkEnrolmentStatus या अधिकृत लिंकवर क्लिक करा.
  2. स्क्रीनवर Enrollment ID आणि Aadhaar No असे दोन पर्याय दिसतील.
  3. तुम्हाला माहित असलेल्या पर्यायावर क्लिक करा (Enrollment ID किंवा Aadhaar No).
  4. संबंधित पर्याय निवडल्यानंतर संकेतस्थळी (website) उपलब्ध असलेल्या चौकोनात तुमचा नंबर टाका.
  5. “Check” या बटनावर क्लिक करा.
  6. पुढील पृष्ठावर तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल.
हे वाचा 👉  महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागाचा मोठा निर्णय, राज्यांमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनिसांची तब्बल 18,882 पदांची होणार मोठी भरती.. पहा संपूर्ण माहिती.!

तुमच्या अर्जाची स्थिती कशी दिसेल?

  • जर अर्ज अद्याप मंजूर नसेल, तर “Pending” असे स्टेटस दिसेल.
  • जर अर्ज मंजूर झाला असेल, तर 11 अंकी केंद्रीय आयडी (Central ID) नंबर आणि “Approved” असे स्टेटस दिसेल.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती

फार्मर आयडी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे. तसेच, बँक खाते आणि शेतीविषयक सर्व माहिती अद्ययावत असणे गरजेचे आहे. सरकारच्या नव्या धोरणामुळे भविष्यात कृषीविषयक सर्व योजना आणि अनुदाने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील.

शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडीचा फायदा

  • सरकारी योजनांचा लाभ सहज आणि वेळेवर मिळेल.
  • कृषी विषयक Subsidy थेट बँक खात्यात जमा होईल.
  • जमिनीशी संबंधित सर्व माहिती एका ठिकाणी डिजिटल स्वरूपात राहील.
  • दलाल आणि गैरव्यवहार टाळता येतील.

फार्मर आयडी कार्ड स्टेटस पहा

शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी (Farmer ID) हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे. जर तुम्ही अद्याप नोंदणी केली नसेल, तर लवकरात लवकर अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी पूर्ण करा. तसेच, तुमच्या अर्जाचे स्टेटस वेळोवेळी तपासा, जेणेकरून सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला विनाविलंब मिळेल.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page